Monday, December 30, 2019

मुळव्याध फिशरवर उपाय आयुर्वेदिक उपाय

मुळव्याध फिशरवर उपाय आयुर्वेदिक उपाय



Fisure,mulvyadh,bhagandhar solution
Mulvyadh

‌नमस्कार मित्रांनो healthlife ब्लॉग वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुळव्याध फिशर या आजारावरती उपयुक्त माहिती


मुळव्याध हा आजार अतिशय भयावह आहे संस्कृत मध्ये मूळव्याध या आजाराला  अर्श म्हटले जाते आयुर्वेदामध्ये आजाराच्या ज्या आठ महाव्याधी सांगितल्या आहे त्यामध्ये मूळव्याध हा एक आजार आहे  यावरून  मूळव्याध ही व्याधी किती  ती भयावह आहे  आहे ते समजते यामुळे मुळव्याध झालेल्या व्यक्ती अतिशय घाबरून जातो  अन्न पाण्यावरची वासना पण उडून जाते मूळव्याध किंवा फिशरच्या त्रासामुळे तो जेवण कमी करतो व त्याच्या परिणाम उलटा होतो त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू लागतो आणि मल कडक होऊ लागतो गुदभागी शुष्कता येऊ लागते आणि त्यामुळे गुदद्वाराचे असंख्य आजार उद्भवू शकतात आणि आपल्याला हा आजार बरा होण्यासाठी वाटेल ते प्रयत्न मिळेल ते औषधे घेण्याचा तो प्रयत्न करतो पण सहजासहजी हा आजार बरा होत नाही


वरील कोणत्याही प्रसंगात मुळव्याध नसतो तरीदेखील आजार हा मुळव्याध म्हणूनच ओळखला जातो पण असे नाही कदाचित परिकर्तिका म्हणजे गुदभागी चिरा पडणे म्हणजेच फिशर किंवा बाहेरच्या जागी कोंब येणे आतून कोम येणे म्हणजेच मुळव्याध किंवा आजार आतिशय गंभीर झाला असता बुद्ध भागाच्या दुसऱ्या बाजूला पु युक्त पुळी होणे म्हणजेच भगंदर अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि आपण देखील आपल्याला कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत हे जाणून उपाय करायला हवे


फिशर का होतो the cause of fisher
Fisher



    त्यातही जर फिशर सारखा आजार असेल तर मात्र एकदा बरा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा हा आजार उद्भवतो त्यामुळे तर रुग्ण आजारी व्यक्ती अतिशय अशक्त होऊन जाते फिशर हा असा आजार असा आहे की तो एकदा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो म्हणून या आजाराला ऑपरेट करून देखील फायदा होत नाही त्यासाठी आयुर्वेदिक उपाय करून व आजार सुधारणा करून आपल्याला या आजारावर नियंत्रण मिळवता येते


      तसे तर प्रत्येक आजाराचे मूळ हे आपल्या आहारामध्ये दडलेली आहे ज्याचे पोट व्यवस्थितपणे साफ होते त्याला कुठलाही आजार होण्याचे चान्सेस फार कमी असतात आज भारतामध्ये कमीत कमी  चार ते पाच कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत व दरवर्षी यांची संख्या काही लाखांनी वाढतच आहे यावरून हा आजार गंभीर स्वरूपाचा होत चाललाय या अगोदर हा आजार शक्यतो चाळीशीनंतर होत होता किंवा होण्याचे प्रमाण प्रौढ व वृद्ध लोकांमध्येच होते पण आता मात्र 18 ते 25 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना देखील हा आजार सर्रास पाहायला मिळतो हा आजार अंतर्गत व बहिर्गत अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो इंटरनल पाइल्स खूप वेदनादायी असतो व बहिर्गत बाहेरील बाजूला येणारी कोम किंवा सूज ही ही फार वेदनादायी नसली तरी खाज युक्त असते


  आयुर्वेदा चे वर्णन


आयुर्वेदाच्या दृष्टीने प्रत्येक मूळव्याधीमध्ये रक्त पडतेच असं नाही तर वातप्रधान मूळव्याधीमध्ये वेदना जास्त होतात व पित्त व रक्त रक्तदोष त्यामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये रक्त जास्त जाते पडते आग होते व कफदोषामुळे होणाऱ्या मूळव्याधीमध्ये कंड अधिक असतो सुश्रुत संहितेमध्ये देखील वर्णन आहे जेव्हा व्यक्ती असंयमी बनते किंवा असंयम् आचरण करते तेव्हा त्रिदोष युक्त किंवा दोन दोष युक्त रक्तासह असा मुळव्याध होतो व हे दोष आपल्या गुदभागी मोड निर्माण करतात आग निर्माण करतात म्हणून या आजाराला जे कारण आहे त्याचाच बीमोड केला पाहिजे आजाराचे कारण म्हणजे अग्निमांद्यता आपल्या आहाराच्या अनियमितता किंवा अवेळी जेवण करणे कधीही जेवणे काहीही खाणे यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते व वरील तीन दोष कुपीत होतात यालाच मूळव्याध म्हटले जाते


   या आजारांमध्ये आतील भागातून रक्त येणे सूज येणे यासारखे प्रकार भयंकर असतात व अतिरक्तस्राव होत असेल तर ॲनिमिया म्हणजेच रक्ताल्पता देखील होऊ शकतो म्हणूनच या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपाय करून घ्यावा


मूळव्याध व फिशर या आजारावर काही घरगुती उपाय


      तर मित्रांनो  आज आपल्या गुंतागुंतीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या  आरोग्याकडे  लक्ष देणे  तसं  अवघड बनले आहे  आहार  विहार  सर्व  सवयी  यामध्ये  नितांत बदल घडत आहे आणि   ते अपरिहार्य आहे 


      तेव्हा  अशा परिस्थितीमध्ये आपला आहार हा सात्विक कसा बनेल याकडे आपण लक्ष देऊया आणि जास्तीत जास्त फळे, भाजीपाला ,हिरव्या पालेभाज्या ,फायबर युक्त असा आहार आपण रोज घेऊया , त्याचबरोबर आपला गुदमार्ग कोरडा होणार नाही सदैव ओला राहील यासाठी दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ आहारात उपयोगात आणू या. 


पचायला जड आणि आम्लता युक्त व जळजळ करणारी पदार्थांचे सेवन उष्ण तिखट मसालेदार तरी युक्त पदार्थांचे सेवन करू नये


आपला शौचाला नियमितपणा असावा आलेली शौच रोखून धरू नये त्यामुळे देखील मूळव्याधीच्या आजारांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते


मैद्याचे पदार्थ डाळीचे पदार्थ सेवन करताना अतिशयोक्ती नको अति प्रवास जागरण अति झोप यासारखे प्रकार व्हायला नको


    दुधामध्ये हळद टाकून रोज सकाळ संध्याकाळ अनशापोटी किंवा आपल्या सोयीने घेतली तर अतिउत्तम आणि त्याचबरोबर मुळव्याध फिशर प्राथमिक स्थितीतील बरेच होतात त्याचबरोबर या सर्व आजारांचे मूळ बद्धकोष्टता नष्ट होते.


