मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation
मुळव्याध म्हणजे काय?
मित्रांनो संस्कृत मध्ये मूळव्याधीला अर्श म्हटलं जातं व हिंदी मध्ये बवासीर म्हटले जाते आपल्या आत मध्ये म्हणजे गुदद्वाराच्या आत मध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना सूज आल्यानंतर त्या फुगतात व दुखू लागतात त्यालाच आपण मूळव्याध म्हणू शकतो याविषयी आणखी काही आपण माहिती बघूया
मुळव्याधा विषयी माहिती
मित्रांनो मुळव्याध असो फिशर असो या सारखा आजार आता कॉमन झालाय सर्वांनाच नाही पण शंभर मागे पन्नास लोकांना हा आजार दिसतोच आजाराच्या वेदना फार भयंकर असतात ज्याला झालाय त्यालाच कळत मराठीमध्ये म्हण आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं
भारतामध्ये 100 मागे तीन ते चार लोकांना किंवा लोकसंख्येच्या चार ते पाच टक्के लोकांना हा त्रास दिसून येतो सामान्यतः बऱ्याच लोकांना मूळव्याधीची समस्या आपल्याला झाली आहे की फिशर हेच माहित नसते त्यामुळे त्यांचा उपाय देखील चुकू शकतो विशेषतः हेच समजून घेणे खूप गरजेचे आहे
तेव्हा अशा या आजारां मध्ये मूळव्याध कसा ओळखावा त्याचे प्रकार कोणते त्याचे कारण काय लक्षणे काय ते आपण जाणून घेणार आहोत या लेखा मध्ये .चला तर मित्रानो बघूया मुळव्याध या आजारा विषयी . या आजाराला कसे जाणून घ्यावे
मूळव्याध कसा ओळखावा?
Mulvyadh |
मुळव्याध झाल्यानंतर आपल्याला सतत काहीतरी टोचत असल्यासारखे वाटते गुरुद्वाराच्या बाहेर खाज सुटते सतत काही ना काही तरी टोचल्यासारखे वाटते गुदद्वाराच्या बाहेरील भागात मोड कोंब किंवा गाठ आल्या सारखे जाणवते किंवा संडास वाटे रक्त बाहेर पडते कामात मन लागत नाही सतत वेदना होतात मुळव्याधाची काही वेगळे प्रकार पण आहेत
मुळव्याधीचे प्रकार
1 गुदद्वाराच्या अंतर्गत असणारा मुळव्याध
ह्या प्रकारामध्ये शक्यतो आत मधून रक्त बाहेर पडते व वेदना कमी असतात
2 बाह्य अंतर्गत असणाऱ्या मुळव्याध
या प्रकारच्या मुळव्याधा मध्ये रक्त कमी प्रमाणात जाते पण बाहेरून खाज सुटते वेदना फार नसतात अश्या मूळव्याधीच्या काही अवस्था आपण बघूया
मूळव्याधीच्या चार अवस्था (stage)
1 पहिल्या अवस्थेमध्ये रुग्णाला आत मधून गुदद्वाराच्या जवळ सूज येते फार कमी प्रमाणात आग व वेदना होतात किंवा खाज येते आणि थोड्याशा औषधोपचाराने पण रुग्णाला आराम मिळू शकतो
2 दुसऱ्या प्रकारात रुग्णाला हाताला कोंब आल्यासारखे जाणवतात आणि आग वेदना व खाज पण वाढते कोंब शौचाच्या वेळेस बाहेर येतात व आपोआप मध्ये पण जातात
3 तिसऱ्या प्रकारात वेदना आणखी वाढतात व रक्त बाहेर जाण्याचे प्रमाण वाढते आणि बाहेर आलेले कोम आपोआप आत मध्ये जात नाही त्यांना बोटाने आत मध्ये ढकलावे लागते
4 चौथ्या प्रकारांमध्ये रुग्णाला भयंकर वेदना होतात रक्त जाण्याचे प्रमाण पण वाढते कोम शौचावाटे बाहेर येतात व काही केल्या आत जात नाही बोटाने ढकलून पण आत जात नाही ही अवस्था फारच भयंकर असते अशा अवस्थेमध्ये ऑपरेशन करणे फारच गरजेचे होऊन बसते मुळव्याधाचे कोम कसे असतात
मुळव्याधाचे कोंब
Mulvyadh |
मुळव्याधाची कोंब म्हणजे गुद मार्गाच्या जवळ असलेल्या रक्तवाहिन्यांना आलेली सूज व त्याचे गाठीत झालेले रूपांतर असते हे कोंब म्हणजे रक्तवाहिन्यांना आलेली सूज असते हे कोंब आतून व बाहेरून दोन्ही बाजूंनी असू शकतात हे कोंब गाठी सारखे असू शकतात या कुटुंबामुळे आजारी व्यक्तीला गुदमार्ग मध्ये सतत काही ना काही तरी टोचत असल्यासारखे जाणवते खूप वेदना होतात
पण मित्रांनो मूळव्याध सूज कशामुळे त्याचे कारण काय असू शकेल
मुळव्याध कशामुळे होतो? कारण काय?
