Monday, December 30, 2019

मुळव्याध फिशरवर उपाय आयुर्वेदिक उपाय

मुळव्याध फिशरवर उपाय आयुर्वेदिक उपाय



Fisure,mulvyadh,bhagandhar solution
Mulvyadh

‌नमस्कार मित्रांनो healthlife ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुळव्याध फिशर या आजारावरती उपयुक्त माहिती


मुळव्याध हा आजार अतिशय भयावह आहे संस्कृत मध्ये मूळव्याध या आजाराला  अर्श म्हटले जाते आयुर्वेदामध्ये आजाराच्या ज्या आठ महाव्याधी सांगितल्या आहे त्यामध्ये मूळव्याध हा एक आजार आहे  यावरून  मूळव्याध ही व्याधी किती  ती भयावह आहे  आहे ते समजते यामुळे मुळव्याध झालेल्या व्यक्ती अतिशय घाबरून जातो  अन्न पाण्यावरची वासना पण उडून जाते मूळव्याध किंवा फिशरच्या त्रासामुळे तो जेवण कमी करतो व त्याच्या परिणाम उलटा होतो त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू लागतो आणि मल कडक होऊ लागतो गुदभागी शुष्कता येऊ लागते आणि त्यामुळे गुदद्वाराचे असंख्य आजार उद्भवू शकतात आणि आपल्याला हा आजार बरा होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न मिळेल ते औषधे घेण्याचा तो प्रयत्न करतो पण सहजासहजी हा आजार बरा होत नाही


वरील कोणत्याही प्रसंगात मुळव्याध नसतो तरीदेखील आजार हा मुळव्याध म्हणूनच ओळखला जातो पण असे नाही कदाचित परिकर्तिका म्हणजे गुदभागी चिरा पडणे म्हणजेच फिशर किंवा बाहेरच्या जागी कोंब येणे आतून कोम येणे म्हणजेच मुळव्याध किंवा आजार आतिशय गंभीर झाला असता बुद्ध भागाच्या दुसऱ्या बाजूला पु युक्त पुळी होणे म्हणजेच भगंदर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि आपण देखील आपल्याला कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत हे जाणून उपाय करायला हवे


फिशर का होतो the cause of fisher
Fisher



    त्यातही जर फिशर सारखा आजार असेल तर मात्र एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा हा आजार उद्भवतो त्यामुळे तर रुग्ण आजारी व्यक्ती अतिशय अशक्त होऊन जाते फिशर हा असा आजार असा आहे की तो एकदा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो म्हणून या आजाराला ऑपरेट करून देखील फायदा होत नाही त्यासाठी आयुर्वेदिक उपाय करून व आजार सुधारणा करून आपल्याला या आजारावर नियंत्रण मिळवता येते


      तसे तर प्रत्येक आजाराचे मूळ हे आपल्या आहारामध्ये दडलेली आहे ज्याचे पोट व्यवस्थितपणे साफ होते त्याला कुठलाही आजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात आज भारतामध्ये कमीत कमी  चार ते पाच कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत व दरवर्षी यांची संख्या काही लाखांनी वाढतच आहे यावरून हा आजार गंभीर स्वरूपाचा होत चाललाय या अगोदर हा आजार शक्यतो चाळीशीनंतर होत होता किंवा होण्याचे प्रमाण प्रौढ व वृद्ध लोकांमध्येच होते पण आता मात्र 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना देखील हा आजार सर्रास पाहायला मिळतो हा आजार अंतर्गत व बहिर्गत अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो इंटरनल पाइल्स खूप वेदनादायी असतो व बहिर्गत बाहेरील बाजूला येणारी कोम किंवा सूज ही ही फार वेदनादायी नसली तरी खाज युक्त असते


