Sunday, October 4, 2020

फिशर व भगंदर म्हणजे काय कारण लक्षणे व उपाय काय

फिशर व भगंदर म्हणजे काय कारण लक्षणे व उपाय काय?


फिशर म्हणजे काय?



फिशर म्हणजे काय
Fisher


फिशर हा एक मुळव्याधी चाच प्रकार आहे ज्यामध्ये अति बद्धकोष्टता असेल पोट साफ होत नसेल तर आतील मलाचे खडे बनतात जे खूप कडक असतात व ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते गुदद्वाराच्या आतील भिंतीला घासून जातात त्यामुळे आतील नरम जागेला कट लागतो त्वचा फाटते व तिथे जखम तयार होते त्यामुळे मला पास करण्यासाठी रुग्णाला खूप त्रास होतो वारंवार त्रास होतो तिथल्या नाजूक जागेला जखम तयार होते तिलाच आपण फिशर म्हणतो



फिशर चे कारण काय?



फिशर चे प्रमुख कारण  म्हणजे बद्धकोष्टता ज्यांना त्यांचे पोट साफ होत नाही त्यांना हा आजार भविष्यात कधी ना कधी होतोच


1 फिशर चे पहिले कारण म्हणजे व्यक्तीला मसालेदार तिखट चमचमीत पदार्थ खूप आवडतात डाळीचे पदार्थ भत्ता भजे खूप आवडतात



2 वेळेवर जेवण करणे उपवास करणे रात्री जागरण करणे अतिशय कष्टाचे काम मेहनत करणे हेही कारण असू शकते



3 अतिथंड पाणी पिणे थंड पदार्थांचे सेवन करणे उष्णता वाढेल अशा प्रकारचा आहार घेणे याही गोष्टी फिशर ला कारणीभूत होतात



4 तासन्तास एकाच जागी बसून नोकरी करणे किंवा बैठे काम असणे स्थूलपणा वजन वाढणे या कारणामुळे देखील फिशर ची समस्या होते



5 गुदद्वाराच्या आतील बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावर अति दाबामुळे प्रेशर पडतो त्यामुळे त्या फुगतात व व त्यातून रक्त येते जखम होते आतून जखम होते तसेच गुरुद्वाराच्या तोंडाशी जखम होते किंवा असू शकते


फिशर चे लक्षणे काय?


फिशरच्या आजारांमध्ये रुग्णाला कुंथावे लागते संडास साफ होत नाही थोडी थोडी संडास येते कुंथावे  लागल्यामुळे रक्तवाहिन्या वरती दाब पडतो गुद द्वाराच्या आजूबाजूला असलेल्या रक्तवाहिन्या फुगतात व त्यांना जखम होते मल त्यांना ओरबाडून बाहेर येतो त्यामुळे नाजुक नरम त्वचा लाल लाल होते थेंब थेंब रक्त बाहेर येते  त्वचेला कट लागतो जखम होते व जखम झाल्यामुळे व्यक्ती संडासला जाण्यास घाबरतो त्याच्या अंगाावर काटा येतो शहारे येतात



गुदभागी सूज येते ठणक लागतो शौचाला जाऊन आल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास किंवा अर्धा दिवस अस्वस्थता येते ठणक लागतो चालले असता बरे वाटते एका जागी बसवत नाही



कधीकधी लघवीला देखील थेंब थेंब होते लघवी साफ होत नाही संडासला जाण्याचा धाक उभा राहतो मल पास होताना ब्लेड चिरल्या सारखा भास होतो संडास झाल्यानंतर बरे वाटते पण ठणक मात्र जात नाही 



शौचाला लागून रक्त येते कडक मल असेल तर खूप वेदना होतात पातळ संडास झाली तर बरे वाटते
खूप खूप आग होते या आजारांमध्ये रक्त आणि आग ही लक्षणे प्रमुख असतात


फिशर वर घरगुती उपाय काय करता येईल


फिशर मध्ये देखील आहाराची पथ्य पाळली पाहिजे जास्त मसालेदार व तिखट पदार्थ टाळले पाहिजे 


 जास्तीत जास्त फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे फळे भाजीपाला सेवन करणे 


आहारामध्ये डाळीचे पदार्थ कमी सेवन करणे मैदा युक्त पदार्थ टाळणे 


शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे 


दूध ताक आणि दुधाचे सर्व पदार्थ आहारात घेणे 
फिशर ला संस्कृत मध्ये परिकर्तिका म्हणतात फिशर मध्ये जखम झाल्यामुळे ती जखम भरून येईपर्यंत मल पातळ होणे गरजेचे असते कारण मल पातळ झाल्यामुळे नवीन जखम तयार होत नाही आणि नवीन जखम  न होण्यासाठी काही दिवस आहारात जर तांदळाची भाकर उपयोगात आणली तर फार चांगले त्याचबरोबर जखम भरण्यासाठी शौचास जाऊन आल्यानंतर एका टबमध्ये  कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकने पाण्यात तुरटी फिरविणे व त्यात बसणे  शेक घेणे कमीत कमी सात ते आठ दिवस हा प्रयोग केला असता ज्यामुळे जखम बरी होण्यास मदत होते 



त्याचबरोबर रात्री झोपताना व सकाळी शौचास जाऊन आल्यानंतर जखमेला आत मध्ये जात्यादि ऑइल लावले असता  त्याचबरोबर एक चमचा त्रिफळा चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात टाकून पिल्याने ही आराम मिळतो 


त्याचबरोबर त्रिफळा गुगुळ जेवणानंतर सकाळ-संध्याकाळ दोन-दोन टॅबलेट घेणे ही सर्व औषधे आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होतील याने फिशर मध्ये खूप आराम मिळतो यावर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील औषधे घेऊ शकतात
उपाय करूनही जर  आजार थांबत नसेल तर अत्याधुनिक लेसर ट्रीटमेंट हा छान पर्याय आहे  लेसर ट्रीटमेंट ने ऑपरेट करावे यामध्ये जखमेला जाळून टाकले जाते.



भगंदर म्हणजे काय?


भगंदर वर उपाय
Bhagandar


हा आजार गुरुद्वाराची संबंधित आहे या आजारांमध्ये  मधून बाहेरील त्वचा पर्यंत एक नलिकेचा मार्ग तयार होतो असे असंख्य मार्ग तयार होऊ लागतात त्यात पू साचू लागतो गुदमार्ग च्या बाहेर आजूबाजूला एक पुळी तयार होते व ती दुखू लागते तेव्हा थंडी ताप देखील येऊ शकतो व व पुढे फुटून त्यातून पाणी बाहेर येते पू बाहेर येतो यालाच भगंदर म्हटले जाते


 भगंदर आजाराची लक्षणे


    १ या आजारांमध्ये गुुद्वारामध्ये जखम होते व व आत मध्ये ती जखम सडते  व मांसल भागांमध्ये भागांमध्ये दुसरा मार्ग तयार होतो ही जखम चिरत जाऊन  एक कॅनल तयार होतो अशी अनेक कॅनल तयार होतात व गुदद्वाराच्या बाहेरील दुसऱ्या बाजूला बेंड होते पुटकुळी येते पिकते हे होत असताना रुग्णाला थंडी ताप येतो जेव्हा  पुटकुळी फुटून आतील पु बाहेर पडतो तेव्हाच आपल्याला आराम मिळतो बरे वाटते एक प्रकारे वारोळा प्रमाणेच हा आजार   आहे आतील जखमी पासून तर बाहेरील पुटकुळी पर्यंत अनेक नलीकाच आत मध्ये तयार होतात यालाच मल्टिपल फिस्तुला  असेदेखील म्हणतात आजाराकडे लवकर लक्ष दिले नाही तर आजार वाढतच असतो व नवीन कॅनल तयार करत असतो  रुग्णाला बसता येत नाही माकड हाड दुखते अस्वस्थता जाणवते गुदभागी खाज आग आणि ठणक ही लक्षणे दिसतात


  आजारांची कारणे


या सर्व आजारांचे कारणे कॉमन आहे बद्धकोष्टता ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनाच हा आजार विशेषता होतो रात्रीचे जागरण सतत बैठे काम व्यायामाचा अभाव खूप मसालेदार पदार्थ सेवन करणे तळलेले पदार्थ अतिप्रमाणात किंवा दररोजच हॉटेलमध्ये जेवणे अतितिखट रुक्ष आहार घेणे पचायला जड तसेच मांस, मासे असे मानवी प्रकृतीला विरोधी आहार घेणे शौचाच्या वेळेस जोर लावणे ,कुंथने अशी एक वा अनेक कारणे आहेत



मूळव्याधीमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये काही औषधे घेऊन पण बरे होतात केवळ पथ्य पाळल्याने ही सुधारणा होते 



पालेभाज्या फळे ज्यांच्यामध्ये फायबर जास्त आहे आहे असे पदार्थ जास्त सेवन केल्याने ही आराम मिळतो पण आजार जुनाट असेल कोंब जास्त असतील तर ऑपरेशन करणे गरजेचे असते पण भगंदर हा आजार सर्वात भयंकर असतो


भगंदर उपाय


 या मध्ये रुग्णाला डॉक्टर कडे जावे लागते
अल्ट्रा सोनोग्राफी करून आत मध्ये पु किती आहे ते समजून घेतात.


