सर्दी का होते कारण लक्षणे उपाय
मित्रांनो सर्दी होणे हा एक सामान्य आजार आहे सर्वसाधारणतः हा आजार आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे देखील होऊ शकतो किंवा प्रकृतीमध्ये झालेल्या बदलाने हमखास होतो उदाहरणार्थ एक ऋतू बदलला की दुसर्या ऋतूची चाहूल लागली की त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे शरीरात देखील बदल होतात आणि त्यामुळे सर्दी सारखा आजार किंवा लक्षणे जाणवतात हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होऊ शकतो आणि त्यामध्ये फार काही घाबरण्यासारखे नसते
सामान्य घरगुती उपाय यापासूनही या आजारावर आराम मिळतो पण आपण आजच्या मॉडर्न युगामध्ये थोडेसे लक्षण दिसले तरी लगेच डॉक्टर कडे जातो पण ठरलेल्या वेळेमध्ये हा आजार आला तसा निघूनही जातो म्हणून या आजाराकडे फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही उलट आपल्या शरीराची स्वच्छता मात्र होते .
सर्दी हा आजार नेहमीच्या ऋतूनुसार कमीत कमी आठ ते पंधरा दिवस राहतो त्यातही सुरुवातीला फक्त नाकातून पाणीच वाहते नंतर डोके दुखू लागते डोके जड पडते फटफट करते त्यानंतर हळूहळू सर्दी घट्ट होऊ लागते सर्दी पिवळसर व पु युक्त होऊ लागते सर्दीमुळे कान बंद होऊ लागतं श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागतो पिवळसर पदार्थाचा दुर्गंध सुटतो त्यानंतर हा चिकट पिवळसर पदार्थ वाळून त्याचा पापुद्रा तयार होतो त्यालाच आपल्या भाषेमध्ये मेकुड म्हणतात
हवेतील प्रदूषणामुळे धूळ कचरा कीटकनाशके पेस्टिसाइड बुरशीनाशके यामुळे देखील सर्दी होऊ शकते व ती क्षणिक असते म्हणून अशा प्रकारची सर्दी होण्यापासून आपल्याला काय उपाय करता येईल ते केले पाहिजे उदाहरणार्थ मोकळ्या हवेत विहार करणे कीटकनाशके पेस्टिसाइड बुरशीनाशके यांच्यापासून स्वतःचा बचाव करणे जिथे खूप कचरा दुर्गंधीयुक्त वातावरण असेल तेथून देखील दूर गेले पाहीजे
मात्र काही लोकांना सर्दीची अलर्जी असते त्यांना कायमच सर्दी झालेली पाहायला मिळते त्यामुळे अशा व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जर आपल्याला कायम टाईम सर्दी होत असेल नाक गळत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नये त्यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा औषधोपचार करावे
|
सर्दी चे कारण
वरील कारण वगळता सर्दी हा विषाणूमुळे याच्याकडून त्याच्याकडे पसरतो हे विषाणू श्वासावाटे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात एका व्यक्तीला झालेली सर्दी त्याच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली असता त्याला पण सर्दीचा विकार जडतो संक्रमण होते एक-दोन दिवसात त्याला पण सर्दी झालेली पाहायला मिळते आपल्या कुटुंबात पण हा अनुभव आपल्याला येतो
|
सर्दीची लक्षणे
सर्दी होण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्यालाही सर्दीचे काही लक्षणे जाणवतात दिसतात नेहमीच्या सर्दी मध्ये सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात विषाणूंच्या संक्रमणामुळे ही लक्षणे जाणवतात यामध्ये हे नाका मध्ये खाज येणे नाक घसा कोरडा पडणे शिंका येणे डोके जड पडणे डोळ्यांमध्ये जळजळ होणे आणि नाकातून पाण्यासारखा श्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागणे बारीक ताप जाणवणे डोकेदुखी तीव्र स्वरूपाची होणे भूक न लागणे ही लक्षणे स्वाभाविकपणे जाणवतात आणि तीन चार दिवसानंतर आपोआप ही लक्षणे कमी होतात आणि नाकातून गळणारे पाणी हळूहळू घट्ट होते नंतर पुढे पु युक्त बनने अशी काही नेहमीच्या आजारांमध्ये लक्षणे दिसतात
सर्दी वर उपाय - उपचार
कधी कधी सर्दी वर लंघन करणे किंवा उपवास केल्याने ही बरी होऊ शकते एका ऋतूतन दुसऱ्या ऋतूत संक्रमण करताना म्हणजे समजा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतांना किंवा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना सर्दी होते तेव्हा फार भिण्याचे कारण नसते अशी सर्दी जशी येते तशी निघूनही जाते व शरीर स्वच्छ होते काही बदल होणे हे आपल्यासाठीच योग्य असते
जलनेती चा प्रयोग