मित्रांनो मुळव्याध फिशर आणि भगंदर हे सर्व आजाराचे प्रकार आहेत आणि या सर्वांची जननी म्हणजे बद्धकोष्टता ज्या लोकांचे पोट व्यवस्थित साफ होते त्यांचे आरोग्य उत्तम आहे त्यांना दुसरा कुठलाही आजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात
पण ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनाच बरेच आजार उद्भवतात तेव्हा आपल्या आजाराचे मूळ हे आपले पोट व्यवस्थित साफ होणे न होणे यामध्ये आहे याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे
पोट साफ न होण्याची कारण काय ते पण आपण बघणार आहोत खूप तळलेले पदार्थ सेवन करणे मैदा युक्त पदार्थ खाणे तेलकट व पचायला जड अन्न खाणे आणि मित्रांनो यांचा वापर आहारामध्ये कायम कायम करणे हेच त्यामागील कारण असते
गुदद्वाराच्या जवळ रक्तवाहिन्यांवर दाब वाढला की त्या फुगीर होऊ लागतात व फुगतात व त्यांना मल लागून पास होतो त्यामुळे रक्त येते
अनेक वेळेला शहरी लोकांना नोकरी वगैरे कामामुळे बैठी जीवनशैली
व्यायामाचा अभाव असणे
स्थूलपणा खूप वजन वाढणे
खूप जुलाब झाल्यानंतर देखील हा त्रास होऊ शकतो
अनुवंशिकता हेदेखील एक कारण असू शकते
शरीराच्या शक्तीपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करणे जड काम करणे हे आणि आणखी खूप कारणे असू शकतात
या सर्व आजारांचे कारणे कॉमन आहे बद्धकोष्टता ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनाच हा आजार विशेषता होतो
रात्रीचे जागरण सतत बैठे काम व्यायामाचा अभाव खूप मसालेदार पदार्थ सेवन करणे तळलेले पदार्थ अतिप्रमाणात किंवा दररोजच हॉटेलमध्ये जेवणे अतितिखट रुक्ष आहार घेणे पचायला जड तसेच मांस, मासे असे मानवी प्रकृतीला विरोधी आहार घेणे
शौचाच्या वेळेस जोर लावणे ,कुंथने अशी एक वा अनेक कारणे आहेत
मित्रांनो मूळव्याध यामध्ये आहार काय घेतला पाहिजे ते पण आपण बघू
मुळव्याधा मध्ये आहार काय घ्यावा?
आहारामध्ये फायबर युक्त म्हणजे तंतुमय पदार्थ आहार महत्त्वाचे आहे फळे भाजीपाला हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा
आहारामध्ये थंड पदार्थ म्हणजे उष्णता वाढणार नाही अशाप्रकारे पदार्थ जसे की दूध ताक दहि लोणी या पदार्थांचा उपयोग करावा
सर्व प्रकारची कडधान्य सर्व प्रकारची फळे पेरू द्राक्ष डाळिंब भाज्यांमध्ये पडवळ भोपळा कोशिंबीर भेंडी काकडी सुरण या पदार्थांचा उपयोग करणे हितकारी असते तसेच काय खाऊ नये काय खाणे वर्ज्य करावे हे आपण बघू या
मुळव्याधा मध्ये अपथ्य काय?