 तसेच Fistulogram म्हणून दुसरी एक तपासणी केली जाते ज्यामध्ये बाहेरून नलिकेमध्ये औषध सोडले जाते व त्याची क्ष-किरण फोटो घेतले जातात.


MRI Perinneum ही तपासणी महाग असते पण त्यात रुग्णाचे निदान व्यवस्थित होते यामध्ये कायम कायम आजार होत असेल तर ही तपासणी करायला हवी.


भगंदरमध्ये पुचा एखादा अंश जरी शिल्लक राहिला  तरी आजार पुन्हा डोके वर काढतो
भगंदरांमध्ये क्षारसुत्र चिकित्सा फायदेशीर असते
यामध्ये गुदद्वाराच्या आतील जखमांपासून तर बाहेरील पुळी पर्यंत म्हणजे नलिकेमध्ये च औषध टाकले जाते टाकले जाते. क्षारसूत्र प्रयोगामध्ये नलिका कट करणे व जखम बरी करणे हा प्रकार वापरला जातो यामुळे आजार बरा होण्यास मदत होते 


‌एक क्षारसुत्र आठ दिवस काम करते आठ दिवसांनी परत बदलावी लागते .लेसर ट्रीटमेंट देखील फायद्याची असते असते यामध्ये रक्तस्राव होत नाही क्षार सूत्र आठवड्यातून बदलावे लागते यामध्ये भूल देऊन देखील उपचार केला जातो टाके घालने किंवा कापाकापी करणे गरजेचे नसते. 


मित्रांनो आपल्याला आजार होऊ नये यासाठी आपले पोट साफ कसे राहील याकडे लक्ष द्या



  तेव्हा मित्रांनो ही सर्व माहिती आपल्याला उपयोगी पडली तर माझा हा लेख  बनवणे सफल झाले असे मी समजेन त्याचबरोबर वरील सर्व माहिती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आत्मसात करावी व आपल्या प्रकृतीनुसार या माहितीचा उपयोग करावा त्यासाठी हा लेख आवडला असेल तर कमेंट द्वारे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन  ज्ञानपूर्ण लेख आपल्यापर्यंत घेऊन येऊ नमस्कार. 



डेंग्यूचा(Dengue) virus tests लक्षणे कारण उपाय काय

 

डेंग्यूचा(Dengue) virus tests लक्षणे कारण उपाय काय



डेंग्यू म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी मित्रांनो डेंगू म्हणजे हाडमोडी ताप हा एक विषाणूजन्य रोग असून तो एडीस इजिप्ती या डासांपासून पसरतो


डेंग्यू वायरस
Dengue



डेंगू(Dengue) चा डास


डेंगूचा डास हा रंगाने काळा असतो व त्याच्या शरीरावरती ओळख म्हणून पांढरे पट्टे असतात व त्याचा आकार कमीत कमी पाच मिलीमीटर पर्यंत असतो 

हा डेंग्यूचा डास आपल्या शरीरामध्ये विषाणू तयार करण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात त्यानंतर मात्र हा विषाणू झपाट्याने वाढू लागतो 

या डासाचे महत्वाची लक्षण म्हणजे हा आपल्याला दिवसा चावतो वारंवार चावतो व मादी डासांच्या चावण्यामुळे  हा व्हायरस पसरतो या डासाच्या राहण्याची जागा म्हणजे पाण्याची टाकी डबके जुने फेकून दिलेले गाडीचे टायर सायकलीचे टायर अडगळीची जागा कुलर चे पाणी सडलेले पाणी अस्वच्छता असलेल्या जागा या डासांसाठी अनुकूल असतात पावसाचे डबक्यात साचलेले पाणी या जागी हा डास वास्तव्य करतो


डेंग्यू डासांची अंडी पाण्या विना एक वर्षभर राहू शकतात तसेच तसेच समुद्रसपाटीपासून हजार मीटरपर्यंत हे वास्तव्य करू शकतात किंवा जिवंत राहू शकतात नारळाच्या करवंट्या जुनी भांडी प्लास्टिक पिशव्या ड्रम जुनी झालेली फेकून दिलेले कप बश्या फ्रीजचे पाणी जिथे साठते ते भांडे कुलर मध्ये असलेले खूप दिवसाचे अस्वच्छ पाणी अशा अस्वच्छ जागी याचे वास्तव्य आढळते


डेंग्यू (Dengue)आजार विषयी माहिती


डेंग्यू हा आजार सुरुवातीला चीन मध्ये जीन राजवंशाच्या मध्ये पाहायला मिळाला सतराव्या शतकामध्ये या आजाराचा उद्रेक झाला होता त्यावेळेस साथ पसरली होती व त्याचे अनेक पुरावेही पाहायला मिळतात


सतराशे ऐंशी सालि या आजारामुळे अनेक लोक आजारी पडले होते अनेक लोक मृत्युमुखी पडले होते व आशिया खंडामध्ये आफ्रिका व अमेरिका मध्ये या आजारामुळे अनेक लोक मरण पावले होते त्यानंतर पुढे बऱ्याच संशोधनाअंती एडीस इजिप्ती या नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार होतो हे सिद्ध झाले


डेंगू(Dengue) कशामुळे होतो?


आज बदलत चाललेल्या प्रदूषणामुळे  वेगवेगळ्या  आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे  त्यातच एक म्हणजे  डेंगू वायरस होय डासांचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच  व्यक्तीची अस्वच्छ राहणीमान व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होणे वातावरणातील बदल व बदलते हवामान एकाच जागी अनेक दिवसांचे पाणी साचून राहणे डबके होणे ही जी काही कारणे आहेत जी त्यामुळे डेंग्यू पसरतो किंवा डेंग्यूची साथ पसरते


डेंग्यू( Dengue)वायरस आजाराची लक्षणे




डेंग्यू आजाराविषयी माहिती
Dengue fever

शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते ताप येणे अंगदुखी अशक्तपणा जाणवणे


डेंगू झालेल्या व्यक्तीची हाडे सांधे दुखणे शरीरावरती लाल पुरळ येणे ही लक्षणे जाणवतात


डेंग्यू व्हायरस पॉझिटीव्ह आल्यानंतर जोराचा ताप येणे ही लक्षणे दिसू शकतात


आजारी व्यक्तीच्या डोक्याचा पुढचा भाग दुखणे ही पण लक्षणे असू शकतात


आजारी व्यक्तीची डोळे दुखणे भूक न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात


 उलट्या मळमळ देखील होऊ लागतात 


शरीराची श्वास घेताना त्रास होणे पोट दुखणे


 व्यक्तीला अस्वस्थता वाटणे व झोप येते


आजार गंभीर झाला असतां रक्तदाब कमी होणे 


रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे 


डेंग्यूच्या तापामध्ये नाडी मंद चालणे 


त्वचेवर पुरळ किंवा व्रण येतात किंवा अशी समस्या होऊ शकते 


तीव्र स्वरुपाची डोकेदुखी


थकवा येणे व रोग येऊन गेल्यानंतर अशक्त जाणवणे हा रोग कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत राहू शकतो


रक्तस्रावत्मक डेंगू(Dengue) तापाची लक्षणे


रुग्णाला तहान लागणे कोरड पडणे भयंकर तीव्र स्वरूपाची पोटदुखी होऊ शकते नाडी मंद चालणे झोप येणे अस्वस्थता जाणवणे नाक हिरड्यांमधून रक्त येणे श्वासोच्छवास मध्ये त्रास होण असे गंभीर स्वरूपाचे लक्षण आढळतात


अतिगंभीर स्वरूपामध्ये नाडी मंद व अस्वस्थता व रक्तदाब कमी होणे यासारखी किंवा बेशुद्धी येणे यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात ही लक्षणे गंभीर व धोकादायक असू शकतात 


रक्तस्राव होत असेल तर आजार बरा होण्याची वाट बघू नये लगेच तज्ञ डॉक्टरांकडे उपचार करून घ्यावे

डेंग्यू (Dengue)विषाणू ची टेस्ट 

 आजाराची लक्षणे ही काहीशी मलेरिया टाइफाइड या सारखेच असल्यामुळे तो समजत नाही त्यामुळे डेंग्यू आजाराची साथ पसरली असेल किंवा आपल्याला शंका असेल तर त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतात त्यामध्ये

NS या टेस्टमध्ये तापामध्ये रुग्णाला एक ते चार दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकतो

IGM ही टेस्ट रुग्णाला पाच ते 14 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येते

IGG ही टेस्ट दहा दिवसांमध्ये पॉझिटिव येते व कमी जास्त प्रमाणात पॉझिटिव दाखवते  

या आजारांमध्ये लस नाही प्रतिजैविके नाही त्यामुळे रुग्णाला आरामाची गरज असते व भरपूर विश्रांती घेऊन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपाय केले जातात त्यामुळे व्यक्तीमध्ये स्वतः प्रतिकारशक्ती तयार होते व रुग्ण बरा होतो

डेंग्यू(Dengue) आजारांमध्ये घरगुती उपाय काय करता येईल?


