डेंग्यूचा(Dengue) virus tests लक्षणे कारण उपाय काय
डेंग्यू म्हणजे काय?
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी मित्रांनो डेंगू म्हणजे हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग असून तो एडीस इजिप्ती या डासांपासून पसरतो
डेंगू(Dengue) चा डास
डेंगूचा डास हा रंगाने काळा असतो व त्याच्या शरीरावरती ओळख म्हणून पांढरे पट्टे असतात व त्याचा आकार कमीत कमी पाच मिलीमीटर पर्यंत असतो
हा डेंग्यूचा डास आपल्या शरीरामध्ये विषाणू तयार करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यानंतर मात्र हा विषाणू झपाट्याने वाढू लागतो
या डासाचे महत्वाची लक्षण म्हणजे हा आपल्याला दिवसा चावतो वारंवार चावतो व मादी डासांच्या चावण्यामुळे हा व्हायरस पसरतो या डासाच्या राहण्याची जागा म्हणजे पाण्याची टाकी डबके जुने फेकून दिलेले गाडीचे टायर सायकलीचे टायर अडगळीची जागा कुलर चे पाणी सडलेले पाणी अस्वच्छता असलेल्या जागा या डासांसाठी अनुकूल असतात पावसाचे डबक्यात साचलेले पाणी या जागी हा डास वास्तव्य करतो
डेंग्यू डासांची अंडी पाण्या विना एक वर्षभर राहू शकतात तसेच तसेच समुद्रसपाटीपासून हजार मीटरपर्यंत हे वास्तव्य करू शकतात किंवा जिवंत राहू शकतात नारळाच्या करवंट्या जुनी भांडी प्लास्टिक पिशव्या ड्रम जुनी झालेली फेकून दिलेले कप बश्या फ्रीजचे पाणी जिथे साठते ते भांडे कुलर मध्ये असलेले खूप दिवसाचे अस्वच्छ पाणी अशा अस्वच्छ जागी याचे वास्तव्य आढळते
डेंग्यू (Dengue)आजार विषयी माहिती
डेंग्यू हा आजार सुरुवातीला चीन मध्ये जीन राजवंशाच्या मध्ये पाहायला मिळाला सतराव्या शतकामध्ये या आजाराचा उद्रेक झाला होता त्यावेळेस साथ पसरली होती व त्याचे अनेक पुरावेही पाहायला मिळतात
सतराशे ऐंशी सालि या आजारामुळे अनेक लोक आजारी पडले होते अनेक लोक मृत्युमुखी पडले होते व आशिया खंडामध्ये आफ्रिका व अमेरिका मध्ये या आजारामुळे अनेक लोक मरण पावले होते त्यानंतर पुढे बऱ्याच संशोधनाअंती एडीस इजिप्ती या नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार होतो हे सिद्ध झाले
डेंगू(Dengue) कशामुळे होतो?
आज बदलत चाललेल्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यातच एक म्हणजे डेंगू वायरस होय डासांचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच व्यक्तीची अस्वच्छ राहणीमान व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होणे वातावरणातील बदल व बदलते हवामान एकाच जागी अनेक दिवसांचे पाणी साचून राहणे डबके होणे ही जी काही कारणे आहेत जी त्यामुळे डेंग्यू पसरतो किंवा डेंग्यूची साथ पसरते
डेंग्यू( Dengue)वायरस आजाराची लक्षणे
![]() |
| Dengue fever |
शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते ताप येणे अंगदुखी अशक्तपणा जाणवणे
डेंग्यू व्हायरस पॉझिटीव्ह आल्यानंतर जोराचा ताप येणे ही लक्षणे दिसू शकतात
आजारी व्यक्तीच्या डोक्याचा पुढचा भाग दुखणे ही पण लक्षणे असू शकतात
आजारी व्यक्तीची डोळे दुखणे भूक न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात
उलट्या मळमळ देखील होऊ लागतात
शरीराची श्वास घेताना त्रास होणे पोट दुखणे
व्यक्तीला अस्वस्थता वाटणे व झोप येते
आजार गंभीर झाला असतां रक्तदाब कमी होणे
रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे
डेंग्यूच्या तापामध्ये नाडी मंद चालणे
त्वचेवर पुरळ किंवा व्रण येतात किंवा अशी समस्या होऊ शकते
तीव्र स्वरुपाची डोकेदुखी
थकवा येणे व रोग येऊन गेल्यानंतर अशक्त जाणवणे हा रोग कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत राहू शकतो
रक्तस्रावत्मक डेंगू(Dengue) तापाची लक्षणे
रुग्णाला तहान लागणे कोरड पडणे भयंकर तीव्र स्वरूपाची पोटदुखी होऊ शकते नाडी मंद चालणे झोप येणे अस्वस्थता जाणवणे नाक हिरड्यांमधून रक्त येणे श्वासोच्छवास मध्ये त्रास होण असे गंभीर स्वरूपाचे लक्षण आढळतात
अतिगंभीर स्वरूपामध्ये नाडी मंद व अस्वस्थता व रक्तदाब कमी होणे यासारखी किंवा बेशुद्धी येणे यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात ही लक्षणे गंभीर व धोकादायक असू शकतात
रक्तस्राव होत असेल तर आजार बरा होण्याची वाट बघू नये लगेच तज्ञ डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावे
डेंग्यू (Dengue)विषाणू ची टेस्ट
आजाराची लक्षणे ही काहीशी मलेरिया टाइफाइड या सारखेच असल्यामुळे तो समजत नाही त्यामुळे डेंग्यू आजाराची साथ पसरली असेल किंवा आपल्याला शंका असेल तर त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतात त्यामध्ये
NS या टेस्टमध्ये तापामध्ये रुग्णाला एक ते चार दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकतो
IGM ही टेस्ट रुग्णाला पाच ते 14 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येते
IGG ही टेस्ट दहा दिवसांमध्ये पॉझिटिव येते व कमी जास्त प्रमाणात पॉझिटिव दाखवते
या आजारांमध्ये लस नाही प्रतिजैविके नाही त्यामुळे रुग्णाला आरामाची गरज असते व भरपूर विश्रांती घेऊन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपाय केले जातात त्यामुळे व्यक्तीमध्ये स्वतः प्रतिकारशक्ती तयार होते व रुग्ण बरा होतो

