    तेव्हा त्यासाठी  परफेक्ट  उपाय काय आहे ते आपण पाहूया
 दुधाबरोबर सुरण पावडर अर्धा चमचा हळदी सोबत जेवणापूर्वी दोन तास अगोदर दिवसातून दोन वेळा घ्यावे मित्रांनो खरोखर या औषधाने आपल्याला निश्चित गुण मिळेल हे सर्व घटक असलेल्या काही प्रॉडक्ट पण बाजारात भेटतात पण त्यासोबत कमीत कमी तीन महिने काही दिवस आपल्याला हा प्रयोग केल्यास उत्तम फायदा मिळेल मिळू शकतो त्यानंतर आपल्याला निश्चितच एक नवा जोम आणि उत्साह जाणवेल रात्री झोपताना तू गावरान गाईची तूप एक बोटाने गुदभागी फिरवावे त्यामुळे गुद भागाची शुष्कता कमी होऊन तेथील जागा नरम पडते किंवा एरंडेल तेल लावावे ताक असेल तर नियमित घ्यावे दुधाचे पदार्थ नियमित सेवन करावे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते मित्रांनो या अवघड जागेच्या अवघड दुखण्या तून तुम्ही बरे व्हावे यासाठी हा प्रयत्न



     याच बरोबर मित्रांनो आपल्या आहारामध्ये फायबर युक्त आहार घ्यावा फळे भाजीपाला केळी यासारख्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करावा तसेच त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यामध्ये एक चमचा रात्री झोपण्या पूर्वी घ्यावा आपली जीवनशैली मध्ये बदल करावा व्यायाम योगासन तसेच मनाला शांत ठेवावे मन शांत असेल तर शरीर देखील निरोगी राहते असं म्हटलं जातं शरीर माध्यम खलु धर्मसाधनम् आपले शरीर हे धर्माचे साधन नाही म्हणून त्याला व्यवस्थित ठेवावे निश्चितच आपण हे सर्व उपाय करून बघावे 


सुरण कंदाची भाजी


ज्या  मध्ये  सुरण हा घटक प्रामुख्याने आहे त्याचबरोबर हळद पावडर, शतावरी पण आहे हे सर्व घटक असलेले आहार पद्धती स्वीकारून आजारांमध्ये उत्तम आराम मिळतो सुरण  कंद  भाजी बनवून खावी  सुरणाचा कंद वाफवून केलेली भाजी खावी  त्यामध्ये मीठ मिरची टाकून  अशा भाजीचे नियमित सेवन केल्याने  मूळव्याधीच्या आजारांमध्ये फार लाभ होतो  त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते  अशाच तरुणाच्या कंदाचे  कार्य लहान व मोठ्या आतड्याची कार्यक्षमता वाढवते त्याचबरोबर पचन क्षमता सुधारते शरीरा तील विषारी द्रव्य toxinsबाहेर काढणे ,बद्धकोष्टता सुरळीत करणे ,कोणताही कसलाही दुष्परिणाम न करता गुदद्वारा जवळ होणारी आग सुज मलविसर्जनाच्या वेदना व रक्तस्राव थांबवते.
 म्हणून आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करावा 


   तेव्हा मित्रांनो आपल्याला हा लेख वाचून  आपल्या दुखण्यावर  निश्चितच  मदत मिळेल  वर सांगितलेले सर्व उपाय जर आपल्याला काही गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर  आपण  तज्ञांचा सल्ला  घेऊनच करावे असेच नवीन नवीन  आजारासंबंधी  लेख  बघण्यासाठी  आमच्या या ब्लॉगला अवश्य भेट द्या व आपल्या  प्रतिक्रिया  नक्कीच आम्हाला  कळवा नमस्कार


Friday, December 27, 2019

दमा अस्थमा कारण लक्षणे उपाय bronkytis Symptoms

 दमा का होतो कारण लक्षणे व उपाय

 bronkytis Symptoms


दमा या आजाराविषयी थोडक्यात माहिती


  मित्रांनो आज जीवनामध्ये असंख्य व्यक्तींना दम्याचा आजार झालेला पाहायला मिळतो आणि या आजारामुळे व्यक्ती मला हा आजार झाला आहे या विचारांमुळेच अधिक संकुचित बनते व्यक्ती दम्याच्या आजाराला स्विकारायला तयार नसते घाबरून जाते म्हणून आजारी व्यक्तीने सुरुवातीला आपल्याला दमा आहे या गोष्टीचा स्वीकार करायला हवा आणि दमा बरा होऊ शकतो यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हा मित्रांनो यासंदर्भात  आपण फार घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण कुठल्याही प्रसंगांमध्ये धीर सहनशीलता आणि संयम या गोष्टींची नितांत आवश्यकता असते


दमा या आजारांमध्ये सकारात्मक विचार व सातत्याने आजार बरा करण्यासाठी लागणारे मनोधैर्य याचे फार महत्त्व आहे तेव्हा आज आपण बघणार आहोत दमा या आजाराविषयी  चला तर मित्रांनो जाणून घेऊया दमा अस्थमा ब्राँकायटिस म्हणजे काय व तो का होतो 


Dama ilaj
Bronkytis


दमा, अस्थमा म्हणजे काय?


      माणसाला श्वासोच्छवासामध्ये जो त्रास होतो म्हणजे श्वास घेण्या मध्ये त्रास होतो ऑक्सिजन कमी पडतो त्याला दमा असे म्हटले जाते वातावरणामध्ये असंख्य प्रकारचे धूलिकण परागकण प्राण्यांचे तंतुमय अवशेष असतात आणि काही रुग्णांना याचा त्रास होतो ॲलर्जी होते श्वसन नलिका आकुंचन पावते श्वास आत जातो पण बाहेर पडताना त्रास होतो शिट्टी सारखा सुई आवाज येतो श्वास कोंडतो कपडे काढून टाकावी असे वाटते मोकळ्या जागेत बरे वाटते यालाच दम्याचा अटॅक म्हणतात यामध्ये  अरुंद झालेल्या नलिका उघडतील असे औषध घेणे गरजेचे असते अस्थालीन,लेव्हीलीन यासारखी औषधे (इनहेलर्स) या औषधामुळे  चटकन परिणाम पहायला मिळतो


दमा, अस्थमा का होतो दमा होण्याची कारण?


  दमा होण्याची कारण अनुवंशिकता असू शकते त्याचबरोबर प्रदूषण धुळीचे कण( उंदीर मांजर जनावरे झुरळ यांची तंतुमय केस त्यांचे अवशेष) असू शकते


 धूर तसेच रासायनिक पदार्थांची असलेला संबंध संयोग, श्वसन मार्गावरील जंतुसंसर्ग, वातावरणातील दमटपणा, ढगाळ हवामान ,वाढते शहरीकरण हेदेखील कारण आहे आहे
     

 दम्याचे प्रकार  


मित्रांनो लक्षणानुसार दम्याची देखील काही प्रकार पडतात ते आपण बघू या

  कफ दोष-

या प्रकारच्या दम्यामध्ये जेवल्यानंतर लगेच सुरू होणारा दमा हा कफदोषामुळे होतो यासाठी पंचकर्मातील वमन करण्यास फायदेशीर असते या व्यक्तीला थंड पाण्याने अंघोळ केली असता थंड हवा  यामुळे त्रास होतो या या प्रकारामध्ये आयुर्वेदिक श्वासकुठार गोळीने  देखील आराम मिळतो


   पित्त दोष


या प्रकारच्या दम्यामध्ये जेवल्यानंतर दोन तासांनी सुरू होणारा दमा व खूप वेळ  टिकणारा या रुग्णांना पंख्याचा वारा थंड पाणी गार  हवा आवडते, या प्रकारामध्ये सूतशेखर गोळी 100 मिलीग्राम तीनवेळा दिल्याने पित्त कमी होते तसेच 200 ग्रॅम ज्येष्ठमध पुडी वर उकळलेले एक लिटर गरम पाण्यात टाकून अर्धा तास ठेवून  ज्येष्ठमध्यजल तयार करावे हे कोमट गरम पाणी थोड्या वेळाने शंभर मिली दिल्याने आराम मिळतो


  वात दोष_



या प्रकारात संध्याकाळी किंवा पहाटे आजार सुरू होतो या रुग्णांना श्वासकुठार व कंण्टकारी दोन चमचे दोन दोन वेळेस तीन चार दिवस सातत्याने द्यावे काही दिवस सातत्याने द्यावे तसेच 100 मिली गरम दुधात दहा ते पंधरा मिली नारायण तेल मिसळून घ्यावे धाप कमी होते

Dama mhanje kay
Asthma



दम्याच्या आजारामध्ये काय काळजी घेता येईल?