मित्रांनो डेंग्यू हा बरा होणारा आजार आहे एकदा झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यासंदर्भात प्रतिकारशक्ती तयार होते त्यामुळे फार घाबरून जाण्याचे कारण नसते


आपले अंग हात पाय उघडे राहू नये म्हणून आपल्या अंगात पूर्ण कपडे घालावे जेणेकरून डास चावणार नाही हातभर कपडे घालावे  पायात सॉक्स वापरावे बारीक बारीक छीद्रांची मच्छरदानी  वापरावी तसेच घराच्या आजूबाजूला असलेले डबक्यात पाणी जुनी भांडी टायर यांच्यात साचलेले पाणी यांचा नायनाट करावा


 तसेच आपल्या घरी कूलर असेल तर  आठवड्यातून एकदा  कुलर मध्ये असलेले  पाणी बदलावे अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी


आजारांमध्ये आपण  शक्य होईल तेवढा आराम करावा शरीराला अशा प्रसंगांमध्ये आरामाची गरज असते


डासांमुळे हा आजार पसरत असल्यामुळे डासांपासून आपले संरक्षण कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे त्याचबरोबर रुग्णांनी आराम करावा या आजारावर प्रतिजैविके उपलब्ध नाहीत म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये यावर खात्रीशीर  उपाय आहे 


आजारामुळे जे शरीरात बदल होतात उदाहरणार्थ रक्तदाब कमी होतो लिव्हर फेल होते प्लेटलेट्स कमी होतात आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो तर आपल्याला ही कारणे कमी करता आली तर खूप चांगले 


डेंग्यू पासून निश्चित रुग्ण बरा होऊ शकतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये अशा रुग्णाला दिवसातून दोन-तीन वेळेस गुळवेलीचा काढा द्यावा तिच्यामुळे प्रतिकार शक्ती  वाढते गुळवेल ही वनस्पती सर्व आजारावर रामबाण औषध आहे सर्व तापावर हिचा उपाय केला जातो म्हणून प्रतिकार शक्ती वाढवणे मध्ये गुळवेल चे कार्य फार महत्त्वाची आहे म्हणून रुग्णाला गुळवेलीचा काढा देणे हितकारी असते


त्याचबरोबर पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवतो म्हणून पपईच्या पानांचा रस देखील द्यावा या प्रयोगामुळे फार लवकर प्लेटलेट्सची संख्या वाढून येते पपई इ खाल्ली असता प्लेटलेट्स वाढू शकतात  रसयुक्त पपई फळे व फळांचे ज्यूस सेवन करावे पुरेशा प्रमाणात द्रव्य घ्यावे पाण्याची कमतरता भासू नये ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल व अशक्तपणा जाणार नाही


शेळीचे दूध हे देखील  फार उपयुक्त असते रुग्णाला द्यावे यामुळे रुग्णांची परिस्थिती सुधारते आणि रुग्ण पुन्हा स्वस्थ होऊ शकतो‌ तेव्हा हा उपाय केल्याने रुग्णाला लवकरात लवकर आराम मिळतो 


डेंग्यू झालेल्या व्यक्तीस आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल हार शैलीत बदल करावा लागेल मन शांत व सहनशील ठेवावे लागेल


तेव्हा  वरील सर्व उपाय आपण  निश्चित करायला हवे  विशेषतः डेंग्यूच्या विषाणूला आपले शरीरच  त्याच्याशी लढून मारते  पण तोपर्यंत  त्याला सहाय्यक म्हणून ही औषधे आपण  घ्यायला हवेत 

तेव्हा हे सर्व उपाय  आपण अवश्य करून बघा पण मित्रांनो आपल्या फॅमिली डॉक्‍टरांच्या मार्गदर्शन किंवा सल्याने हा उपाय करा व आपले आरोग्य सांभाळा


तेव्हा ही माहिती आवडली असेल किंवा या आजारासंबंधी आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंट करा नमस्कार


Monday, September 21, 2020

Immunity power-प्रतिकार शक्ती म्हणजे काय

 Immunity  power- प्रतिकार शक्ती म्हणजे काय

Immunity power
रोगप्रतिकारक्षमता


मित्रांनो आज जसजसे आपण विज्ञानाच्या जोरावर जी औद्योगिक प्रगती करत आहोत आणि स्वतःला निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आपल्या समस्या आणखीनच वाढत आहे एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो न करतो तोच दुसरी समस्या उभी राहते आहे विशेषतः आरोग्याच्या बाबतीत पूर्ण मानव जात आज धोक्यात आली आहे दरवर्षी कोणता ना कोणता विषाणू थैमान घालतो आहे आणि ह्या विषाणूमुळे असंख्य लोक  मरण पावत आहे पण अशाही परिस्थितीमध्ये काही लोकांमध्ये व्यक्तींमध्ये आजारा बरोबर लढण्याची शक्ती आहे ते प्रचंड असते कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी सिस्टम मजबूत असते पण काही लोकांना मध्ये तसे नसते याचे काय कारण असू शकते हा संशोधनाचा विषय आहे एकाच घरांमधील पाच व्यक्ती पण एकाला इन्फेक्शन होते आणि बाकीच्यांना होत नाही यामागे देखील हेच कारण आहे की त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती रोगाबरोबर लढण्याची शक्ती भरपूर आहे वृद्ध माणस बालक त्यांची प्रतिकारशक्ती कमीच असते अशी शक्ती कशी तयार होते का ती देवदत्त असते का आपल्याला प्राप्त करता येते निश्चितच यामध्ये खूप सारे घटक या इम्मुनिटी सिस्टिमला कारणीभूत असतात हे आपण थोडक्यात बघू या

        मित्रांनो यामध्ये जेनेटिकली देखील वंशपरंपरागत एखाद्या पिढीमध्ये हे गुण उत्क्रांत होतात उदाहरणार्थ आपण आजही असे म्हणतो इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची इम्युनिटी सिस्टम म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती मजबूत असते किंवा आहे कारण  येथील संस्कृतीमध्ये समाज टिकविण्यासाठी किंवा समाजामध्ये काही विशिष्ट गुण उत्क्रांत होण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले होते जसे की विवाह संस्कार आपल्याला फार खोलात जाऊन विचार करावा लागेल त्यासाठी संस्कृतीचा अभ्यास करावा लागेल ऋषीमुनींची दूरदृष्टी जाणून घ्यावी लागेल हे झाले एक कारण पण पण अजूनही ही खूप खूप फॅक्टर या गोष्टीला जबाबदार आहे

 जसे की व्यक्ती जिथे राहतो येथील हवामान तेथील सृष्टी अन्नधान्य फळे इत्यादी सर्व घटकांवर प्रतिकारशक्ती ठरत असते विशेषतः काही लोकांमध्ये जन्मजात देवदत्त ही शक्ती मिळाली असते पण तिला आपण आजच्या आपल्या खान पाणामुळे किंवा लाईफस्टाईल मुळे बिघडवून टाकतो म्हणूनच तिला सांभाळून ठेवले पाहिजे जसे की आपण अंधारात प्रकाश पाहिजे म्हणून बॅटरी चार्जिंग करून ठेवतो म्हणजे अंधारामध्ये तिचा उपयोग होतो त्याच प्रमाणे आपल्या प्रतिकार शक्तीला वाढवण्यासाठी आपले जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल कारण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवन शैली हा खूप मोठा फॅक्टर आहे अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्यामुळे आपल्या immunity  सिस्टीम वर प्रभाव पडतो चला तर मित्रांना जाणून घेऊया या गोष्टी ह्या सवयी



रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारे घटक





1 पहिली गोष्ट मित्रांनो व्यसन व्यसनामुळे व्यक्ती आप लं शरीराकडे  दुर्लक्ष करतो आयुष्य खराब करून टाकतो उदाहरणार्थ दारू सिगारेट तंबाखू खूप अमली पदार्थांचे सेवन कुठलीही गोष्ट जर तिचा मर्यादित उपयोग केला नाही तर ती आपल्या immunity सिस्टमला खराब करून टाकते म्हणून व्यसन देखील मर्यादित असावे


2 अवेळी झोपणे यावेळी उठणे अति जागरण यामुळे प्रतिकार शक्ती कमकुवत होते


3 अति थंड पेय पदार्थ पिणे मसालेदार चटकदार तिखट पदार्थांचे सेवन करणे पचनास जड  असे पदार्थांचे सेवन मानव प्रकृतीच्या विरोधी आहार यामुळेही प्रतिकार शक्ती कमी होते किंवा तिच्यावर परिणाम होतो