  आयुर्वेदा चे वर्णन


आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रत्येक मूळव्याधीमध्ये रक्त पडतेच असं नाही तर वातप्रधान मूळव्याधीमध्ये वेदना जास्त होतात व पित्त व रक्त रक्तदोष त्यामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये रक्त जास्त जाते पडते आग होते व कफदोषामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये कंड अधिक असतो सुश्रुत संहितेमध्ये देखील वर्णन आहे जेव्हा व्यक्ती असंयमी बनते किंवा असंयम् आचरण करते तेव्हा त्रिदोष युक्त किंवा दोन दोष युक्त रक्तासह असा मुळव्याध होतो व हे दोष आपल्या गुदभागी मोड निर्माण करतात आग निर्माण करतात म्हणून या आजाराला जे कारण आहे त्याचाच बीमोड केला पाहिजे आजाराचे कारण म्हणजे अग्निमांद्यता आपल्या आहाराच्या अनियमितता किंवा अवेळी जेवण करणे कधीही जेवणे काहीही खाणे यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते व वरील तीन दोष कुपीत होतात यालाच मूळव्याध म्हटले जाते


   या आजारांमध्ये आतील भागातून रक्त येणे सूज येणे यासारखे प्रकार भयंकर असतात व अतिरक्तस्राव होत असेल तर ॲनिमिया म्हणजेच रक्ताल्पता देखील होऊ शकतो म्हणूनच या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपाय करून घ्यावा


मूळव्याध व फिशर या आजारावर काही घरगुती उपाय


      तर मित्रांनो  आज आपल्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या  आरोग्याकडे  लक्ष देणे  तसं  अवघड बनले आहे  आहार  विहार  सर्व  सवयी  यामध्ये  नितांत बदल घडत आहे आणि   ते अपरिहार्य आहे 


      तेव्हा  अशा परिस्थितीमध्ये आपला आहार हा सात्विक कसा बनेल याकडे आपण लक्ष देऊया आणि जास्तीत जास्त फळे, भाजीपाला ,हिरव्या पालेभाज्या ,फायबर युक्त असा आहार आपण रोज घेऊया , त्याचबरोबर आपला गुदमार्ग कोरडा होणार नाही सदैव ओला राहील यासाठी दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ आहारात उपयोगात आणू या. 


पचायला जड आणि आम्लता युक्त व जळजळ करणारी पदार्थांचे सेवन उष्ण तिखट मसालेदार तरी युक्त पदार्थांचे सेवन करू नये


आपला शौचाला नियमितपणा असावा आलेली शौच रोखून धरू नये त्यामुळे देखील मूळव्याधीच्या आजारांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते


मैद्याचे पदार्थ डाळीचे पदार्थ सेवन करताना अतिशयोक्ती नको अति प्रवास जागरण अति झोप यासारखे प्रकार व्हायला नको


    दुधामध्ये हळद टाकून रोज सकाळ संध्याकाळ अनशापोटी किंवा आपल्या सोयीने घेतली तर अतिउत्तम आणि त्याचबरोबर मुळव्याध फिशर प्राथमिक स्थितीतील बरेच होतात त्याचबरोबर या सर्व आजारांचे मूळ बद्धकोष्टता नष्ट होते.


    तेव्हा त्यासाठी  परफेक्ट  उपाय काय आहे ते आपण पाहूया
 दुधाबरोबर सुरण पावडर अर्धा चमचा हळदी सोबत जेवणापूर्वी दोन तास अगोदर दिवसातून दोन वेळा घ्यावे मित्रांनो खरोखर या औषधाने आपल्याला निश्चित गुण मिळेल हे सर्व घटक असलेल्या काही प्रॉडक्ट पण बाजारात भेटतात पण त्यासोबत कमीत कमी तीन महिने काही दिवस आपल्याला हा प्रयोग केल्यास उत्तम फायदा मिळेल मिळू शकतो त्यानंतर आपल्याला निश्चितच एक नवा जोम आणि उत्साह जाणवेल रात्री झोपताना तू गावरान गाईची तूप एक बोटाने गुदभागी फिरवावे त्यामुळे गुद भागाची शुष्कता कमी होऊन तेथील जागा नरम पडते किंवा एरंडेल तेल लावावे ताक असेल तर नियमित घ्यावे दुधाचे पदार्थ नियमित सेवन करावे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते मित्रांनो या अवघड जागेच्या अवघड दुखण्या तून तुम्ही बरे व्हावे यासाठी हा प्रयत्न



