जळतात कारण(Symptoms)लक्षणे घरगुती उपचार औषध
Jalwat |
जळवात म्हणजे काय?
जळवात म्हणजे काय तर त्वचा रुक्ष व कोरडी झाली असता ती फाटली जाते किंवा तिच्यातला मऊपणा कमी होतो व पायाला किंवा हातांना भेगा पडू लागतात जखमा होऊ लागतात हाताच्या किंवा पायाच्या भेगा मधून रक्त येऊ लागते त्वचा लालसर होते हाताची कातडी निघू लागतात त्वचा पातळ होऊन दुखू लागते अशाप्रकारे आपण आपल्याला जळवाात झाली असे म्हणू शकतो
जळवात का होतो त्याचे कारण काय?
मित्रांनो आपण जळवात का होतो त्याचे कारण काय यावर थोडक्यात बघूया तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची शरीर प्रकृती ही भिन्न भिन्न असते कुणाची कफ प्रकृती कुणाची पित्त प्रकृती तर कुणाची वात प्रकृती आणि त्यामुळे भिन्नभिन्न आजार पहायला मिळतात
बहुतेक वेळेला हा आजार अनुवंशिक त्यातूनही उद्भवतो आपले आई-वडील आजी आजोबा यांना त्रास असेल तर त्यांच्यासारख्या शरीर प्रकृती असणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये देखील असा त्रास जाणवतो
विटामिन व प्रोटीन युक्त आहार न घेतल्यामुळे आहारात यांचा योग्य वापर न केल्यामुळे देखील जळवात या समस्यांना सामोरं जावं लागतं
उष्ण व कोरडे हवामान हेदेखील काही व्यक्तींना मानवत नाही तर कुणाकुणाला थंडीमध्ये देखील हा त्रास होतो थंड वारे व कोरडी हवा पाणी व नेहमी थंड पदार्थ यांचे सेवन करणे यामुळे वात प्रकोप होऊन हातांना पायांना भेगा पडतात चिरा पडतात व त्या कडक बनतात व खूप वेदना होतात हातापायांच्या भेगांतून रक्त येते
वास्तविकतः जळवात हा उष्णतेचा प्रकार आहे शरीरातील उष्णता कुठून तरी बाहेर पडते कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येते जर आपण केवळ दररोज रुक्ष आहार घेत असून किंवा उष्ण तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन करत असू तर अशा व्यक्तींना हमखास अशा समस्यांना तोंड द्यावे लागते
कधीकधी आपण अशा वातावरणात काम करत असतो तिथे आपल्या पायांचे हातांचे घर्षण होत असते व त्वचा रुक्ष कोरडी होते आपण कधी कधी बूट चप्पल न वापरता अनवाणी पायाने काम करतो यामुळे तेथील धूळ रेती यांचादेखील त्वचेवर परिणाम होतो रेती माती यांच्याशी त्वचेचं घर्षण होते कुणाकुणाला मातीत काम केल्यानेही अलर्जी होते मातीशी संपर्क येताच त्वचा रुक्ष व कोरडी होऊ लागते व भेगा पडतात
मित्रांनो प्रत्येक आजाराचे निदान आपल्या आहारामध्ये सापडतं जसे की आपला आहार ऋतूनुसार असला पाहिजे आहारामध्ये जर खूप रुक्षता असेल चिवडा मसाला उष्ण व तिखट पदार्थ किंवा अति थंड पदार्थ यामुळेच शरीरातील स्निग्धांश कमी होतो आणि परिणामतः आपले शरीर रुक्ष बनते
तसेच मित्रांनो ज्या व्यक्तींना खूप वेळ पाण्यामध्ये किंवा मातीशी संपर्क येतो त्यांनाच हा आजार खूप प्रमाणात आढळतो बहुतांशी ही कारणं असली तरीदेखील इतरांना देखील उष्ण व कोरडे हवामान मानवत नाही उष्ण व कोरड्या वातावरणामध्ये तसेच धुळीमुळे देखील त्वचा कोरडी बनते व सर्रास जळवात झालेले पहायला मिळते त्यामुळे देखील जळवात पाहायला मिळते
जळवात या आजाराची लक्षणे काय?
जळवात |
मित्रांनो जळवातीमध्ये हातापायाची कातडी निघतात हात व पाय त्यांची कातडी कोमल होते त्यांना भेगा पडतात कधीकधी भेगांमधून रक्त पण येते व अशा जागी कडकपणा येतो त्यामुळे त्वचा थोडीफार इकडेतिकडे हलवली तरीदेखील खूप दुखते त्वचा लालसर होते ,पेन वेदना जाणवते एखादा मलम लावला असता बरे वाटते
कोमट पाण्याने शेक दिला असता बरे वाटते भेगा पडल्या नंतर त्या कडक बनतात व हातांची तळपायांची हालचाल झाली असता किंवा काही काम केले असतात त्या चिरा फाटतात किंवा त्वचा आणखीन फाटते व त्यातून रक्त येऊ लागते म्हणजेच व्यक्तीला असह्य वेदना होतात काम करावेसे वाटत नाही ही कशात मन लागत नाही नाही किंवा कुणाला आपले हात व पाय दाखवण्यास देखील लज्जा वाटते संकोच वाटतो व्यक्तीला त्यामुळे समाजात एकमेकांबरोबर मिसळायला देखील संकोच वाटतो
जळवात च्या आजारांमध्ये काय उपाय करता येईल?