4 शरीराच्या वेदना दूर करण्यासाठी अति गोळ्यांचे सेवन करणे


5 मनाचा ताण मनावर ताणाचा परिणाम होतो म्हणून मानसिक संतुलन बिघडणे हाही प्रतिकारशक्ती कमी होण्यास कारणीभूत होणारा घटक आहे


6 दिवसभर एकाच जागी बसून राहणे त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते प्रतिकारक्षमता घटते


7 संतुलित आहार न मिळणे व पोषण न झाल्यामुळे  व्यक्ती आजारी पडतो विषाणू शरीरात प्रवेश करतात


प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय उपाय करता येतील


Immunity power
Immunity power 



1 जीवन शैलीत बदल संतुलित आहारा बरोबर पुरेसा व्यायाम  व आसन करावेत मानसिक शारीरिक ताणामुळे प्रतिकारक्षमता घटते म्हणून मन शांत ठेवावे स्वस्थ जीवनशैली अंगीकारावी


2 त्यानंतर आपला आहार हा समतोल असावा केवळ एकाच पदार्थाचे मेनू असणारे आहार घेऊ नये आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असावा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये भाजीपाला पालक चा समावेश करावा वापरावा हिरव्या मिरचीचा वापर करावा


3 विटामिन सी युक्त आहार घ्यावा फळे घ्यावी संत्री-मोसंबी लिंबू आवळा अशा पदार्थांचे सेवन आपल्या आहारामध्ये असावा यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहते


4 नियमित दह्याचा आहारात सेवन केल्याने प्रतिकार शक्ती वाढते


5 हळद हि anti आक्सिडेंट गुणांनी भरपूर आहे ती रक्त शुद्ध शुद्ध करण्याचा गुणधर्म अंगी बाळगते त्यामुळेच हळदीला इम्मुनिटी सिस्टिम बुस्टर म्हणतात


6 प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी लसुन खाण्याचाही उपयोग होतो


7 बदाम खारीक किंवा मनुका त्याचबरोबर कडधान्य शेंगदाणे या पदार्थांचाही आहारात समावेश करावा कच्चे पदार्थ खावे


8 पुरेसा सूर्यप्रकाश घ्यावा सूर्यप्रकाशात बसावे सूर्य स्नान करावे सूर्यनमस्कार करावा


9 मन शांत ठेवावे व योगा करावा वेगवेगळे योगासने करावी


10 कमीत कमी सात ते आठ तास दररोज झोप घ्यावी पुरेशी झोप घ्यावी अति कामाचा ताण स्वतःवर लादून घेऊ नये



11 गुळवेल या वनस्पतीचा प्रतिकार शक्ती वाढवणे मध्ये फायदा होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेलीचा सर्व अंगांचा पान खोड फुल उपयोग होतो खोडाचे बारीक बारीक तुकडे करून दररोज काही दिवस काढा घ्यावा किंवा अशक्तपणा आला असेल तर पपईच्या पानांचा रस उपयोगी ठरतो

12 प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स चा वापर करणे चांगले ठरू शकते कारण की की त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यांचा वापर नियमितपणे करावा


    अशाप्रकारे मित्रांनो  जर आपण  आपल्या या आहार-विहारात आणि आचारात जर बदल केला तर निश्चितच प्रतिकार शक्ती वाढत जाते आणि रोगान प्रति लढण्याची शक्ती भक्कम होते आणि शरीरातील कमजोरी दूर होते म्हणून आपण वरील सर्व उपाय आपल्या जीवन शैली मध्ये निश्चित अमलात आणावे तसेच  वरील सर्व उपाय करताना  तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा तेव्हा मित्रांनो आपल्याला हा लेख आवडला असेल तर निश्चितच आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला सुचवा नमस्कार


Monday, September 7, 2020

काविळीचे दुष्परिणाम प्रतिबंधात्मक लसJaundice

काविळीचे दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक लस/Jaundice 

       काविळीचे दुष्परिणाम



कावीळ/Jaundice
काविळीचे दुष्परिणाम


    कावीळ म्हटलं  की आपल्याला आठवतं आजारी व्यक्तीचे पिवळे डोळे तसेच त्याची नखे  त्याची त्वचा हे सर्व बघितल्यानंतर आपण अनुमानाने ठरवतो की या व्यक्तीला कावीळ झालेली आहे डोळ्यांचा पांढरा भाग  पिवळा झालेला दिसतो  हाता पायाची त्वचा पिवळी पडते  शरीर पिवळे पडते याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन चे प्रमाण वाढणे पित्ताचे प्रमाण वाढणे तो पदार्थ  रक्तात साठून राहणे त्याचा कलर पिवळा असतो  त्यामुळेच  आपल्या विष्ठेचा  रंग  पिवळा असतो  पण  जेव्हा हा पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त तयार होतोे तेव्हा कावीळ होते किंवा त्याला भूक लागत नाही अन्नावर वासना उडते कावीळ मध्ये किंवा  कावीळ झाल्यानंतर उलटी मळमळ अशा प्रकारचे काही ही लक्षणे आढळतात आणि ही लक्षणे काही प्रमाणात बरोबर आहे पण मित्रांनो ही लक्षणे जाणून देखील आपण  त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा फार गंभीर परिणाम होऊ शकतो विशेषतः हा रोग कुठल्याही औषधाने बरा होत नाही म्हणजे काविळीचा विषाणू सहजासहजी मरत नाही  पण काही दिवसांनी तो तो आजार आपोआप बरा  होतो काविळीच्या आजारांमध्ये आजारी व्यक्तीला भूक लागत नाही  म्हणून त्याला उसाचा रस पाजणे सूप फळांचे ज्यूस  नारळ पाणी  यासारखे पदार्थ  आहार  कावीळ मध्ये  चांगली असतात पाणी भरपूर पिणे त्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकले जातात कावीळ मध्ये गुळवेल काढा वगैरे चांगला असतो रुग्णाला शक्यतो विश्रांतीची फार गरज असते काही काळ विश्रांती घेतल्याने रुग्ण आपोआप बरी देखील होतात काविळीच्या आजारात क्वचितप्रसंगी रुग्ण दगावतो तरीदेखील आपण योग्य ती सावधानता घ्यायला हवी  सावधानता घ्यायला  हवी विशेषतः 


काविळीचे काय काय दुष्परिणाम होतात ते आपण बघूया


    1) काविळीमध्ये खूप अशक्तपणा येतो अंगदुखी भूक लागत नाही जेवण जात नाही मळमळ होते ताप येतो अशा व्यक्तीला आजार जर जास्तच बळावत गेला तर बेशुद्धी येणे चक्कर येणे किंवा क्वचित प्रसंगी रुग्ण दगावण्याची पण  शक्यता असते अशा वेळेस रुग्णाला ताबडतोब डॉक्टर कडे इलाज करायला पाठवावे



   2) दूषित पाण्यामुळे हा आजार पावसाळ्यात पसरतो तसेच रक्त संसर्गामुळे देखील म्हणजेच दूषित इंजेक्शनमुळे देखील हा आजार पसरतो B, Cआणि D या प्रकारातली कावीळ रक्तातून पसरते किंवा लैंगिक संबंधातून पसरते आणिA व E प्रकारातील कावीळ ही ही तोंडावाटे पसरते दूषित अन्न पाण्या मार्फत  दुसऱ्या व्यक्तींपर्यंत हे विषाणू पोहोचतात



    4) हा आजार सांसर्गिक असल्यामुळे लैंगिक संबंध या काळात न ठेवणेे हिताचे असते शक्यतो लैंगिक संबंध टाळावा
चे रक्तातील बिलीरुबिन चे प्रमाण वाढल्यामुळे ते त्वचेखाली साठवून राहते आणि आणि त्वचेला खाज येते



   6) जलोदर यकृताला सूज येते असा देखील  त्रास होऊ शकतो यकृताचे काम बिघडून जाते पोटात पाणी साठते स्त्रियांसाठी तर गर्भरपणात अधिक अवघड होऊन बसते गर्भपात करणे देखील गरजेचे होऊन  बसते या परिस्थितीमध्ये म्हणजे यकृताची परिस्थिती गंभीर झाली असता दारू पिणे अतिशय घातक होऊ शकते दारू यकृताला अत्यंत घातक होऊ शकते म्हणून रुग्णाने आवश्यक ती दक्षता घ्यायला पाहिजे यकृताची स्थिती फार नाजूक झालेली असते कावीळ म्हणजे यकृताची परिस्थिती नाजूक होणे खराब होणे आकुंचन पावणे अशा प्रकारची यकृताची स्थिती होते



    7) काविळीमध्ये तेलकट आंबट पदार्थ वर्ज करावे नाहीतर आजार आणखीन बळावतो म्हणून पचायला जड गोड  असे अन्नपदार्थ टाळावेत जर हळूहळू भूक लागत असेल ताप कमी झाला असेल चेहऱ्यावरचा पिवळेपणा कमी कमी होऊ लागला असेल लघवीचा पिवळा रंग बदलत असेल तर कावीळ बरी होत आहे असं समजावे