     याच बरोबर मित्रांनो आपल्या आहारामध्ये फायबर युक्त आहार घ्यावा फळे भाजीपाला केळी यासारख्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा तसेच त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यामध्ये एक चमचा रात्री झोपण्या पूर्वी घ्यावा आपली जीवनशैली मध्ये बदल करावा व्यायाम योगासन तसेच मनाला शांत ठेवावे मन शांत असेल तर शरीर देखील निरोगी राहते असं म्हटलं जातं शरीर माध्यम खलु धर्मसाधनम् आपले शरीर हे धर्माचे साधन नाही म्हणून त्याला व्यवस्थित ठेवावे निश्चितच आपण हे सर्व उपाय करून बघावे 


सुरण कंदाची भाजी


ज्या  मध्ये  सुरण हा घटक प्रामुख्याने आहे त्याचबरोबर हळद पावडर, शतावरी पण आहे हे सर्व घटक असलेले आहार पद्धती स्वीकारून आजारांमध्ये उत्तम आराम मिळतो सुरण  कंद  भाजी बनवून खावी  सुरणाचा कंद वाफवून केलेली भाजी खावी  त्यामध्ये मीठ मिरची टाकून  अशा भाजीचे नियमित सेवन केल्याने  मूळव्याधीच्या आजारांमध्ये फार लाभ होतो  त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते  अशाच तरुणाच्या कंदाचे  कार्य लहान व मोठ्या आतड्याची कार्यक्षमता वाढवते त्याचबरोबर पचन क्षमता सुधारते शरीरा तील विषारी द्रव्य toxinsबाहेर काढणे ,बद्धकोष्टता सुरळीत करणे ,कोणताही कसलाही दुष्परिणाम न करता गुदद्वारा जवळ होणारी आग सुज मलविसर्जनाच्या वेदना व रक्तस्राव थांबवते.
 म्हणून आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करावा 


   तेव्हा मित्रांनो आपल्याला हा लेख वाचून  आपल्या दुखण्यावर  निश्चितच  मदत मिळेल  वर सांगितलेले सर्व उपाय जर आपल्याला काही गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर  आपण  तज्ञांचा सल्ला  घेऊनच करावे असेच नवीन नवीन  आजारासंबंधी  लेख  बघण्यासाठी  आमच्या या ब्लॉगला अवश्य भेट द्या व आपल्या  प्रतिक्रिया  नक्कीच आम्हाला  कळवा नमस्कार


Hemorrhoids Fisher Remedy Ayurvedic Remedies



Fisure,mulvyadh,bhagandhar solution
Mulvyadh



 Hello friends, welcome to the healthlife blog. Friends, today we are going to look at useful information on Hemorrhoids Fisher.


 Hemorrhoids are a very frightening disease. In Sanskrit, hemorrhoids are called hemorrhoids. Hemorrhoids are one of the eight major ailments mentioned in Ayurveda. Hemorrhoids are a very frightening disease. Hemorrhoids are very frightening because of this. Hemorrhoids are very frightening.  Hemorrhoids or fissures cause him to reduce his diet and reverse the effects. He suffers from constipation, constipation and constipation. Dryness in the rectum can lead to numerous anal ailments and he can try whatever medicine he can to cure the ailment.  But this disease is not easily cured


 Although hemorrhoids are not present in any of the above cases, the disease is known as hemorrhoids, but this is not the case. Pericardica is an incision in the anus, ie, a fissure, or a sprout on the outside, or a hemorrhoid on the inside.  Different types of illnesses can occur and you should also take measures knowing what kind of symptoms you have