वातावरणातील बदल तसेच आपले घर साफ करत असताना जी धूळ बाहेर पडत असते त्यात धुळीची देखील काहींना एलर्जी असते म्हणून योग्य ती दक्षता घेणे गरजेचे असते


काही कीटकनाशके सुगंधी द्रव्य पेस्ट कंट्रोल किंवा फवारणी करत असताना दमा असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो म्हणून जेव्हा कधी कुणी अशा कीटकनाशकांची फवारणी करत असेल तेव्हा त्यापासून दूर गेले पाहिजे


जिथे धूर असेल किंवा रंग काम चालू असेल तिथे पण जाताना आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी


आपले अंथरून पांघरून गादी कापूस यापासूनही त्रास उद्भवू शकतो त्यांच्यामधील कापसाचे बारीक बारीक तंतू कण याचाही दमा असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो म्हणून त्याच्यापासून पण सावध राहावे


पाळीव प्राणी आणि जसे की घोडा मांजर कुत्रा यांच्या शरीरात वरील केस केसांचे बारीक बारीक तंतू यांचादेखील दमा असणाऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी


काही काही व्यक्तींना वातावरण ढगाळ झाले बदलले तरीदेखील त्रास व्हायला लागतो


आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची अलर्जी आहे हे हे दमा असणारे व्यक्तींना चांगल्या प्रकारे ठाऊक असते म्हणून त्या गोष्टी करणे टाळावे किंवा त्या गोष्टींच्या सान्निध्यात राहणे टाळाव

दमा असणाऱ्या व्यक्तींनी विडी सिगारेट तंबाखू यासारखे व्यसन करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय म्हणून या व्यसनांकडे दुर्लक्ष करावे


कधीकधी हंगामी दमा देखील असतो विशिष्ट हंगामातच तो डोके वर काढतो म्हणून त्या हंगामात आपल्याला त्रास होतो म्हणून तो हंगाम येण्याअगोदर सावधगिरी बाळगावी


 सर्वसाधारण घरगुती उपाय काय करता येतील 

Wednesday, December 25, 2019

गुळवेल गिलोय फायदे-Gulvel benifits

गुळवेल माहिती  फायदे उपयोग-Gulvel benifits



गुळवेल  या वनस्पतीची माहिती


उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळणारी ही वनस्पती गुळवेल म्हणून ओळखली जाते  पाण्याची पातळी कमी झाली असता  किंवा आती दुष्काळात  देखील  ही वनस्पती  आपलं अस्तित्व टिकवते  तग धरून ठेवते  भारतामध्ये  सगळीकडे  ही वनस्पती आढळते  शक्यतो  लिंबाच्या  झाडावरती  आधार करून  झाडावरती पसरते अमृत वेलीच्या  खोड आणि कंदाचा उपयोग  औषधी गुणधर्म म्हणून केला जातो  तसेच  पानांचा देखील  उपयोग केला जातो गुळवेल या वनस्पतीला संस्कृत मध्ये अमृता  मधुपर्णी कुंडलिनी गुडूची बल्ली छिन्ना या विविध नावांनी ओळखले जाते. 


खरोखरच ही वनस्पती अमृताप्रमाणे जीवन प्रदान करणारी आहे पुराणकाळात  गुळवेली संदर्भात एक प्रसंग आहे  राम आणि रावण यांचे जेव्हा युद्ध झालं  व रावण मारला गेला व युद्धामध्ये  वानर देखील मारले गेले  होते  तेव्हा त्यांना जीवनदान देण्यासाठी  इंद्राने पाऊस पाडला  अमृता  नावाने पाऊस पडला तेव्हा वानर जिवंत झाले  व त्यांच्या अंगावरचे थेम जिथे जिथे पडले तिथे अमृतवेल उगवली  असा  प्रख्यात आहे 


 गुळवेल कसा ओळखावा?


पाने हिरवेगार व लवचिक व हृदयाच्या आकाराची असतात खोड सफेद व खवले खवले असलेलं व खोडा वरती बारीक सालीचा  पापुद्रा असतो विशेष म्हणजे ही वनस्पती लिंबाच्या झाडा वरती किंवा कुंपनावरती पसरलेली आढळून येते आधारासाठी  ती  कशालाही  पकडते  व आपल्या  फांद्यांचा विस्तार करते गुळवेेेेेेल अनेक वर्ष जगू शकते


गुळवेल पाणी नसले  तरीही  ही जगू शकते मरत नाही चवीने कडू असते खोड बोटाच्या आकाराची व पाणीदार असते पान हृदयाच्या आकाराची असतात खोडा वरती बारीक बारीक ठिपके असतात व खोडाची साल पातळ पापुद्रा याप्रमाणे असते अलगद बोटांनी सालीचा पापुद्रा काढता येतो गुळवेलीचे  कांड  हे मांसल असते  व चवीला कडवट असते 


गुळ वेलीच्या  खोडाला  किंवा वेलीला  कापले असता  त्यातून  चिकट द्रव बाहेर येतो व आतील भाग चक्री सारखा दिसतो ही काही तिची प्रामुख्याने ओळख सांगता येईल

सर्व प्रकारच्या तापावर परिणाम कारक ठरणारी वनस्पती आहे गुळवेल बरोबर बाजारामध्ये गुळवेल सत्व गुळवेल घनवटी म्हणजेच  गोळ्या किंवा कॅप्सूल अशा प्रकारचे औषधे उपलब्ध आहे


गुळवेल चे फायदे
Guduchi

 गुळवेल या वनस्पतीचे फायदे
          
 

नमस्कार मित्रांनो आयुर्वेदात  देखील जिला अनन्यसाधारण महत्त्व आहे अशा गुळवेलीचे फायदे आज आपण बघणार आहोत. 

विविध आजारांमध्ये गुळवेल अतिशय गुणकारी आहे मराठी मध्ये गुडूची, गुळवेल व हिंदी मध्ये मध्ये गीलोय व इंग्लिश मध्ये Tinospora म्हणून हिला ओळखली जाते मित्रांनो आरोग्या संदर्भात गुळवेल या वनस्पतीला  अनन्यसाधारण महत्त्व आहे


मित्रांनो कुठलाही आजार आपल्याला त्रिदोषांच्या असंतुलनामुळे होतो ते त्रिदोष म्हणजेच कफ वात आणि पित्त तेव्हा यांना समान ठेवण्याचं काम गुळवेल करते


बऱ्याच तापामध्ये गुळवेल अतिशय उपयोगी आहे

आयुर्वेदामध्ये गूळवेलीला अमृतकुंभ म्हणतात. 


अमृताप्रमाणे असलेली ही    अमृतवेल वनस्पती मानवासाठी वरदान म्हटलं तरी चालेल


बऱ्याच आजारांमध्ये गुळवेलीचे पाने व खोड यांचाऔषध म्हणून उपयोग केला जातो



गुळवेली च्या पानांची भाजी देखील केली जाते ते औषधी गुणांनी युक्त असते गुळवेलीचे पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व तेलामध्ये कांदा लसून लाल होईपर्यंत भाजून घ्यावे त्यानंतर मीठ मिरची टाकून भाजी हलवून घ्यावी वाफ देऊन खाण्यास योग्य होते
 गुळवेलीचे पानांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस तसेच प्रोटीन पण आढळते


रक्ताल्पता म्हणजे अनिमिया असेल तर रक्त वाढवणे मध्येही गुळवेल परिणामकारक आहे


गुळ वेलीमध्ये खोड अति गुणकारी मानले जाते  तसेच गुळवेल हे शक्तिवर्धक व मानसिक आजारावरती उत्तम कार्य करते


गुळ वेलीने पचनशक्ती उत्तम होते व भूक लागते
त्वचा रोगा  मध्ये देखील  फार उपयोगी आहे
त्वचा रोगाचे मूळ रक्तामध्ये सापडते तेव्हा अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम गुळवेल करते म्हणजे रक्तदोष नाहीसा करते.


शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणे मध्ये गुळवेल महत्त्वाची भूमिका पार पाडते 


यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे आणि गुळवेल सेवनामुळे यकृताचे कार्य सुधारते


पुरुषांचे शुक्रधातुवर्धक,  तसेच स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांची कमतरता भरून काढते


 डेंगू चिकनगुनिया स्वाईन फ्लू यासारख्या इन्फेक्शन सारख्या आजारांमध्ये गुळवेल सेवन करणे अत्यंत लाभकारी असते


बाजारामध्ये देखील गुडूची तेल चूर्ण उपलब्ध आहेत पण ताज्या गुळवेलचा काढा अतिशय उपयुक्त असतो

 

काविळीच्या आजारांमध्ये गुळवेल काढा अवश्य करावा काविळीच्या तापामध्ये रुग्णाला अशक्तपणा येतो अशा वेळेस गुळवेलीचा काढा करून मधामध्ये घेतल्यास अशक्तपणा दूर होतो


रक्ताल्पता देखील गुळ वेलीच्या सेवना मुळे वाढते जर आपल्याला रक्ताल्पता असेल एनीमिया ची समस्या असेल तर गुळवेलीचे सेवन करावे त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते


महिलांच्या पाळीची समस्या असेल तर गुळवेलीचा सेवनामुळे पाळी संबंधित तक्रारी दूर होतात


गुळ वेलीला जी फळे येतात त्या फळांना फोडून जर आपल्या त्याचेवर पुळ्या फोड आले असतील तर त्यावर लावावे त्यामुळे पुळ्या फोड बरे होतात


गुळवेली मुळे आपल्याला असलेली अँँसिडिटी देखील थांबते म्हणून गुळवेल सेवन करावा


नेत्र रोगावरती देखील गुळवेलीचा उपयोग होतो गुळवेलीचा काही दिवसाच्या सेवनामुळे नजर सुधारते डोळ्यांची जळजळ थांबते


मधुमेहींचा रुग्णांना उपयुक्त असा हा गुळवेल आहे मधुमेहींच्या रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम गुळवेल करते 


गुळवेल मुळे रक्ताभिसरण वाढते सुधारते व हृदयाला बळकटपणा येतो मजबूतपणा येतो


सर्व ज्वर तापामध्ये गुळवेलचा काढा उपयोगी आहे


भूक न लागणे किंवा अशक्तपणा आला असता गुळवेलीचा काढा द्यावा ,पोटाचे विकार कावीळ यामध्‍ये तर अतिशय गुणकारी गुळवेल आहे  


खूप दिवस जर आपल्या खोकला थांबत नसेल तर काही दिवस सकाळी गुळवेल काढा सेवन करावे त्याने खोकला थांबतो


काही संशोधनाअंती हे सिद्ध होत आहे की गुळवेल मुळे मानसिक आरोग्य देखील सुधारते


सर्दी खोकला अशक्तपणा यामध्ये तर हमखास आराम देते त्याचबरोबर मधुमेहामध्ये साखरेचे प्रमाणही योग्य ठेवते



 ‌  
Gulvel benifits
Tinospora

  

गुळवेल वनस्पती चा उपयोग कसा करावा?



Gulvelicha gundharma
Gulvel


गुळवेल काढा


 एक बोटा एवढ्या किंवा करंगळी एवढ्या खोडाचा एक फुट तुकडा  घेऊन त्याला कुटून पाण्यात टाकावा व एक चतुर्थांश काढा म्हणजे चार कप पाणी असेल तर एक कप राहील एवढा अर्क बनवावा व दिवसातून दोन-तीन वेळेस घ्यावा चवीसाठी   थोडी  साखर टाकली तरी चालेल किंवा बाजारात मिळणारे औषधे देखील वापरता येतील पण  ताज्या गुळवेलीचे महत्त्व विशेष असते सातत्याने सात ते आठ दिवस प्रयोग चालू ठेवावा फायदा होतो लाभ होतो 


मध्यंतरी डेंग्यूची साथ पसरली होती तेव्हा अनेकांना डॉक्टरांनी गुळवेल काढा घेण्याचं प्रतिपादन केलं होतं तेव्हा असा अमृता सारखा परिणाम देणारी ही गुळवेल आयुर्वेदामध्ये फारच उत्तम मानली  


प्रत्येकाने दररोज सकाळी एक एक चमचा घेऊन वरती गायीचे दूध पिल्यास आरोग्य उत्तम राहते व प्रतिकारशक्ती वाढते किंवा तारुण्य वाढते





 गुळवेल चूर्ण किंवा पावडर


गुळवेल च्या पानाची पावडर करून चूर्ण करून उपयोगात आणले जाते तसेच गुळवेल तेल गुळवेल रस गुळवेल काढा गुळवेल सत्व असे असंख्य औषधे आयुर्वेदिक दुकानात मिळतात पण आरोग्य तज्ञांच्या मते एक ग्रॅमच्या वरती गुळवेल दिवसभरात सेवन करू नये


गुळवेल चा दुष्परिणाम



जर काही शस्त्रक्रिया झाली असेल तर गुळवेलीचा उपयोग करणे तज्ञांच्या सल्ल्यानेच करावे

 गुळवेल विशेषता गरोदर स्त्रियांना देऊ नये तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनी देखील याचा उपयोग करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा मधुमेहाच्या व्यक्तींचे  औषधे चालू असतील  तर टाळावे शक्यतो अशा प्रसंगांमध्ये गुळवेलीचा उपयोग करताना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने करावा

‌अशाप्रकारे  आपणाला हा लेख आवडला असेल  आणि काही सांगायचं राहून गेले असेल किंवा चुकीचं सांगितलं असेल तर सूचना करा  रिप्लाय द्या आणि शेवटी  इथेच थांबूया नमस्कार


Monday, December 23, 2019

गोमूत्र फायदे| Gomutra chikitsa

गोमूत्र फायदे Gomutra chikitsa




गोमूत्र माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण गोमूत्र गोधन गोमूत्रा विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत
Gomutra-ark-mahiti-fayde-nuksaan
Gomutra-ark

आपल्या वैदीक ग्रंथांमध्ये देखील काही सूत्र सांगितले आहे

गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।

लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। 

शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । 

मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।


याचा अर्थ


गोमूत्र हे कडू उष्ण तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे


 भारतीय संस्कृतीमध्ये गाईला खूप महत्त्व दिले आहे गाईला आपल्या येथे माता मानले जाते पूर्वीच्या काळी तर ज्याच्याकडे खूप पशुधन असेल त्याला श्रीमंत मानले जात असे गाईंच्या सहवासात आपले जीवन व्यतीत करण्यात अनेकांना धन्यता वाटते कारण गाय हे आपल्या भारतीय संस्कृतीची आधारस्तंभ आहेत गाईचे दूध पवित्रआहे गाईच्या् दुधामध्ये सात्विकता आहे

जिथे गायीचे रक्षण केल्या जात तिथे लक्ष्मी नांदते गाई च्या सहवासात राहिल्यान आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील सुधारते गाईचा महिमा वर्णावा तितका कमीच आहे गाईची प्रत्येक गोष्ट आपल्या उपयोगी आहे पण उपयोगी आहे म्हणून गाईचे महत्व आहे असं नाही तर गाय माझी माता आहे  आणि ज्याप्रमाणे  आई घरातील सर्व काम करते  म्हणून  तिला महत्त्व नसते  तर  ती काम करू किंवा ना करू  ती माझी आई आहे त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत गाईला अनन्यसाधारण महत्व दिल आहे

गाईचं दूध लोणी तूप दही ताक हे सर्व माणसाला पुष्ट बनवते मनुष्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक निर्माण करते गाईचे शेण पवित्र मानले जाते शेतीसाठी गायीच्या शेना गोमुत्राचा खूप उपयोग होतो जैविक शेती मध्ये गावरान गायला व तिच्या शेण गोमूत्र यांना फार महत्त्व दिले जाते

आयुर्वेदिक औषधांमध्ये गायीच्या सर्व वस्तू गोष्टींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे वेगवेगळ्या कॅन्सर सारख्या आजारावर देखील आज गोमूत्राचा प्रयोग केला जातोय तसेच त्वचारोग कुष्ठरोग सोरायसिस अस्थमा अल्सर किंवा अशाच खूप आजारावरती गोमूत्र अर्काचा प्रयोग केला जातोय आणि तो यशस्वी होताना देखील दिसत आहे पण हे सारे उपाय करत असताना गाय मात्र गावरान असावी आजची विदेशी गाय यासाठी उपयुक्त नाही यामध्ये देखील  गर्भवती  गाईचे गोमुत्र  हे प्रभावी मानले जाते यासाठी अजून संशोधन होणे गरजेचे आहे