मुळव्याधा मध्ये जास्त तिखट आंबट खारट व रुक्ष आहार टाळावा
जास्त मसालेदार व चमचमीत पदार्थ खाणे टाळावे
अतिथंड व अतिउष्ण पदार्थांचे सेवन करणे टाळावे
कुठल्याही व्यसनाचा अतिरेक उदाहरणार्थ दारू सिगरेट अति चहा पिणे टाळणे
पचायला जड असे मांस मासे मटण वर्ज करावे
बिस्किट मैद्याचे पदार्थ खूप चिकन पदार्थ खाणे टाळावे वेळेवर जेवण करावे
आजाराची लक्षणे काय असतात ते आपण बघू मित्रांनो मुळव्याध फिशर भगंदर तीनही आजारांमध्ये लक्षणे भिन्न भिन्न असतात आणि आपण या तीनही आजारांना मुळव्याध म्हणूनच संबोधतो अशा या मुळव्याधाची काही लक्षणे आहे का त्याला कसे ओळखता येईल ते आपण बघू या
मुळव्याध आजाराची लक्षणे
1 संस्कृत मध्ये मुळव्याधला अर्श म्हणतात यामध्ये दोन प्रकार आहेत
१ रक्तस्राव नसलेले मोडाचे मुळव्याध
२ रक्ती मूळव्याध रक्ता सहित असणारे मूळव्याध
मुळव्याधा मध्ये प्राथमिक लक्षण शौचावाटे रक्त जाणे शौचातून जाऊन आल्यानंतर आग होणे व आतून आणि बाहेरून कोंब येतात यातून आपला मल बाहेर पडताना अस्वस्थता निर्माण होते यामध्ये काहींना रक्त पडत नाही पण खूप त्रास होतो वेदनादायी त्रास होतो ही काही प्राथमिक लक्षणे असू शकतात
आपण त्यावरून आपला आजार कोणत्या प्रकारातला आहे हे निश्चित समजू शकतो व निदान करू शकतो मुळव्याधीवर काय उपाय करता येईल ते आपण बघू
मूळव्याधीवर घरगुती उपाय व उपचार काय?
मूळव्याधीमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये काही औषधे घेऊन पण बरे होतात केवळ पथ्य पाळल्याने ही सुधारणा होते
पालेभाज्या फळे ज्यांच्यामध्ये फायबर जास्त आहे आहे असे पदार्थ जास्त सेवन केल्याने ही आराम मिळतो
रुईचा चीक व हळद यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा थोडासा लेप मोडावर लावल्यानेही आराम मिळतो
कारल्याचा रस देखील फार उपयोगी असतो रोज सकाळी एक ग्लास भर ताकामध्ये थोडासा कारल्याचा रस घेऊन पिल्याने मूळव्याधीमध्ये आराम मिळतो
एक लिंबू घेऊन अर्धे कापावी व त्यावर सैंधव मीठ टाकून चोखावे पुन्हा टाकून पुन्हा चाखावी असे चार ते पाच वेळा करावे हा प्रयोग कमीत कमी दहा ते बारा दिवस करता येईल त्यामुळेही मूळव्याधीमध्ये आराम मिळतो
मेथीच्या दाण्याच चूर्ण करून रोज सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घेतल्यानेही आराम मिळतो पोट साफ होते
दुधामध्ये थोडी हळद चूर्ण टाकून दररोज संध्याकाळी झोपण्या अगोदर पिल्यानंतर देखील आराम मिळतो तसेच हळकुंड गायीच्या तुपामध्ये उगाळून त्याचा लेप मोडावर लावल्याने ही मोड नरम पडतो
मुळ्याचा रस देखील खूप परिणामकारक असतो म्हणून मुळा सेवन करणं किंवा मुळ्याचा रस तुपामध्ये सेवन करणे फायदेशीर असते
त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात घेतल्याने आराम मिळतो
गरम पाण्यात हळद चूर्ण टाकून त्याचा शेक घेतल्याने ही आराम मिळतो