    8) कधीकधी सलाईन लावून पण उपयोग होत नाही


प्रतिबंधात्मक लस


         काविळीमध्ये प्रतिबंधात्मक लस देखील उपलब्ध आहे तीन ते चार वर्षापर्यंत प्रतिबंध करता येतो परंतु ती फार महागडी असते पण बालपणात बऱ्याच अंशी या विषाणूंचा संसर्ग होऊन गेलेला असल्यामुळे तिचा फारसा उपयोग होत नाही एकदा हा आजार झाल्यानंतर सहसा परत होत नाही अ प्रकारच्या विषाणूंचा आजार बालपणात होतो इ प्रकारच्या विषाणूमुळे शक्यतो तरुण व प्रौढ व्यक्तींना आजार होतो व शक्यतो परत होत नाही
   


     काविळीवर आधुनिक शास्त्रात काहीही औषध नाही किंवा त्याचा उपयोग नाही मात्र आयुर्वेदिक औषधांमध्ये बरेच उपाय केले जातात भुई आवळा या वनस्पतीचे रस किंवा तूप आरोग्यवर्धिनी च्या गोळ्या यासारखे उपाय केले जातात उसाचा रस या आजारात परिणाम कारक ठरतो कारण जेवण जात नसल्यामुळे अशक्तपणा येतो



उकळून गार केलेले पाणी प्यावे तिखट मसाले दार पदार्थ वर्ज्य करावेत



  सामान्यतः आपल्याला काविळ  झाली आहे की नाही
याची टेस्ट करून घ्यावी सामान्यतः काही सोपे उपाय करूनही हे समजते आपल्या लघवी चा रंग पिवळा आणि त्यावर फेस जमा होऊन तो पिवळा दिसत असेल तर कावीळ असू शकतो यकृताची तपासणी करून किंवा रक्ताची तपासणी करून घ्यावे कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेतले जाते यकृताला काही सूज वगैरे आली आहे का हे देखील जाणून घेतले जाते


    
        मित्रांनो कावीळ वेळ हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे शक्यतो आपल्या आजूबाजूची स्वच्छता ठेवणे अन्नपदार्थांची स्वच्छता ठेवणे दूषित पाणी न पिणे उघड्यावरचे किंवा रस्त्यावरचे अन्न न खाणे बाहेरून घरी आल्यानंतर  हात-पाय स्वच्छ धुणे  साबणाने स्वच्छ करणे इत्यादी काळजी घेतली तरीदेखील हा आजार होत नाही तेव्हा मित्रांनो ही माहिती कशी वाटली त्याविषयी आपले मत नक्कीच शेअर करा नमस्कार


  यासंदर्भात आपण आणखीन काही लेख वाचू शकता आपल्या या ब्लॉग मध्ये

कावीळ(Jaundice) म्हणजे काय ?कावीळ ,कारणे, लक्षणे पथ्य-अपथ्य व घरगुती उपाय 



 मित्रांनो काविळीच्या आजारांमध्ये आपण सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी विशेष म्हणजे  आम्ही सुचवलेले  विविध उपाय  करण्याअगोदर  आपल्या प्रकृतीनुसार  आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने किंवा सल्ल्याने उपाय करावी याचबरोबर मित्रांनो आरोग्यासंबंधी नवीन लेख आपण या ब्लॉगवर  बघु शकता आपला अभिप्राय आपण खालील कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवू शकता नमस्कार

Monday, January 6, 2020

कावीळ(Jaundice) म्हणजे काय कारणे लक्षणे पथ्य-अपथ्य घरगुती उपाय

कावीळ(Jaundice) म्हणजे काय कारणे लक्षणे पथ्य-अपथ्य घरगुती उपाय

काविळीवर घरगुती उपाय

काविळीचा रोग



       मित्रांनो कावीळ म्हणजे यकृताचा आजार जेव्हा त्वचा आणि डोळ्यांमधील बाह्य पांढरा भाग रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्याने पिवळसर दिसू लागतो तेव्हाही हे कदाचित यकृताची लक्षण समजून घ्यावे . 

पांढरी पिवळी  असे तिचे प्रकार  लक्षणानुसार पडतात संस्कृत मध्ये काविळीला  'कामला 'असे म्हणतात. तर ग्रीक भाषेमध्ये काविळीला 'एक्टेरस' म्हणजे पिवळा या अर्थाने शब्द वापरतात विशेषतः कावीळ ही एक स्थिती आहे हा आजार फार भयंकर नसला तरीपण त्रासदायक आरोग्यास गंभीर देखील  होऊ शकतो .कावीळ विशेषता विषाणूमुळे होतो काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे देखील हा आजार होतो. इंग्रजीमध्ये हेपाटायटीस असे काविळीला संबोधतात


        यकृताची काम असते पित्त बनविणे व निर्माण झालेले पित्त मालिकेमधून आतड्यांमध्ये लहान आतड्यामध्ये सोडणे आपल्या शरीरातील सर्व पदार्थ यकृता मधुन विघटन होऊन येतात म्हणजे एक प्रकारे यकृत हा  रसायनांचा कारखानाच म्हटलं पाहिजे शरीरातील रक्तामधील रसायनांवर यकृत प्रक्रिया करते व आपल्याा बाह्य पदार्थावर प्रक्रिया करून जे काही अवशेष शिल्लक राहते ते पित्ता वाटे शरीराबाहेर येते
यामध्येच एक पिवळ्या रंगाचा पदार्थ असतो ज्याचे नाव बिलीरुबिन .


काविळीचा रोग
Jaundice


    हे बिलीरुबिन हिमोग्लोबिन च्या विघटनानंतर तयार होते आणि हे बिलीरुबिन बाहेर पडले नाही तर ते साठून राहते आणि त्याला पिवळा रंग येतो बिलिरुबिन चे रक्तातील प्रमाण 0.2 मि ग्रॅम/ 100 मिली पासून 1.2 मि ग्रॅम /शंभर मिली असते हे प्रमाण वाढून तीन मिलिग्रॅम /100 मिली झाले म्हणजे त्वचा आणि डोळ्यामधील पांढरा भाग पिवळा दिसायला लागणे म्हणजे काविळ होय काविळीचे निदान मूत्र परीक्षणाद्वारे किंवा रक्त चाचण्या द्वारे करतात. कावीळ जशी जशी आपल्या शरीरात पसरत जाते तस-तशी शरीराची त्वचा पिवळी होऊ लागते बिलिरुबिन चे प्रमाण वाढते व लाल रक्तपेशींचे प्रमाण घटत जाते त्यामुळे त्वचा पिवळी होऊ  लागते डोळे व नखे पिवळी दिसू लागता


काविळ म्हणजे काय कावीळ कशामुळे होतो?


1 तिखट आंबट खारट व उष्ण पदार्थांचे सेवन करणे 


2 मांसाहार मद्यपान धूम्रपान करणे


3 दूषित पाणी व शिळे अन्न सेवन करणे रस्त्यावरचे उघडे अन्न सेवन करणे


4 रक्तातील बिलीरुबिन चे प्रमाण वाढणे यामुळे कावीळ होऊ शकते



5 पित्त मार्गात आलेल्या अडथळ्यामुळे यकृतात साठवून ते रक्तात उतरते यामुळे कावीळ होते.


6 काविळीचे दुसरे कारण रक्त संसर्ग यामध्ये काविळीचे विषाणू रक्ताद्वारे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणे उदाहरणार्थ कावीळ झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील इंजेक्शनची सुई इंजेक्शनच्या सुया तसेच रक्त संपर्क यामुळे हा धोका उद्भवतो या प्रकारच्या काविळीमध्ये यकृत कमजोर होते व हा आजार गंभीर असतो यासाठी प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येते म्हणून कावीळ असलेल्या व्यक्तीशी संपर्क येऊ न देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते


अति प्रमाणात दारूचे सेवन करणे यामुळेदेखील यकृत खराब होऊ शकते 35% काविळ होण्याचे प्रमाण हेच असू शकते दारू सेवन करण्याचे  व्यसन असल्यामुळे  हे लोक  कितीही समजावले तरी  दारू पिणे सोडत नाही  व  त्यामुळे यकृत खुप नाजुक होते व यकृताची परिस्थिती बिघडते यकृत काम करत नाही त्यामुळे पोट बिघडणे पोट फुगणे पोटात पाणी होणे वजन कमी होणे अशक्तपणा येणे  उलटी होणे  रक्ताच्या उलट्या होणे मुत्रपिंड व्यवस्थित  काम  न होणे  मूत्रपिंडावर ताण येणे तर दुसरे हेपिटायटीस बी व हिपॅटायटीस सी व इतर संसर्गजन्य कारणामुळे हा कावीळ होऊ शकतो


काविळीची लक्षणे काय?