गोमूत्राचा जैविक शेतीसाठी उपयोग


मित्रांनो पूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी अशाप्रकारे म्हटलं जायचं पण आज उलट बघायला मिळतील उत्तम नोकरी मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती असे सूत्र बनले आहे याचे कारण आज परवडेनाशी झाली आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न आपले कुटुंबातील गरजा भागू शकत नाही त्यामुळे तो शेती करण्यात नाखूष आहे याचे कारणही तसेच आहे आज रासायनिक औषधे खते शेतीसाठी विष बनत आहे आणि यांचा उपयोग अजूनही असाच चालत राहिला तर मानवी जीवनच धोक्यात येऊ शकेल त्यासाठी पर्याय काय तर आपल्याला पुन्हा आपल्या गोधन शेतीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे म्हणूनच आज गोमूत्र अर्काचा गाईच्या शेणाचा स्लरीचा शेती मध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे आणि हे अन्न म्हणजे गायीच्या गोमूत्र पासून पिकवलेले अन्न मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे हे अनेकांना समजून चुकले आहे आणि म्हणून पुन्हा आपल्या पारंपरिक शेतीकडे वळत आहे

गायीच्या गोमूत्र अर्काचा उपयोग शेतीमध्ये कीटकनाशक म्हणून देखील केला जातोय व द्र युक्त खाद म्हणून देखील झाडांना केला जातोय

अशा या गाईची महिमा वर्णावी तितकी कमीच आहे तरीदेखील आपण गाईच्या गोमूत्राची काही विशेष फायदे काय आहेत ते पाहूया

गोमूत्र  फायदे


1 गोमूत्राचा काही दिवस सेवन केल्याने मुत्रपिंड सुधारले मूत्रपिंडाचे रोग नष्ट होतात हा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे कारण की मूत्रपिंड हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे


2 गोमूत्र पिल्याने दमा-अस्थमा सारखा रोग देखील बरा होतो TB सुद्धा बरा होतो पाच ते सहा महिने पिले पाहिजे


3 गोमूत्रा मध्ये पाण्याबरोबर कॅल्शियम आयरन सल्फर पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट अमोनिया यासारखे 18 पोषकतत्व आढळतात


4 त्वचेचा कोणताही रोग गोमूत्र सेवनाने बरा होतो कारण त्वचेच्या रोगांमध्ये सल्फरची कमतरता असते सोरायसिस एक्झिमा सर्दी खोकला गुडघेदुखी टीबी यासारखे रोग गोमूत्र सेवनाने नक्की बरे होतात कारण की गोमूत्रात सल्फर असते


5 आपल्या शरीरात एक रसायन असतं त्याचं नाव कर्क्युमिन त्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील सेल्स बेकाबू होतात आणि ट्यूमर तयार होऊ लागतात हळदी आणि गोमूत्रा मध्ये हे रसायन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे होणारा रोग कळतो


6 डोळ्यांचे बरेच रोग कफामुळे होतात जसे की ग्लुकोमा मोतीबिंदू पण गोमूत्र सेवन केल्याने हे मुळापासून रोग बरे होतात फक्त यासाठी गोमूत्र चांगल्या फडक्याने गाळून डोळ्यात टाकायचे असते


7 गाईच्या मूत्रात थोडं पाणी टाकून केसांची चमक वाढते


8 लहान मुलांना लवकर सर्दी खोकला होतो होतो तेव्हा एक चमचा गोमूत्र पाजल्याने कप बाहेर पडतो


9 किडनीच्या रोगांमध्ये देखील गोमूत्राचा फार उपयोग होतो अर्धा कप गोमूत्र दररोज सेवन काही दिवस केल्याने किडनीचे रोग दूर होतात


10 कफ खूप झाला असेल तर अर्धा कप गोमूत्र सेवन केल्याने फायदा होतो


11 गोमूत्र नेहमी देशी गाईचचं सेवन करावं जंगलात चरणारी गाईचे सर्वोत्तम गोमूत्र मानले जाते


12 ज्यांची आरोग्य चांगलं असेल त्यांनी देखील गोमूत्र सेवन करणे लाभदायक असते लहान मुलांनी पाच मिली तर मोठ्या माणसांसाठी 10 मिली
गोमूत्र अर्क
Gomutra chikitsa


13 पोटात जंत असतील किंवा कृमी असतील तर अर्धा चमचा हळद आणि चार चमचे गोमूत्र एकत्र सेवन केल्याने फायदा होतो सात दिवस हा प्रयोग करावा


14गोमूत्राची त्वचेला मालिश केल्याने त्वचा वरचे दाग हळूहळू निघून जातात पण त्यासाठी आठ ते दहा दिवसांचं गोमूत्र असायला हवे


15 वजन कमी करण्यासाठी देखील गोमूत्राचा उपयोग होतो अर्धा ग्लास ताज्या पाण्यामध्ये चार चमचे गोमूत्र दोन चमचा मध आणि एक चमचा लिंबूचे रस मिसळून सातत्याने काही दिवस घेणे


15वात आणि कफ या दोन्ही रोगावर एकच काम करते पण पित्ताच्या रोगात काही औषधी मिसळावी लागतात


16 आपल्या शहरातील यकृत हादेखील महत्त्वाचा अवयव आहे म्हणून यकृताची आजार देखील गोमूत्र सेवनाने बरे होतात


17 जर आपण पण कुठे पडलो व जर जखम झाली तर लगेच गोमूत्र लावले पाहिजे त्यामुळे जखम पिकत नाही हा त्याचा फायदा आहे


18 गोमूत्रा मध्ये सोळा प्रकारची खनिज द्रव्ये आढळतात कॅल्शियम मॅगनीज लोह सल्फर तांबे चांदी आयोडीन सीसे सुवर्ण क्षार  अमोनिया  युरिया पोटॅशियम सोडियम यूरिक ॲसिड या आणि याप्रकारे आणखीही आहेत आपल्या शरीराचे व्यवस्थित पोषण होते


19 गुडघे दुखी उच्चरक्तदाब मलावरोध बद्धकोष्टता अपचन तसेच लठ्ठपणा या आणि असंख्य आजारांमध्ये प्रामुख्याने किंवा इतर औषधांमध्ये मिसळून गोमूत्राचा उपयोग केला जातो


20 गोमूत्रा मध्ये विशिष्ट प्रकारची विटामिन्स सी ए व इ असतात तसेच प्रोटिन्स असतात तिच्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते


21 गोमूत्रात कॅन्सर विरोधी तत्व सापडले आहे


गोमूत्र नुकसान |घेतानाची सावधगिरी



Gomutra ark
Gomutra ark



गोमूत्र आठ वर्षाखालील मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठी उपयोग करताना वैद्यांच्या सल्ल्यानंच उपयोग करावा त्याचबरोबर गोमूत्र हे उष्ण असल्यामुळे उष्ण प्रकृतीच्या लोकांनी सावधानपूर्वक उपयोग करावा किंवा ज्यांच् शरीर दुबळ आहे शरीर प्रकृती  कमजोर असेल तर त्यांनी देखील यापासून फारच जपून उपयोग करावा सावधानपूर्वक उपयोग करा


 अशाप्रकारे फायदे जास्त नुकसान कमी असते गोमूत्र खरोखर मानवी जीवनामध्ये 100 % जास्त आजारावर उपयोगी आहे पण ते म्हणजे देशी गायचे गोमुत्र असावे यात मात्र तिळमात्र शंका नाही


    तेव्हा हा लेख नक्कीच आवडला असेल आपल्याला काही सूचना असतील शंका असतील किंवा गोमूत्र  विषयी अजून काही आपल्याला माहिती असेल प्रयोग केला असेल तर आपण नक्कीच आम्हाला सांगू किंवा विचारू शकता नमस्कार


Sunday, December 22, 2019

जळवात कारण(Symptoms)लक्षणे घरगुती उपचार औषध

जळतात कारण(Symptoms)लक्षणे घरगुती उपचार औषध


Jalwat upchar
Jalwat

जळवात म्हणजे काय? 