कायम काय होणाऱ्या सर्दी साठी हा उपयोग उपयोग करावा कोमट मिठाच्या पाण्यात किंवा पाण्याने नाकाच्या अंतर्भागाची स्वच्छता केली जाते यालाच आपण जलनेती प्रयोग म्हणतो थोडे कोमट मिठाचे पाणी करून नंतर हे पाणी थोडे थोडे चालू असलेल्या नाकपुडी मधून आत मध्ये सोडावे शासन श्वास तोंडाने चालू ठेवावा म्हणजे हे पाणी दुसऱ्यां नाकपुडी मधून बाहेर चालू होते त्यानंतर पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने हाच प्रयोग करावा यामुळे घाण बाहेर पडायला सुरुवात होते व आतील स्वच्छता होते वाकून उभे राहिले असता पाणी घशात जात नाही नाकपुडीद्वारेच बाहेर येते फक्त मीठाचे प्रमाण अति खारट करू नये नाहीतर नाकात वेदना होतात
नाकामध्ये गावरान गाईच्या तुपाचे एक किंवा दोन थेंब टाकावे किंवा नसेल तू तर खोबरेल तेल एक दोन थेंब टाकावे त्यासाठी उताणे झोपून पाठी खाली उशी ठेवून हा प्रयोग करावा डोके खाली करून हा प्रयोग केला असता सर्दी मध्ये आराम मिळतो
विषाणूयुक्त सर्दी साठी औषधे नाहीत ही सर्दी काही कालावधीसाठी असल्याने फक्त काही लक्षणे बघून त्यावर उपचार करता येतात उदाहरणार्थ ताप डोकेदुखी नाकातून पाणी गळणे अंग ठणकणे यासाठी त्या लक्षणानुसार औषधोपचार करता येतो सर्दी कायमची बंद करता येत नाही वारंवार होणाऱ्या सर्दी साठी कान नाक घसा तज्ञांकडे दाखवावे
सर्दी वर घरगुती उपाय
मित्रांनो सर्दी वर घरातीलच काही उपाय करूनही सर्दी थांबते पण आपण बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे साबणाने धुतले पाहिजे त्यामुळे विषाणू पासून होणारी सर्दी ला प्रतिबंध होईल हळद
आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे हळद हि भरपूर गुणांनी उपयुक्त आहे हळद ही आयुर्वेदिक अँटीसेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल आहे अशा हळदीमध्ये मग थोडसं गुळ व थोडीशी हळद एकत्र करून त्याच्या गोळ्या बनवा व त्या सेवन करा त्यामुळे कफ खोकला सर्दी वर आराम मिळतो.
आलं
आलं हे थोडं तिखट युक्त गुणाची असते गुणधर्माचे असते आल्याचा चहा करून पिणे अनेक उपयुक्त गुणधर्मांनी आलं परिपूर्ण आहे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी आलं उपयोगात आणावे. याने देखील सर्दी मध्ये आराम मिळतो लिंबू
लिंबामध्ये सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ कमी होतो
लसूण
आपल्या स्वयंपाक घरात लसूण हा लागतोच अशा लसणाच्या चार-पाच पाकळ्या सर्दी खोकला असेल तर खावा त्यामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त गुण आहेत कांदा
कांदा आता हा जीवनावश्यक वस्तू म्हणून आपल्या रसोई किंवा स्वयंपाक घरांमध्ये असतोच अशा कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून अनशापोटी सेवन करावे यामुळे देखील सर्दीच्या आजारांमध्ये आराम मिळतो
लवंग
लवंग ही तिखट गुणधर्माची असते कपभर पाण्यात चार-पाच लवंगा टाकून ज्या उकळून घ्याव्या त्यात कोमट झाल्यावर त्यात अर्धा लिंबू पिळून एक चमचा मध टाकून पिणे यामुळे सर्दी आजारांमध्ये आराम मिळतो मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलामध्ये चार-पाच पाकळ्या लसुन टाकून ते उकळून घ्यावे व कोमट झाल्यावर छातीवर व पायाला तळव्यांना मालिश करावी त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होऊ लागतो
तुळस
तुळस ही आरोग्य वाढवणारी वनस्पती प्रत्येकाच्या अंगणात असावी तिच्यामुळे ऑक्सिजनची लेव्हल वाढते अशा तुळशीच्या पानांचा काढा करून प्यावा त्यामुळे सर्दी या आजारावर आराम मिळतो हळद आणि दुध
आणि गरम केलेल्या दुधात रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि दुध द्यावे गरम दुधामध्ये अर्धा ते एक चमचा हळद टाकून हलवून सेवन करावे आराम मिळतो
पुरेशी विश्रांती
आपल्याला सर्दीची लक्षणे दिसू लागल्यानंतर आपल्या शरीराला आरामाची गरज असते म्हणून अशावेळी शरीराला पुरेशी विश्रांती घेतल्याने ही आराम मिळतो मीठ आणि पाणी
मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करणे यामुळेही आराम मिळतो तेव्हा मित्रांनो वरील माहिती आपापल्या आपल्या शरीर प्रकृतीनुसार फॅमिली डॉक्टरांच्या सल्लामसलततिने व मार्गदर्शनाने प्रयोग करावा आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आपला अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा नमस्कार |
|