1 काविळी मध्ये आपले नखे मूत्र व डोळे पिवळे दिसणे लघवीला पिवळी होणे काविळीचे प्रमाण वाढले असता लघवी लालसर पिवळी दिसते डोळ्याचा पांढरा भाग पिवळा दिसायला लागतो

Jaundice
Jaundice

2 काविळी मध्ये भूक न लागणे व शौचास साफ न होणे


3 रुग्णास ताप येतो काही करण्यास मन लागत नाही


4 काविळ झालेल्या व्यक्तीला खाज येणे उलटी होणे यकृताला सूज येणे अशा प्रकारची काही लक्षणे दिसून येतात


5 शौचाला गेल्यानंतर शौच याचा रंग पांढरा फिका दिसतो


6 कावीळ हे यकृत विकृतीच लक्षण आहे आणि आणि दुसरे म्हणजे काविळीमध्ये रक्तामधल्या तांबड्या रक्तपेशी चे प्रमाण घटण्याचे प्रमाण वाढते


7 कावीळ झालेल्या व्यक्तीची झोप कमी होते मानसिक त्रास वाढतो


8 उलट्या होणे मळमळ होणे हा त्रास वाढू लागतो हा त्रास अधिक प्रमाणात जाणू शकतो


9 काविळीमध्ये खूप अशक्तपणा जाणवतो ताप येतो अंग कण कण करणे


10 आजारी व्यक्तीचे वजन कमी होते पातळ शौचाला होते


तेव्हा अशा प्रकारे हे काही काविळीची प्रमुख लक्षणे आहे

 

कावीळ वर घरगुती उपाय काय?

Jaundice mhanje kay
Kavil



1प्रथमतः आहारात बदल करणे व पुष्कळ विश्रांती घ्यावी काविळ झालेल्या व्यक्तीला अशक्तपणा येतो त्यामुळे व्यक्तीला विश्रांतीची खूप गरज असते


2 एरंडाच्या कोवळ्या पानांचा रस दोन चमचे व एक कप गाईचे दूध एकत्र करून अनशापोटी दोन वेळा काही दिवस घ्यावे


3 फळांचा रस व फलाहार घ्यावा वरण-भात भाजी असा आहार करावा उघड्यावरचा रस्त्यावरचा पदार्थ किंवा अन्न सेवन करू नये


4 पचण्यास हलके अन्न घ्यावे व जडान्न न घ्यावे मांंस मटन पचायला जड अन्न टाळावे


5 मुळ्याच्या पानांचा रस मोठ्या माणसांसाठी 3 कप अनशापोटी काही दिवस घ्यावा सतत दहा दिवस घ्यावा


6 अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त गुळवेल-
गुळवेल ला संस्कृतमध्ये अमृता म्हणतात कारण खरोखर ही अमृता सारखी गुणकारी आहेत  काविळीच्या तापात गुळवेल चूर्ण कोमट पाण्यातून घेतली असता घाम येऊन ताप बरा होतो कोणत्याही ज्वरात गुळवेलीचा काढा द्यावा
काढा करताना ओली गुळवेल घ्यावी त्याच्या अर्धा लिटर पाण्यामध्ये  एक अष्टमांश राहील  इतका काढा करून घ्यावा


7कावीळ झालेल्या व्यक्तींनी पाणी नेहमी उकळून गार केलेले पाणी प्यावे


8 काविळीमध्ये उसाचा रस घ्यावा ताक व ग्लुकोज युक्त पाणी सेवन करावे




काविळीमध्ये पथ्य काय


1 उकळून थंड केलेले पाणी प्यावे दूषित पाणी पिऊ नये व भरपूर पाणी प्यावे ज्यामुळे शरीर हायड्रेट राहणार नाही व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल


2 आहारामध्ये तांदळाची भाकर ,दुधी भोपळा ,पडवळ, कारले, कोहळा ,मुगाचे वरण, नारळ पाणी ,मनुका ,पालेभाज्या ,फळांचा रस ,द्राक्ष इत्यादींचा समावेश करावा.


3 सूप आणि ज्यूस  कावीळ झालेल्या व्यक्तीने  सेवन करावे तसेच नारळ पाणी नारळात भरपूर पोषकतत्वे व अँटी अँक्सीडेंटस असतात त्यामुळे नारळ पाणी घ्यावे तसेच प्रोटीन युक्त् आहार घ्यावा भरपूर फायबर युक्त आहार घ्यावा ज्यामुळे शरीरातली विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते प्रोटीन विटामिन्स व मिनरल युक्त आहार असावा


काविळीमध्ये अपथ्य काय


1 लिंबू ,लोणचे, पापड मसाला, मसालेदार पदार्थ मांसाहार ,मद्यपान, धूम्रपान ,आंबा, चहा ,कॉफी ,तेलकट-तुपकट ,तिखट पदार्थ टाळणे तसेच जागरण ,मैथुन व दूषित पाणी न पिणे.


       दूषित पाण्याचा पुरवठा हे काविळ पसरण्याचे प्रमुख कारण असते खरे पाहता कावीळ साधारणपणे पावसाळ्यात होते कारण कारण पावसाळ्यामध्ये पाणी अनेक प्रकारे दूषित होते किंवा एकमेकांमध्ये मिसळते त्यामुळे ते पाणी दूषित होण्याचा धोका जास्त असतो
    
    अशाप्रकारे मित्रांनो काविळीच्या आजारांमध्ये आपण सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी याचबरोबर स्वच्छता पूर्वक आपल्या अंगी आरोग्यपूर्ण सवयी स्वतःला लावून घ्याव्यात


तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला की कमेंट  मध्ये नक्कीच लिहून कळवा वरील  उपाय करत असताना  आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा  आपापल्या प्रकृतीनुसार  डॉक्टरांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे व असेच आरोग्यासंबंधी आमचे नवीन लेख आपल्याला या ब्लॉगवर बघायला मिळतील तसेच या लेखासंबंधी आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आम्हाला प्रतिक्रिया द्यावी नमस्कार


Friday, January 3, 2020

सर्दी का होते कारण लक्षणे उपाय

सर्दी का होते कारण लक्षणे उपाय


 

Sardi


मित्रांनो सर्दी होणे हा  एक सामान्य आजार आहे सर्वसाधारणतः हा आजार आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे देखील होऊ शकतो किंवा प्रकृतीमध्ये झालेल्या बदलाने हमखास  होतो उदाहरणार्थ एक ऋतू बदलला की  दुसर्‍या ऋतूची  चाहूल लागली की त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे शरीरात देखील बदल होतात आणि त्यामुळे सर्दी सारखा आजार किंवा लक्षणे जाणवतात हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होऊ शकतो आणि त्यामध्ये फार काही  घाबरण्यासारखे नसते 


सामान्य घरगुती उपाय यापासूनही या आजारावर आराम मिळतो पण आपण आजच्या मॉडर्न युगामध्ये थोडेसे लक्षण दिसले तरी लगेच डॉक्टर कडे जातो पण ठरलेल्या वेळेमध्ये हा आजार आला तसा निघूनही जातो म्हणून  या आजाराकडे फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही उलट  आपल्या शरीराची  स्वच्छता मात्र होते .


सर्दी हा आजार नेहमीच्या ऋतूनुसार कमीत कमी आठ ते पंधरा दिवस राहतो त्यातही सुरुवातीला फक्त नाकातून पाणीच वाहते नंतर डोके दुखू लागते डोके जड पडते फटफट करते त्यानंतर हळूहळू सर्दी घट्ट होऊ लागते सर्दी पिवळसर व पु युक्त होऊ लागते सर्दीमुळे कान बंद होऊ लागतं श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागतो पिवळसर पदार्थाचा दुर्गंध  सुटतो त्यानंतर हा चिकट पिवळसर पदार्थ वाळून त्याचा पापुद्रा तयार होतो त्यालाच आपल्या भाषेमध्ये मेकुड म्हणतात


हवेतील प्रदूषणामुळे धूळ कचरा कीटकनाशके पेस्टिसाइड बुरशीनाशके यामुळे देखील सर्दी होऊ शकते व ती क्षणिक असते म्हणून अशा प्रकारची सर्दी होण्यापासून आपल्याला काय उपाय करता येईल ते केले पाहिजे उदाहरणार्थ मोकळ्या हवेत विहार करणे कीटकनाशके पेस्टिसाइड बुरशीनाशके यांच्यापासून स्वतःचा बचाव करणे जिथे खूप कचरा दुर्गंधीयुक्त वातावरण असेल तेथून देखील दूर गेले पाहीजे


मात्र काही लोकांना सर्दीची अलर्जी असते त्यांना कायमच सर्दी झालेली पाहायला  मिळते त्यामुळे अशा व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जर आपल्याला कायम टाईम सर्दी होत असेल  नाक गळत असेल  तर  मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नये त्यासंदर्भात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा औषधोपचार करावे



सर्दी चे कारण


वरील कारण वगळता सर्दी हा विषाणूमुळे याच्याकडून त्याच्याकडे पसरतो हे विषाणू श्वासावाटे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात एका व्यक्तीला झालेली सर्दी त्याच्या संपर्कात दुसरी व्यक्ती आली असता त्याला पण सर्दीचा विकार जडतो संक्रमण होते एक-दोन दिवसात त्याला पण सर्दी झालेली पाहायला मिळते आपल्या कुटुंबात पण हा अनुभव आपल्याला येतो



सर्दी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय


सर्दीची लक्षणे



सर्दी होण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्यालाही सर्दीचे काही लक्षणे जाणवतात दिसतात नेहमीच्या सर्दी मध्ये सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात विषाणूंच्या संक्रमणामुळे ही लक्षणे जाणवतात यामध्ये हे नाका मध्ये खाज येणे नाक घसा कोरडा पडणे शिंका येणे डोके जड पडणे डोळ्यांमध्ये जळजळ होणे आणि नाकातून पाण्यासारखा श्राव मोठ्या प्रमाणात होऊ लागणे बारीक ताप जाणवणे डोकेदुखी तीव्र स्वरूपाची होणे भूक न लागणे ही लक्षणे स्वाभाविकपणे जाणवतात आणि तीन चार दिवसानंतर आपोआप ही लक्षणे कमी होतात आणि नाकातून गळणारे पाणी हळूहळू घट्ट होते नंतर पुढे पु युक्त   बनने अशी काही नेहमीच्या आजारांमध्ये लक्षणे दिसतात


सर्दी वर उपाय - उपचार


कधी कधी  सर्दी वर लंघन करणे  किंवा उपवास केल्याने ही  बरी होऊ शकते एका ऋतूतन दुसऱ्या ऋतूत संक्रमण करताना  म्हणजे समजा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतांना किंवा हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना  सर्दी  होते  तेव्हा फार भिण्याचे कारण नसते  अशी सर्दी जशी येते तशी निघूनही जाते  व शरीर स्वच्छ  होते  काही बदल होणे हे  आपल्यासाठीच योग्य असते 


जलनेती चा प्रयोग


कायम काय होणाऱ्या सर्दी साठी हा उपयोग उपयोग करावा कोमट मिठाच्या पाण्यात किंवा पाण्याने नाकाच्या अंतर्भागाची स्वच्छता केली जाते यालाच आपण जलनेती प्रयोग म्हणतो थोडे कोमट मिठाचे पाणी करून नंतर हे पाणी थोडे थोडे चालू असलेल्या नाकपुडी मधून आत मध्ये सोडावे शासन श्वास तोंडाने चालू ठेवावा म्हणजे हे पाणी दुसऱ्यां नाकपुडी मधून बाहेर चालू होते त्यानंतर पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने हाच प्रयोग करावा यामुळे घाण बाहेर पडायला सुरुवात होते व आतील स्वच्छता होते वाकून उभे राहिले असता पाणी घशात जात नाही नाकपुडीद्वारेच बाहेर येते फक्त मीठाचे प्रमाण अति खारट करू नये नाहीतर नाकात वेदना होतात


नाकामध्ये गावरान गाईच्या तुपाचे  एक किंवा दोन थेंब टाकावे किंवा नसेल तू तर खोबरेल तेल एक दोन थेंब टाकावे त्यासाठी उताणे झोपून पाठी खाली उशी ठेवून हा प्रयोग करावा डोके खाली करून हा प्रयोग केला असता सर्दी मध्ये आराम मिळतो



विषाणूयुक्त सर्दी साठी औषधे नाहीत ही सर्दी काही कालावधीसाठी असल्याने फक्त काही लक्षणे बघून त्यावर उपचार करता येतात उदाहरणार्थ ताप डोकेदुखी नाकातून पाणी गळणे अंग ठणकणे यासाठी त्या लक्षणानुसार औषधोपचार करता येतो सर्दी कायमची बंद करता येत नाही वारंवार होणाऱ्या सर्दी साठी कान नाक घसा तज्ञांकडे दाखवावे



सर्दी वर घरगुती उपाय


मित्रांनो सर्दी वर घरातीलच काही उपाय करूनही सर्दी थांबते पण आपण बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे साबणाने धुतले पाहिजे त्यामुळे विषाणू पासून होणारी सर्दी ला प्रतिबंध होईल


हळद

आयुर्वेदामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे हळद हि  भरपूर गुणांनी  उपयुक्त आहे हळद ही आयुर्वेदिक  अँटीसेप्टीक आणि अँटी बॅक्टेरीयल आहे अशा हळदीमध्ये मग थोडसं गुळ  व थोडीशी हळद  एकत्र करून त्याच्या गोळ्या बनवा  व त्या सेवन करा  त्यामुळे  कफ खोकला  सर्दी वर आराम मिळतो.


आलं 


आलं हे थोडं तिखट युक्त  गुणाची असते  गुणधर्माचे  असते आल्याचा चहा करून पिणे  अनेक उपयुक्त गुणधर्मांनी आलं परिपूर्ण आहे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी आलं उपयोगात आणावे. याने देखील सर्दी मध्ये आराम मिळतो


लिंबू 

 लिंबामध्ये  सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ कमी होतो


लसूण 


आपल्या स्वयंपाक घरात  लसूण हा लागतोच  अशा लसणाच्या  चार-पाच पाकळ्या  सर्दी  खोकला असेल तर खावा  त्यामध्ये  आरोग्यासाठी  उपयुक्त गुण आहेत


 कांदा

कांदा  आता हा जीवनावश्यक वस्तू  म्हणून  आपल्या रसोई किंवा स्वयंपाक घरांमध्ये असतोच  अशा कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून अनशापोटी सेवन करावे यामुळे देखील सर्दीच्या आजारांमध्ये आराम मिळतो


लवंग


लवंग ही तिखट गुणधर्माची असते कपभर पाण्यात चार-पाच लवंगा टाकून ज्या उकळून घ्याव्या त्यात कोमट झाल्यावर त्यात  अर्धा लिंबू पिळून एक चमचा मध टाकून  पिणे यामुळे सर्दी आजारांमध्ये आराम मिळतो


मोहरीचे तेल 

  मोहरीच्या तेलामध्ये चार-पाच पाकळ्या लसुन टाकून ते उकळून घ्यावे व कोमट झाल्यावर छातीवर व पायाला तळव्यांना मालिश करावी त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होऊ लागतो


तुळस


तुळस ही आरोग्य वाढवणारी वनस्पती प्रत्येकाच्या अंगणात असावी तिच्यामुळे ऑक्सिजनची लेव्हल वाढते अशा तुळशीच्या पानांचा काढा करून प्यावा त्यामुळे सर्दी या आजारावर  आराम मिळतो


हळद आणि दुध 

आणि गरम केलेल्या दुधात रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि दुध द्यावे गरम दुधामध्ये अर्धा ते एक चमचा हळद टाकून हलवून सेवन करावे आराम मिळतो


पुरेशी विश्रांती


आपल्याला सर्दीची लक्षणे दिसू लागल्यानंतर आपल्या शरीराला  आरामाची गरज असते  म्हणून अशावेळी  शरीराला पुरेशी विश्रांती घेतल्याने ही आराम मिळतो


मीठ आणि पाणी 

मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करणे यामुळेही आराम मिळतो तेव्हा मित्रांनो वरील माहिती आपापल्या आपल्या शरीर प्रकृतीनुसार फॅमिली डॉक्टरांच्या सल्लामसलततिने व मार्गदर्शनाने प्रयोग करावा आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आपला अभिप्राय  आम्हाला नक्कीच कळवा नमस्कार  


Wednesday, January 1, 2020

डोकेदुखीची प्रकार कारण व उपाय/headache

डोकेदुखीची प्रकार कारण उपाय/headache


Headeche problem
डोकेदुखी
नमस्कार मित्रांनो डोकेदुखी एक निश्चित आजार नसतो सर्वसामान्यपणे डोकेदुखी  ही  किरकोळ  आजार  म्हणून   संबोधली जाते. त्यामुळेच काही घटका डोकेदुखी त्रासदायक असते नंतर आपोआप ती समस्या नाहीशी होते किंवा काही मेडिसिन घेऊनही उदाहरणार्थ (अस्पिरिन) डोकेदुखी वर मात करता येते पण  या गोष्टींची सवय लागता कामा नाही पण जर  ह्या गोळ्या घेऊन देखील  डोकेदुखी राहत नसेल  तर तर ते गंभीर आजाराचे लक्षण असू शकते त्यासाठी निदान होणे आवश्यक असते 


आज डोकेदुखीची समस्या खूप लोकांना सतावते आहे काही लोकांना तर डोकेदुखी ही अनेक आजारांची  लक्षण म्हणून  पुढे येत आहे तर काही आजारांमध्ये डोकेदुखी हे त्या आजाराची प्रारंभिक स्थिती दर्शवते तर काही वेळेला डोकेदुखी हाच आजार  असतो


Dokedukhi-prakar-karan-upay-headache.html upay
Headeche
      या सर्व प्रक्रियांमध्ये ज्या व्यक्तींचे डोके दुखते  त्यांची ची व्यथा खरोखर विचित्र असते डोकेदुखी मध्ये देखील खूप प्रकार आहेत त्यात प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात




डोकेदुखी चे प्रकार


1 अर्धशिशी


    या डोकेदुखी मध्ये अर्ध डोकं दुखतं किंवा रुग्णांना अर्धशिशी च्या अगोदर काही लक्षणे जाणवतात किंवा सूचनाच मिळते उदाहरणार्थ डोळ्यांसमोर अंधारी येणे मळमळ उलटी होणे प्रकाश  सहन न होणे त्यानंतर कित्येक  वेळ अर्ध डोकं दुखतं डोकेदुखीची वेदना खुप भयंकर असते


2 कपाळा समोरच दुखते

या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये फक्त डोक्याच्या समोरची बाजू दुखत असते


3 डोके थांबून थांबून राहून-राहून दुखणे

या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये काही वेळा सलग डोके दुखते पुन्हा थांबते पुन्हा डोकेदुखी सुरू होते अशाप्रकारे डोके दुखत असते


4 डोक्याचा काही भाग दुखणे

डोक्याचा फक्त काही ना काही भागच दुखणे


5 आजारामुळे होणारी डोकेदुखी
    मेंदूज्वर किंवा मेंदूआवरण दाह, तसेच मेंदू-हिवताप,  कर्करोग - मेंदूतल्या गाठी ,इजा - मार ,डोळा-कान, दात, मान, इ. अवयवांशी संबंधित डोकेदुखी , डेंगू, अतिरक्तदाब, काचबिंदू,  मेंदूच्या चेतांशी निगडित डोकेदुखी,  



      कारण काय


1 कधीकधी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी खूप गोंगाट असतो बस एवढ्या कारणाने देखील डोके दुखू शकते


2 काही व्यक्तींना दिवसभर उन्हातानात परिश्रम करावे लागत  उन्हामुळे अति  उन्हात अति परिश्रम हेदेखील डोकेदुखीचे कारण होऊ शकते


3 मानसिक श्रम, खूप चिंता करणे क्रोध करणे रागावणे -तनाव , यामुळेही डोके दुखू शकते कौटुंबिक कलह  घरातील वातावरण गोंगाट अशांतता यासारखी असंख्य कारणे असू शकतात व त्यामुळे डोके दुखू शकते


4 रात्री जागरण करणे वेळच्या वेळी न झोपणे कधीकधी जेवण झाल्यावर लगेच झोपणे  किंवा  अंघोळ करण्याच्या अगोदर जेवणे अशाप्रकारे  उलट सुलट  सवयी  अति तिखट चमचमीत आम्लता वाढवणारे पदार्थ खाणे यामुळे पित्तप्रकोप होतो  व हेही कारण डोकेदुखीला पुरेशी असते


5 एखादे व्यसन जडले व्यसनामुळे  एकाच जागी खूप वेळ बसून राहणे असेल तरीदेखील डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि जर ती व्यसन किंवा इच्छा पुरी होत नसेल तरीदेखील डोकेदुखी होऊ शकते


6 कधीकाळी डोक्याला मार लागणे किंवा गार हवा वातावरण बदल यामुळेही डोकेदुखी होऊ शकते


7 नोकर पेशा असणाऱ्या व्यक्ती काही काम नसल्यामुळे अति झोप  आळस अपचन वेळचे वेळी न जेवणे हे ही प्रमुख्याने डोकेदुखीस कारण होते


8 सर्दी ताप आला असेल तरी देखील डोकेदुखी  हमखास होते किंवा ते सुरुवातीचे लक्षणच असते


9 कधीकधी डोकेदुखीचे गंभीर  कारण असू शकते मेंदूमध्ये  गाठ असणे हे देखील गंभीर असते त्यास्तव डोकेदुखी  होते


10 आपला रक्तदाब नेहमीच  वाढत असेल  तेव्हा रक्तदाब वाढला असेल तरीदेखील डोके दुखते


11 अनेकदा आपल्या स्नायूंच्या किंवा नसांच्या ताणामुळे दुखापतीमुळे एकाच जागी बसून असल्यामुळे डोके होऊ शकते तेव्हा मानीला दोन्ही बाजूला हलवून किंवा इकडेतिकडे करून झटके मारून देखील डोकेदुखी थांबू  किंवा बंद होऊ शकते नसा मोकळ्या होऊन डोकेदुखी थांबू शकते 


12 डिहायड्रेशन मुळे होणाऱ्या डोकेदुखीमुळे पाण्याचे प्रमाण कमी होते म्हणून रसदार फळांचे सेवन करायला हवे टरबुजाची सेवन करायला हवे पाणीदार फळे खायला हवी जी आरोग्याला उत्तम असतात


13 ऑक्सिजनची कमतरता ही देखील डोकेदुखीचे कारण असू शकते म्हणून निसर्गरम्य वातावरणात फिरून यावे असे केल्याने देखील डोकेदुखी थांबून जाते


14 उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे प्राणायाम करावा आसने व व्यायाम करावा यामुळे शरीराची हालचाल होऊन रक्ताभिसरण सुरळीत राहते व व आजार दूर राहतात

डोकेदुखी वर घरगुती उपाय काय?



1 आपल्या संपर्क घरात असलेल्या  वेलचीचा उपयोग करावा


2 एक कप कोरा चहा मध्ये आलं मिसळून घ्या त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज कमी होण्यास मदत होते म्हणून आल्याचा चहा पिण्याची सवय लावा नियमित आल्याचा चहा प्या


3 काही लवंगा तव्यावर भाजून घ्या आणि त्याचा ठराविक वेळाने वास घेत जा त्यामुळेही डोकेदुखीत आराम मिळतो


4 लवंग तेल कपाळाला मालिश करा त्यामुळेही आराम मिळतो लवंग तेलात वेदनाशामक गुण असतात


5 भरपूर पाणी प्या पाणी कमी पिल्याने ही डोकेदुखी होऊ शकते पण त्याचा अतिरेक होता कामा नाही


6 लिंबू पाणी घ्या त्यात थोडे मीठ किंवा  सोडा मिसळा   आपल्या शरीरात आम्लाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले असेल तर त्यामुळे फायदा होतो जर गॅस मुळे डोके दुखत असेल  तर  निव्वळ लिंबू पाणी घ्या


7 आपल्या घरीच लसुन असतो अशा लसणाची एक कळी रस  पिल्यावर  आराम मिळतो


8 नारळाचे तेल दहा ते पंधरा मिनिटे मालिश केल्याने ही डोकेदुखी थांबते


9 दालचिनीच्या काही तुकड्यांची चूर्ण  घेऊन त्याचा लेप बनवावा व कपाळाला लावा दहा ते पंधरा मिनिटे तसंच ठेवा आराम मिळतो


१० आपल्या अंगणात असलेली तुळस  की खुप रोगांवर  उपयोगी आहे  रोग निवारक अशीही तुळस तुळशीच्या पानांचा रस ही फायदेशीर असतो तुळशीच्या सात आठ पानांचा काढा बनवावा व तो प्यावा


डॉक्टर स्वागत तोडकर यांचा डोकेदुखी वर घरगुती उपाय


          डॉक्टर स्वागत तोडकर यांनी सांगितलेला पेरू चा प्रयोग एक कच्चा पेरू दगडावर  उगळावा व त्याचा लेप कपाळावरती जिथे जिथे  डोके दुखते तिथे लावा आराम मिळतो


    तसेच डोकं दुखत असेल तर डॉक्टर स्वागत तोडकर सांगतात चिमुटभर मीठ जिभेवर घ्यायचं व अर्धा मिनिट शांत बसायचं व नंतर अर्धा ग्लास पाणी त्यावर पिऊन घ्यायचा डोकेदुखी थांबते


  तुळस ही आपल्या अंगणात असते तुळशीचे पाने घेऊन देट काढून टाकावा त्यानंतर मिठाच्या पाण्याने धुऊन टाकावे आणि दोन चार पानांची हाताने चिमटीत पकडून रस काढावा व तो एक-दोन थेंब नाकात टाकून डोके मागे करून झोपावे यानेही ही डोकेदुखी थांबते कारण तुळशीच्या पानात ऑक्सिजनची लेवल वाढवण्याची क्षमता असते अशाप्रकारेेे डॉक्टर स्वागत तोडकर यांनी काही घरगुती उपाय  सांगितलेले आहे हे उपाय अवश्य करून बघावे 


 वरील सर्व उपाय  आपण आपल्या प्रकृतीनुसार  आपल्या तज्ञांच्या  डॉक्टरांच्या सल्ल्यानेच  किंवा मार्ग दर्शनानेच करावा हा लेख आपल्याला कसा वाटला ते हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तसेच  डोकेदुखी संबंधित  आपल्या काही अभिक्रीया असतील  तर  नक्कीच आम्हाला विचारा  नमस्कार


मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation

मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation मुळव्याध म्हणजे काय?     मित्रांनो संस्कृत मध्ये मूळव्याधीला अर्श म्हटलं जातं व हिंदी ...