जळवात म्हणजे काय तर त्वचा रुक्ष व कोरडी झाली असता ती फाटली जाते किंवा तिच्यातला मऊपणा कमी होतो व पायाला किंवा हातांना  भेगा पडू लागतात जखमा होऊ लागतात हाताच्या किंवा पायाच्या भेगा मधून रक्त येऊ लागते त्वचा लालसर होते हाताची कातडी निघू लागतात त्वचा पातळ होऊन दुखू लागते अशाप्रकारे आपण आपल्याला जळवाात झाली असे म्हणू शकतो


जळवात का होतो त्याचे कारण काय? 


मित्रांनो आपण जळवात का होतो त्याचे कारण काय यावर थोडक्यात बघूया तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची शरीर प्रकृती ही भिन्न भिन्न असते कुणाची कफ प्रकृती कुणाची पित्त प्रकृती तर कुणाची वात प्रकृती आणि त्यामुळे भिन्नभिन्न आजार पहायला मिळतात


बहुतेक वेळेला हा आजार अनुवंशिक त्यातूनही उद्भवतो आपले आई-वडील आजी आजोबा यांना त्रास असेल तर त्यांच्यासारख्या शरीर प्रकृती असणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये देखील असा त्रास जाणवतो


विटामिन व प्रोटीन युक्त आहार न घेतल्यामुळे आहारात यांचा योग्य वापर न केल्यामुळे देखील जळवात या समस्यांना सामोरं जावं लागतं


उष्ण व कोरडे हवामान हेदेखील काही व्यक्तींना मानवत नाही तर कुणाकुणाला थंडीमध्ये देखील हा त्रास होतो थंड वारे व कोरडी हवा पाणी व नेहमी थंड पदार्थ यांचे सेवन करणे यामुळे वात प्रकोप होऊन हातांना पायांना भेगा पडतात चिरा पडतात व त्या  कडक बनतात व खूप वेदना होतात हातापायांच्या भेगांतून रक्त येते


 वास्तविकतः जळवात हा उष्णतेचा प्रकार आहे शरीरातील उष्णता कुठून तरी बाहेर पडते कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येते जर आपण केवळ दररोज रुक्ष आहार घेत असून किंवा उष्ण तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन करत असू तर अशा व्यक्तींना हमखास अशा समस्यांना तोंड द्यावे लागते


कधीकधी आपण अशा वातावरणात काम करत असतो तिथे आपल्या पायांचे हातांचे घर्षण होत असते व त्वचा रुक्ष कोरडी होते आपण कधी कधी बूट चप्पल न वापरता अनवाणी पायाने काम करतो यामुळे तेथील धूळ रेती यांचादेखील त्वचेवर परिणाम होतो रेती माती  यांच्याशी त्वचेचं घर्षण होते कुणाकुणाला मातीत काम केल्यानेही अलर्जी होते मातीशी संपर्क येताच त्वचा रुक्ष व कोरडी होऊ लागते व भेगा पडतात


मित्रांनो प्रत्येक आजाराचे निदान आपल्या आहारामध्ये सापडतं जसे की आपला आहार ऋतूनुसार असला पाहिजे आहारामध्ये जर खूप रुक्षता असेल चिवडा मसाला उष्ण व तिखट पदार्थ किंवा अति थंड पदार्थ यामुळेच शरीरातील स्निग्धांश कमी होतो आणि परिणामतः आपले शरीर रुक्ष बनते


    तसेच मित्रांनो ज्या व्यक्तींना खूप वेळ पाण्यामध्ये किंवा मातीशी संपर्क येतो त्यांनाच हा आजार खूप प्रमाणात आढळतो बहुतांशी ही कारणं  असली तरीदेखील  इतरांना देखील उष्ण व कोरडे हवामान मानवत नाही उष्ण व कोरड्या वातावरणामध्ये तसेच धुळीमुळे देखील त्वचा कोरडी बनते व सर्रास जळवात झालेले पहायला मिळते त्यामुळे देखील जळवात पाहायला मिळते



जळवात या आजाराची लक्षणे काय? 

जळवात आजार कारण लक्षणे उपाय औषध
जळवात


 मित्रांनो जळवातीमध्ये  हातापायाची कातडी निघतात हात व पाय त्यांची कातडी कोमल होते त्यांना भेगा पडतात कधीकधी भेगांमधून रक्त पण येते व अशा जागी कडकपणा येतो त्यामुळे त्वचा थोडीफार इकडेतिकडे हलवली  तरीदेखील खूप दुखते त्वचा लालसर  होते ,पेन वेदना जाणवते एखादा मलम लावला असता बरे वाटते 


कोमट पाण्याने शेक दिला असता बरे वाटते भेगा पडल्या नंतर त्या कडक बनतात व हातांची तळपायांची हालचाल झाली असता किंवा काही काम केले असतात त्या चिरा फाटतात किंवा त्वचा आणखीन फाटते व त्यातून रक्त येऊ लागते म्हणजेच व्यक्तीला असह्य वेदना होतात काम करावेसे वाटत नाही ही कशात मन लागत नाही नाही किंवा कुणाला आपले हात व पाय दाखवण्यास देखील लज्जा वाटते संकोच वाटतो व्यक्तीला त्यामुळे समाजात एकमेकांबरोबर मिसळायला देखील संकोच वाटतो


जळवात च्या आजारांमध्ये काय उपाय करता येईल? 


१ मित्रांनो पहिला उपाय म्हणजे आहारात बदल करणे ऋतूनुसार हिवाळा पावसाळा उन्हाळा आहारात बदल करावा आपल्या आहारामध्ये दूध लोणी तूप युक्त पदार्थांचा उपयोग वापर करणे तिच्यामुळे आपल्या शरीरातील स्निग्धांश वाढेल रुक्षता कमी होईल नैसर्गिक फळ भाज्या फळे अन्नधान्य यांचा उपयोग करावा


२ गाय व्याल्यानंतर तिची जी वार पडते ती चरबीयुक्त असते म्हणून त्या वारे मध्ये आपले हात व पाय बुडवून ठेवावे काही तास जर बुडवून ठेवले  तर त्यामुळे बरेच दिवस जळवाती चा त्रास होत नाही


३ आपण जर चप्पल वापरत असून तर घर्षणामुळे त्वचा कोरडी बनते म्हणून चपली ऐवजी नरम बूट वापरावा सॉक्स वापरावे व चप्पल पेक्षा बूट वापरण्याची सवय लावावी कधीकधी बूट वापरण्या नेच जळवा तिचा प्रश्न कायमचा मिटतो


४ कोकम तेल गरम करून भेगांमध्ये हळुवार भरावे कोकण तेलाची व्यवस्थितपणे भेगा पडलेल्या किंवा चिरा पडलेल्या या हाताच्या व पायाच्या ठिकाणी मालिश करावी


५ जर चिखल्या झाल्या असतील तर 20 ग्रॅम एरंड तेल व पाच ग्रॅम करंज तेल एकत्र करून लावावे या दोन्ही तेलांची एकत्र करून व्यवस्थितपणे हळुवार मालिश करावे


६ तसेच clove oil म्हणजेच लवंग तेल व हळद पावडर एकत्र करून  त्याची पेस्ट सातत्याने रात्री झोपण्यापूर्वी लावावे

Clove oil
Jalwat disease




७ दररोज सकाळी आंघोळ करण्याच्या अगोदर डाळीच्या पिठाची पेस्ट हाताला लावावी पायाला लावावी ज्यामुळे जळवात बरी होते पण हा प्रयोग सातत्याने एक महिना करावा व साबणाचा वापर टाळावा