१ मित्रांनो पहिला उपाय म्हणजे आहारात बदल करणे ऋतूनुसार हिवाळा पावसाळा उन्हाळा आहारात बदल करावा आपल्या आहारामध्ये दूध लोणी तूप युक्त पदार्थांचा उपयोग वापर करणे तिच्यामुळे आपल्या शरीरातील स्निग्धांश वाढेल रुक्षता कमी होईल नैसर्गिक फळ भाज्या फळे अन्नधान्य यांचा उपयोग करावा
२ गाय व्याल्यानंतर तिची जी वार पडते ती चरबीयुक्त असते म्हणून त्या वारे मध्ये आपले हात व पाय बुडवून ठेवावे काही तास जर बुडवून ठेवले तर त्यामुळे बरेच दिवस जळवाती चा त्रास होत नाही
३ आपण जर चप्पल वापरत असून तर घर्षणामुळे त्वचा कोरडी बनते म्हणून चपली ऐवजी नरम बूट वापरावा सॉक्स वापरावे व चप्पल पेक्षा बूट वापरण्याची सवय लावावी कधीकधी बूट वापरण्या नेच जळवा तिचा प्रश्न कायमचा मिटतो
४ कोकम तेल गरम करून भेगांमध्ये हळुवार भरावे कोकण तेलाची व्यवस्थितपणे भेगा पडलेल्या किंवा चिरा पडलेल्या या हाताच्या व पायाच्या ठिकाणी मालिश करावी
५ जर चिखल्या झाल्या असतील तर 20 ग्रॅम एरंड तेल व पाच ग्रॅम करंज तेल एकत्र करून लावावे या दोन्ही तेलांची एकत्र करून व्यवस्थितपणे हळुवार मालिश करावे
६ तसेच clove oil म्हणजेच लवंग तेल व हळद पावडर एकत्र करून त्याची पेस्ट सातत्याने रात्री झोपण्यापूर्वी लावावे
Jalwat disease |
७ दररोज सकाळी आंघोळ करण्याच्या अगोदर डाळीच्या पिठाची पेस्ट हाताला लावावी पायाला लावावी ज्यामुळे जळवात बरी होते पण हा प्रयोग सातत्याने एक महिना करावा व साबणाचा वापर टाळावा
जळवात औषध |
८ तूप लोणी किंवा मलम तळहातांना लावा गावरान गायीच्या तुपाने पायाला किंवा हाताला मालिश करा ज्यामुळे आपल्या शहरांमध्ये जो कोरडेपणा आलेला असतो त्वचा रुक्ष कोरडी झालेली असते त्यामध्ये स्निग्धांश वाढतो व त्वचा नरम पडते मऊ होते
९ पायांना जर भेगा पडले असतील किंवा हातांना भेगा पडल्या असतील तर प्रामुख्याने हात व तळपाय कोमट पाण्यामध्ये बुडून धुऊन घ्यावे पाच मिनिटात स्वच्छ धुतल्यानंतर तळपायाला किंवा हातांना खोबरेल तेल मालिश करावी त्यानंतर त्यावर धूळ बसू देऊ नये आणि आणि पायात बूट सॉक्स वापरावे
10 उपयुक्त हळदीचा लेप लावल्याने ही आराम जाणवतो हे सर्व वरील सांगितलेले उपाय आपण नक्कीच करावे पण त्याचबरोबर आपल्या या जीवनशैलीमध्ये देखील बदल करावा कारण की बहुतेक आजार हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये जीवन पद्धती मध्ये आढळतात आपला दररोजचा आहार आपण पण बघितला पाहिजे आहारात बदल केला पाहिजे
याचबरोबर विचारात देखील बदल केला पाहिजे स्वस्थ मन म्हणजेच ताण तणाव विरहित मन स्ट्रेस विरहित मन व निरोगी शरीर यांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे हे विसरता कामा नये म्हणून त्यासाठी आपण पण आपल्या आहारामध्ये काही बदल करूयात काही पथ्ये पाळूया
जळवाती'च्या आजारांमध्ये पथ्य काय पाळावे?
मित्रांनो जळवातिच्या आजारांमध्ये काही पथ्य पाळले पाहिजे उदाहरणार्थ खूप रूक्ष आहार टाळावा
उदाहरणार्थ बाजरी ची भाकर उष्ण असते म्हणून तिच्या ऐवजी गव्हाची किंवा ज्वारीची भाकर आहारात असावी डाळीचे पदार्थ शेव भेळ भत्ता तुर मसूर काही दिवस वर्ज करावे पापड वर्ज करावा शिळे व आंबट पदार्थ टाळावे अति मीठ खाणे टाळावे अंघोळीच्या वेळी साबण लावू नये
अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर निश्चितच फार लवकर आपल्याला या आजारात आराम मिळतो त्याचबरोबर मित्रांनो वरील सर्व माहिती आपापल्या प्रकृतीनुसार तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आत्मसात करावे तिचा उपयोग करावा तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला आपला अभिप्राय नक्कीच आम्हाला कळवा नमस्कार
Symptoms of burns Home Remedies
Jalwat |
No comments:
Post a Comment
याविषयी आपण काही कमेंट करू शकता