फिशर का होतो the cause of fisher


 Even if there is a disease like Fisher's disease, but once it is cured, the disease recurs again and again, so the patient becomes very weak. Fisher's disease is such that it can recur once it occurs, so operating on this disease does not help.  We can control this disease by taking measures and improving the disease


 However, the root cause of every disease is hidden in our diet. A person who cleans his stomach properly has a very low chance of getting any disease. Today, at least four to five crore people in India suffer from this disease and the number is increasing by a few lakhs every year.  Before the onset of the disease, the disease was more likely to occur after the age of 40 or more, but now it is more common in children between the ages of 18 and 25. The disease occurs in both internal and external forms. Internal piles are very painful and external.  Coming or swelling on the outside is not very painful but itchy


 Description of Ayurveda



 According to Ayurveda, not only every hemorrhoid gets blood, but also hemorrhoids have more pain and bile and blood hemorrhoids cause hemorrhoids. There is more fire.  Hemorrhoids can be caused by hemorrhoids with two or more defective blood and these defects create a condition in your rectum. The cause of this disease should be beamed. The cause of the disease is indigestion. Irregularity of your diet or eating unhealthy food. Never eating anything causes indigestion.  Hemorrhoids are caused by the above three defects


 These diseases are severe in the form of internal bleeding and swelling and if there is excessive bleeding, anemia can also occur. Therefore, this disease should not be ignored. Go to a specialist and seek treatment.


 Some home remedies for hemorrhoids and fissures



 So, friends, in today's complex life, it has become so difficult for you to pay attention to your health.


 So let's focus on how to make our diet sattvic in such a situation and let's eat maximum amount of fruits, vegetables, green leafy vegetables, fiber rich food every day, and also use all milk and milk products in the diet to keep our rectum dry and not always wet.  .


 Consume foods that are hard to digest, acidic and irritating.


 Hemorrhoids can also be a problem as your stools should be regular and should not be blocked.


 Don't exaggerate while consuming pulses. Don't travel too much


 Adding turmeric to the milk every morning and evening on an empty stomach or at your convenience can be very good and at the same time hemorrhoids can cause a lot of fissures in the primary condition and also eliminate the original constipation of all these diseases.


 So let's see what the perfect solution is
 Surana powder with milk, half a teaspoon of turmeric should be taken twice a day, two hours before meals.  You will definitely feel a new vigor and excitement. When you sleep at night, you should rub the ghee of Gavaran cow with your finger in your anus so that the dryness of the Buddha area is reduced and the place becomes soft or castor oil is applied.  This is an attempt to heal you from the difficult pain of this difficult place



 In addition to this, friends should include fiber in their diet. Fruits, vegetables, bananas should be included in the diet. Triphala powder should be taken in a teaspoon of lukewarm water before going to bed at night. Change your lifestyle. Exercise. Yogasana. Keep the mind calm. If the mind is calm, the body stays healthy.  Body Medium Khalu Dharmasadhanam Your body is not a tool of Dharma, so keep it in order.


 Suran Kanda vegetable



 A diet consisting of turmeric powder, asparagus but all ingredients containing turmeric gives relief from ailments. Suran tuber is a vegetable that can be eaten by steaming turmeric. Add salt and chilli to it. Regular consumption of this vegetable is very beneficial in hemorrhoids.  It also helps in cleansing the stomach, increases the efficiency of small and large intestines, improves digestion, removes toxins from the body, smoothes constipation, stops the pain and bleeding of the stool near the anus without any side effects.
 So include these foods in your diet

 
So friends, reading this article will definitely help you with your pain. All the above mentioned remedies. If you have a serious illness, you must consult an expert.

No comments:

Post a Comment

याविषयी आपण काही कमेंट करू शकता

मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation

मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation मुळव्याध म्हणजे काय?     मित्रांनो संस्कृत मध्ये मूळव्याधीला अर्श म्हटलं जातं व हिंदी ...