जळवात आयुर्वेदिक उपाय
जळवात औषध



८ तूप लोणी किंवा मलम तळहातांना लावा गावरान गायीच्या तुपाने पायाला किंवा हाताला मालिश करा ज्यामुळे आपल्या शहरांमध्ये जो कोरडेपणा आलेला असतो त्वचा रुक्ष कोरडी झालेली असते त्यामध्ये स्निग्धांश वाढतो व त्वचा नरम पडते  मऊ होते


९ पायांना जर भेगा पडले असतील किंवा हातांना भेगा  पडल्या असतील तर प्रामुख्याने हात व तळपाय कोमट पाण्यामध्ये बुडून धुऊन घ्यावे पाच मिनिटात स्वच्छ धुतल्यानंतर तळपायाला किंवा हातांना खोबरेल तेल मालिश करावी त्यानंतर त्यावर धूळ बसू देऊ नये आणि आणि पायात बूट सॉक्स वापरावे 


10 उपयुक्त हळदीचा लेप लावल्याने ही  आराम जाणवतो हे सर्व वरील सांगितलेले उपाय आपण नक्कीच करावे पण त्याचबरोबर आपल्या या जीवनशैलीमध्ये देखील बदल करावा कारण की बहुतेक आजार हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये जीवन पद्धती मध्ये आढळतात आपला दररोजचा आहार आपण पण बघितला पाहिजे आहारात बदल केला पाहिजे


 याचबरोबर विचारात देखील बदल केला पाहिजे स्वस्थ मन म्हणजेच  ताण तणाव  विरहित मन  स्ट्रेस विरहित मन व निरोगी शरीर यांचा एकमेकांशी अन्योन्य संबंध आहे हे विसरता कामा नये म्हणून त्यासाठी आपण पण आपल्या आहारामध्ये काही बदल करूयात काही पथ्ये पाळूया


जळवाती'च्या आजारांमध्ये पथ्य काय पाळावे?


मित्रांनो जळवातिच्या आजारांमध्ये काही पथ्य पाळले पाहिजे उदाहरणार्थ खूप रूक्ष आहार  टाळावा 


उदाहरणार्थ बाजरी ची भाकर उष्ण असते म्हणून तिच्या ऐवजी गव्हाची किंवा ज्वारीची भाकर आहारात असावी डाळीचे पदार्थ शेव भेळ भत्ता तुर मसूर काही दिवस वर्ज करावे पापड वर्ज करावा शिळे व आंबट पदार्थ टाळावे अति मीठ खाणे टाळावे अंघोळीच्या वेळी साबण लावू नये



‌अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर निश्चितच फार लवकर आपल्याला या आजारात आराम मिळतो त्याचबरोबर  मित्रांनो  वरील सर्व माहिती  आपापल्या प्रकृतीनुसार  तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने  आत्मसात करावे  तिचा उपयोग करावा तेव्हा आपल्याला हा लेख कसा वाटला आपला अभिप्राय नक्कीच आम्हाला कळवा नमस्कार


Saturday, December 21, 2019

आपले केस गळतात कारण घरगुती उपाय काय-Hair looss

आपले केस गळतात कारण  व घरगुती उपाय काय-Hair looss

Hair looss
Kesgalti


        मित्रांनो आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यात आपले केस हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात स्त्री असो वा पुरुष  दोघांनाही मनोमन वाटत असते  आपले  केस स्वच्छ काळेभोर  दाट   असावेत विशेषतः स्त्रियांचे सौंदर्य केसांमुळे वाढते आपली केस रचना केशभूषा व्यवस्थित असेल तर आपले व्यक्तिमत्व उठून दिसते म्हणून केसांमुळे आपले सौंदर्य खुलून दिसते


     पण मित्रांनो आज या स्पर्धेच्या युगात आपल्याला आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देणे अवघड वाटते आणि त्याच्या परिणाम स्वरूप शंभरात दहा व्यक्तींना टक्कल पडणे केस गळणे किंवा केस पातळ होणे केस पांढरे होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे त्यांच्या कामावर पण परिणाम होतो विशेषतः केस तर गळत असतात विशिष्ट वय झाल्यानंतर पण ते जर अकाली गळू लागले तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही 


  डोक्यातील केस गळतात व पुन्हा नवीन येतात केस येणे ही निरंतर प्रक्रिया असली तरीही जास्त केस गळायला लागले की मानवी मन अस्वस्थ होते. जळालेल्या केसांच्या जागी नवीन केस आले नाही की चिंता वाढून केस आणखी गळण्याचे प्रमाण वाढू लागते


  आजारपण, मानसिक ताण, अपुरी झोप यामुळेही केस गळतात. तसेच केसातील कोंडा, मादक द्रव्यांचे सेवन, कुपोषण व मधुमेहासारखे आजार केसांच्या मूळावर उठतात. केस गळण्याच्या एका प्रकारात केस झडल्यानंतर त्याजागी एकदम पातळ व विरळ केस उगवतात.


असे कायम कायम होत राहिल तर  काही दिवसांनी टक्कल पडायला सुरूवात होते. केस गळणे व टक्कल पडण्याचा संबंध आनुवांशिकतेशीसुद्धा आहे


 मित्रांनो आज आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत आपली केस का गळतात 

केस गळतीवर उपाय 

केस मऊ होण्यासाठी उपाय 

केस दाट होण्यासाठी उपाय

पांढरे केस काळे  होण्यासाठी काय करावे

केस गळतीवर समाधान
केसांचे आरोग्य
व त्यावर उपाय काय चला तर मित्रांनो जाणून घेऊया


केस का गळतात



   केस गळण्या मागील अनेक कारण असतात त्यापैकी जेनेटिकली म्हणजेच अनुवंशिक आजार हा देखील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो त्यामुळे तर तरुणपणातच  टक्कल पडते त्यामुळे हा आजार अवघड होऊन बसतो

Keshbhusha kashi asavi
Hair problem

   त्याचबरोबर मोठा गंभीर आजार ,
खूप औषधांचे सेवन करणे मानसिक ताण तणाव चिंता काळजी हेदेखील महत्त्वाचे कारण आहे 
काही वेळेला  तरुण मुलांमध्ये  नवे हेअर स्टाईल च्या नादामध्ये  केसांना नको ते रसायन लावणे ब्लिचिंग हेअर डाय  करणे


कुटुंबनियोजनाच्या गोळ्या घेणे अ जीवनसत्वाचे  जास्त सेवन करणे 


रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेणे 


वातावरणातील बदल धूळ प्रदूषण अस्वच्छता कोंडा कचरा यामुळे देखील केस गळण्याची समस्या होती


वजन कमी करण्यासाठी केलेली डायटिंग,
असंतुलित आहार त्याचबरोबर स्त्रियांमध्ये गरोदरपणा प्रसूती किंवा रजोनिवृत्ती मुळे हार्मोन्समध्ये होणारे बदल किंवा काही त्वचाविकार यामुळे देखील केस गळण्याची समस्या उद्भवते


मित्रांनो सामान्यतः प्रत्येक व्यक्तीचे केस हे गळत  असतात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती एक लाखापेक्षा जास्त  केस असतात दररोज 60 ते 70 केस गळत असतात  आणि त्या जागी पुन्हा नवीन केस येत असतात, आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी घेणे यामुळेदेखील केस गळतात 


खूप गरम अति गरम पाण्याने केसांना स्नान करणे डोक्यावरती गरम पाणी घेणे यामुळेही केस गळू लागतात

Hair looss,causes
Hair solution

आत्ताच आपण केस गळतीचे कारण बघितले आता आपण  पण केस गळतीवर  काही उपाय  बघूया की चे उपाय केल्यानंतर  तुम्हाला खूप  खूप बदल जाणवेल या केस गळतीवर उपाय काय


    केस गळतीवर उपाय काय


मित्रांनो केस गळतीवर उत्तम घरगुती उपाय आहेत त्यामध्ये

1 कांदा-


 मित्रांनो कांद्याचा रस हा केस गळतीवर उत्तम मानला जातो कांद्यामध्ये सल्फर हा घटक असतो आणि सल्फर रक्त संचार वाढवतो त्यामुळे केसांच्या मुळाशी आपण कांद्याचा रस लावावा आठवड्यातून तीन वेळेस हा प्रयोग करावा मिक्सरमध्ये कांदा बारीक करून घ्यावा त्यामध्ये थोड मध मिसळले तरी चालते