सुरणाचा कंद मूळव्याधीच्या आजारावर अतिशय जलद परिणाम देतो सुरणाच्या कंदाची वाफवून केलेली भाजी खावी
ताक प्यावे ताक हे थंड असते त्यामुळे शक्य होईल तेवढे ताक प्यावे किंवा नारळाच्या शेंड्या यांचे राख करून ताकामध्ये थोडी-थोडी सेवन करावी
पण आजार जुनाट असेल कोंब जास्त असतील तर ऑपरेशन करणे गरजेचे असते
मुळव्याधीवर ऑपरेशन पद्धत
मूळव्याधीमध्ये ऑपरेशन हे अगदी शेवटच्या स्टेजलाच करणे आवश्यक असते शक्यतो ऑपरेशन हे बिना टाक्याचे किंवा बिना चिरफाड करता येते
इंजेक्शन पद्धत
याच्या पण चार पद्धती आहे पहिली पद्धत इंजेक्शनद्वारे
कोंबच्या मुळा मध्ये हे विशिष्ट प्रकारचे रसायन असलेले इंजेक्शन देऊन कोंब सुकवून टाकले जातात दीड दीड महिन्यांच्या किंवा काही महिन्यांच्या अंतराने तीन इंजेक्शन दिले जातात
रिंग बँड पद्धत
दुसऱ्या प्रकारामध्ये रिंग बँड पद्धत वापरली जाते कोंब जर मोठा असेल तर त्यावर रिंग बँड बांधून रक्त प्रवाह बंद केला जातो व कोंब सुकून गळून पडतो
इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन
इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन या पद्धतीमध्ये गुदद्वाराच्या आतील कोंबा साठी ही पद्धत वापरली जाते म्हणजे कोंब जर आत मध्ये असतील तरच ही पद्धत वापरली जाते इन्फ्रारेड किरणे कोंब वर सोडली जातात तिथे उष्णता निर्माण होऊन कोंब जाळली जातात
लेझर ट्रीटमेंट
लेझर ट्रीटमेंट मध्ये रुग्णाला त्रास फार कमी होतो व रुग्ण लवकर कव्हर होतो बरा होतो रुग्णाच्या कोंबा वर लेसर किरणांचा मारा करून कोंब जाळून टाकली जातात कुठलीही चिरफाड केली जात नाही त्यामुळे रुग्ण लवकर बरा होऊन घरी जातो सध्या सर्वांनाच आवडणारी ही पद्धत आहे व परत मुळव्याध न होण्याचे प्रमाण पण खूप असते या पद्धतीमध्ये
ऑपरेशन पद्धत
ऑपरेशनद्वारे कोंब कापून काढणे या पद्धतीमध्ये कोंब बाहेर पडत असतील आत मध्ये जात नसेल व आजार जुनाट झाला असेल तर रुग्णाला भूल देऊन कोंब कापून काढले जातात हा शेवटचा पर्याय असतो आणि हे करणे गरजेचे असते यासाठी रुग्णाला काही दिवस ऍडमिट व्हावे लागू शकते
मूळव्याधीमध्ये व्यायाम काय करावा
मूळव्याधीमध्ये भरपूर प्राणायाम करावा स्वच्छ निसर्गरम्य वातावरणामध्ये विहार करावा मण्डुकासन शशकासन उत्तानपादासन कंधार आसन गोमुखासन या प्रकारची आसने करावी मन शांत ठेवावे व शक्य असेल तर सूर्यनमस्कार करावा
अशाप्रकारे मित्रांनो मुळव्याध हा आजार काय आहे ते आपण समजून घेतले याबाबतीत आपल्याला अजून काही ज्ञात असेल माहिती असेल किंवा आपल्या कडे चांगल्या प्रकारची मुळव्याधा विषयी माहिती असेल तर आपण आम्हाला सुचवू शकतात तेव्हा नमस्कार
Hemorrhoids Information Cause Symptoms and Home Remedies-Operation
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता