Immunity power- प्रतिकार शक्ती म्हणजे काय
रोगप्रतिकारक्षमता |
मित्रांनो आज जसजसे आपण विज्ञानाच्या जोरावर जी औद्योगिक प्रगती करत आहोत आणि स्वतःला निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपल्या समस्या आणखीनच वाढत आहे एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच दुसरी समस्या उभी राहते आहे विशेषतः आरोग्याच्या बाबतीत पूर्ण मानव जात आज धोक्यात आली आहे दरवर्षी कोणता ना कोणता विषाणू थैमान घालतो आहे आणि ह्या विषाणूमुळे असंख्य लोक मरण पावत आहे पण अशाही परिस्थितीमध्ये काही लोकांमध्ये व्यक्तींमध्ये आजारा बरोबर लढण्याची शक्ती आहे ते प्रचंड असते कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी सिस्टम मजबूत असते पण काही लोकांना मध्ये तसे नसते याचे काय कारण असू शकते हा संशोधनाचा विषय आहे एकाच घरांमधील पाच व्यक्ती पण एकाला इन्फेक्शन होते आणि बाकीच्यांना होत नाही यामागे देखील हेच कारण आहे की त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती रोगाबरोबर लढण्याची शक्ती भरपूर आहे वृद्ध माणस बालक त्यांची प्रतिकारशक्ती कमीच असते अशी शक्ती कशी तयार होते का ती देवदत्त असते का आपल्याला प्राप्त करता येते निश्चितच यामध्ये खूप सारे घटक या इम्मुनिटी सिस्टिमला कारणीभूत असतात हे आपण थोडक्यात बघू या
मित्रांनो यामध्ये जेनेटिकली देखील वंशपरंपरागत एखाद्या पिढीमध्ये हे गुण उत्क्रांत होतात उदाहरणार्थ आपण आजही असे म्हणतो इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची इम्युनिटी सिस्टम म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत असते किंवा आहे कारण येथील संस्कृतीमध्ये समाज टिकविण्यासाठी किंवा समाजामध्ये काही विशिष्ट गुण उत्क्रांत होण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले होते जसे की विवाह संस्कार आपल्याला फार खोलात जाऊन विचार करावा लागेल त्यासाठी संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल ऋषीमुनींची दूरदृष्टी जाणून घ्यावी लागेल हे झाले एक कारण पण पण अजूनही ही खूप खूप फॅक्टर या गोष्टीला जबाबदार आहे जसे की व्यक्ती जिथे राहतो येथील हवामान तेथील सृष्टी अन्नधान्य फळे इत्यादी सर्व घटकांवर प्रतिकारशक्ती ठरत असते विशेषतः काही लोकांमध्ये जन्मजात देवदत्त ही शक्ती मिळाली असते पण तिला आपण आजच्या आपल्या खान पाणामुळे किंवा लाईफस्टाईल मुळे बिघडवून टाकतो म्हणूनच तिला सांभाळून ठेवले पाहिजे जसे की आपण अंधारात प्रकाश पाहिजे म्हणून बॅटरी चार्जिंग करून ठेवतो म्हणजे अंधारामध्ये तिचा उपयोग होतो त्याच प्रमाणे आपल्या प्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी आपले जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल कारण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवन शैली हा खूप मोठा फॅक्टर आहे अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्यामुळे आपल्या immunity सिस्टीम वर प्रभाव पडतो चला तर मित्रांना जाणून घेऊया या गोष्टी ह्या सवयी |
रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारे घटक
1 पहिली गोष्ट मित्रांनो व्यसन व्यसनामुळे व्यक्ती आप लं शरीराकडे दुर्लक्ष करतो आयुष्य खराब करून टाकतो उदाहरणार्थ दारू सिगारेट तंबाखू खूप अमली पदार्थांचे सेवन कुठलीही गोष्ट जर तिचा मर्यादित उपयोग केला नाही तर ती आपल्या immunity सिस्टमला खराब करून टाकते म्हणून व्यसन देखील मर्यादित असावे
2 अवेळी झोपणे यावेळी उठणे अति जागरण यामुळे प्रतिकार शक्ती कमकुवत होते
3 अति थंड पेय पदार्थ पिणे मसालेदार चटकदार तिखट पदार्थांचे सेवन करणे पचनास जड असे पदार्थांचे सेवन मानव प्रकृतीच्या विरोधी आहार यामुळेही प्रतिकार शक्ती कमी होते किंवा तिच्यावर परिणाम होतो
4 शरीराच्या वेदना दूर करण्यासाठी अति गोळ्यांचे सेवन करणे
5 मनाचा ताण मनावर ताणाचा परिणाम होतो म्हणून मानसिक संतुलन बिघडणे हाही प्रतिकारशक्ती कमी होण्यास कारणीभूत होणारा घटक आहे
6 दिवसभर एकाच जागी बसून राहणे त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते प्रतिकारक्षमता घटते
7 संतुलित आहार न मिळणे व पोषण न झाल्यामुळे व्यक्ती आजारी पडतो विषाणू शरीरात प्रवेश करतात
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील
1 जीवन शैलीत बदल संतुलित आहारा बरोबर पुरेसा व्यायाम व आसन करावेत मानसिक शारीरिक ताणामुळे प्रतिकारक्षमता घटते म्हणून मन शांत ठेवावे स्वस्थ जीवनशैली अंगीकारावी
2 त्यानंतर आपला आहार हा समतोल असावा केवळ एकाच पदार्थाचे मेनू असणारे आहार घेऊ नये आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असावा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये भाजीपाला पालक चा समावेश करावा वापरावा हिरव्या मिरचीचा वापर करावा
3 विटामिन सी युक्त आहार घ्यावा फळे घ्यावी संत्री-मोसंबी लिंबू आवळा अशा पदार्थांचे सेवन आपल्या आहारामध्ये असावा यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते
4 नियमित दह्याचा आहारात सेवन केल्याने प्रतिकार शक्ती वाढते
5 हळद हि anti आक्सिडेंट गुणांनी भरपूर आहे ती रक्त शुद्ध शुद्ध करण्याचा गुणधर्म अंगी बाळगते त्यामुळेच हळदीला इम्मुनिटी सिस्टिम बुस्टर म्हणतात
6 प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी लसुन खाण्याचाही उपयोग होतो
7 बदाम खारीक किंवा मनुका त्याचबरोबर कडधान्य शेंगदाणे या पदार्थांचाही आहारात समावेश करावा कच्चे पदार्थ खावे
8 पुरेसा सूर्यप्रकाश घ्यावा सूर्यप्रकाशात बसावे सूर्य स्नान करावे सूर्यनमस्कार करावा
9 मन शांत ठेवावे व योगा करावा वेगवेगळे योगासने करावी
10 कमीत कमी सात ते आठ तास दररोज झोप घ्यावी पुरेशी झोप घ्यावी अति कामाचा ताण स्वतःवर लादून घेऊ नये
11 गुळवेल या वनस्पतीचा प्रतिकार शक्ती वाढवणे मध्ये फायदा होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेलीचा सर्व अंगांचा पान खोड फुल उपयोग होतो खोडाचे बारीक बारीक तुकडे करून दररोज काही दिवस काढा घ्यावा किंवा अशक्तपणा आला असेल तर पपईच्या पानांचा रस उपयोगी ठरतो
12 प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स चा वापर करणे चांगले ठरू शकते कारण की की त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यांचा वापर नियमितपणे करावा
अशाप्रकारे मित्रांनो जर आपण आपल्या या आहार-विहारात आणि आचारात जर बदल केला तर निश्चितच प्रतिकार शक्ती वाढत जाते आणि रोगान प्रति लढण्याची शक्ती भक्कम होते आणि शरीरातील कमजोरी दूर होते म्हणून आपण वरील सर्व उपाय आपल्या जीवन शैली मध्ये निश्चित अमलात आणावे तसेच वरील सर्व उपाय करताना तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा तेव्हा मित्रांनो आपल्याला हा लेख आवडला असेल तर निश्चितच आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला सुचवा नमस्कार