2 नारळाचे तेल_ 


नारळाच्या तेलाने केसांच्या मुळाशी चांगली मालिश करावी त्यामुळे रक्ताभिसरण वाढते व केसांचे मूळ मजबूत होतात

3 आवळा_


आवळ्या मध्ये भरपूर क जीवनसत्त्व असते क जीवनसत्वामुळे केस गळण्याचे थांबतात म्हणून केस गळती मध्ये आवळ्याचा वापर चांगला असतो

4 कोरफडीचा गर- 


कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी लावा त्यामुळे देखील केस मुलायम होतात केस गळती थांबते खूप मुला-मुलींना आपले केस मऊ असावेत असे वाटते त्यासाठी कोरफडीचा गर उपयोगी होतो

5 विटामिन सी युक्त आहार-


  विटामिन सी युक्त आहार घ्यावा विटामिन सी मुळे  आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते  हे जितके खरे आहे  तितकेच त्याची  आपल्या केसांची वाढ होणे मध्ये देखील महत्त्वाची भूमिका आहे म्हणून संत्री लिंबू मोसंबी  आवळा  टोमॅटो रताळे पालक शिमला मिरची आहारामध्ये उपयोग करावा विटामिन सी च्या कमतरतेमुळे मुळे केसांना कोरडेपणा येतो व केस गळतात व योग्य आहारामुळे या कमतरता भरून निघतात विटामिन सी मुळे आपल्या शरीरातील iron शोषले जाते आणि केस गळती मध्ये आयरन ची भूमिका देखील फार महत्वाचे असते iron जर कमी झाली तर केस गळू लागतात किंवा घडू शकतात


आपल्या केसांना प्रोटिन्सची आवश्यकता असते म्हणून आपण खाण्यामध्ये आहारामध्ये प्रोटीन चा उपयोग केला पाहिजे किंवा करायला पाहिजे आपल्या आहारातून प्रोटीन घेतल्यानंतर त्यातूनअमिनो असिड तयार होतात त्यामुळे केस मजबूत होतात सहजासहजी तुटत नाही 


6 शाम्पू-


कुठल्याही गोष्टींचा अतिरेक भयंकर असतो आजकाल तर मुलं-मुली केसांना दररोज शाम्पू लावतात परंतु त्यामुळे केस गळतीची समस्या वाढते म्हणूनच शांपूचा अतिरिक्त वापर टाळणे दररोज चा वापर टाळणे आठवड्यातून दोन वेळेस लावू शकतो किंवा तसा आपण नियम करू शकतो तोही नॅचरल शाम्पू असेल तर अति उत्तम


7चांगले व्यसन बाळगणे


संतुलित आहार ठेवणे संतोषी जीवन जगणे व्यायाम करणे ध्यान धारणा योगा करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे


9 केस वाळविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नये त्यापेक्षा कोरड्या वातावरणात जाऊन वाळवावे


 10 वजन कमी करणे


मित्रांनो आपल्या शरीराचे वजन वाढले असेल तर त्याचा परिणाम केसावर होऊ शकतो म्हणून आपले वजन कमी कसे करता येईल याकडे पण आपण लक्ष द्यायला हवे 


केस मऊ करण्यासाठी उपाय


  अनेकांना वाटतं की आपले केस हे मऊ चमकदार लुसलुशीत व लांब असावेत यासाठी काही वेगवेगळ्या प्रकारची औषध वापरतात पण त्या औषधांनी फारसा परिणाम मिळत नाही आपण वरती बघितल्याप्रमाणे बाजारातील औषधे हे दिसायला ब्रांडेड दिसतात पण त्यांचा गुण मात्र काहीएक नसतो त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय ते सांगणार आहे

केसांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना मऊ स्वच्छ करावे किंवा तसे झाकून ठेवावे त्यानंतर त्यांच्या मुळाशी तेल लावावे चांगली एक तासभर तेल मुळाशी भिनू द्यावे बादाम युक्त तेल चांगले असते त्यामध्ये विटामिन ई असते  व लांब केस होण्यासाठी ते चांगले असते या तेलाने केसांच्या मुळाशी चांगली मालिश करावी केसांना स्वच्छ ठेवावे आठवड्यातून एकदा केस चांगले धुऊन काढावे रोज केस धुऊ नये


आपल्या आहारामध्ये देखील बादाम नारळ व प्रोटीन युक्त आहार घ्यावा


 केसांना तीन ते चार महिन्यातून एकदा तरी trim करावे ज्यामुळे केसांच्या टोकांना जि फाटे फुटतात स्टॉप होऊन केस लांब होतात


आपल्या केसांना नवीन स्टाईल मध्ये बनवण्यासाठी किंवा कुरळे बनविण्यासाठी काही यंत्र वापरू नये त्यामुळे केस खराब होतात व प्रवासादरम्यान केसांना बांधून व झाकून ठेवावे


केस दाट होण्यासाठी काय करावे? 


Olive oil. 


केसांच्या मुळाशी ऑलिव्ह ऑइल चांगल्या प्रकारे मालिश करावे चांगल्या प्रकारे मालिश केल्याने केसांचे आरोग्य उत्तम होते व वाढ चांगली होते केस दाट होतात


कोरफडीचा गर


 कोरफडीचा गर एका भांड्यात घेऊन त्याचा केसांच्या मुळाशी मसाज करावा व अर्ध्या तासाने केस धुऊन घ्यावी या मसाजाने देखील केस मऊ लुसलुशीत व दाट होतात


एरंडेल तेल


एरंडेल तेल देखील फार उपयोगी असते एरंडेल तेलाचा केसांच्या मुळाशी मसाज करून केसांना मऊ ओला कपडा बांधून ठेवावे त्याने ही केस दाट व लांब होण्यासाठी मदत होते


बदाम तेल


वर सांगितल्याप्रमाणे बदाम तेल मालिश केल्याने देखील केस मजबूत दाट व काळेभोर होतात


कांद्याचा रस


एका भांड्यात कांद्याचा रस घेऊन केसांना मालीश करावी व अर्ध्या तासाने केस नॅचरल शाम्पूने धुऊन टाकावे  आठवड्यातून एकदा हा प्रयोग करावा आठवड्यातून



‌पांढरे केस  काळे होण्यासाठी काय करावे? 


केस पांढरे होणे मागे बहुतेक वेळेला जे कारण बघण्यात येते ते म्हणजे स्ट्रेस ताण तणाव जर व्यक्ती अशांत असेल तिच्या मनात खूप समस्या चालत असतील म्हणजेच मानसिक स्थिती जर बरोबर नसेल तर लवकरच केस पांढरे होऊ लागतात म्हणून आपल्या आतील ताणतणाव कमी करायला हवा व एक स्वस्थ सुंदर जीवन जगायला हवं


याच बरोबर रोजच्या आहाराची पद्धत हेदेखील तितकीच जबाबदार आहे आहारामध्ये तळलेले जंक फूड वगैरे खूप घेणे व प्रोटीन व विटामिन युक्त आहार कमी घेणे  यामुळेही अकाली वृद्धत्व येऊ लागते

हेअर स्टाईल साठी हेअर ड्राय किंवा वेगवेगळी केसांवर अशी प्रॉडक्ट वापरणे ब्लिचिंग रसायने वापरणे यामुळे देखील केसांवर किंवा केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो


ज्या लोकांचे डोके सातत्याने दुखत असते किंवा डोकेदुखीचा त्रास असतो यांनादेखील हळूहळू या समस्येला तोंड द्यावे लागते म्हणून आपले केस काळे करण्यासाठी वरील समस्यांचे निवारण करावे

  अशाप्रकारे मित्रांनो वरील सर्व उपाय हे  तज्ञांच्या सल्ल्याने करून बघावे निश्चित आपल्याला परिणाम दिसतील तेव्हा मित्रांनो आपल्याला या लेखावरून जर काही सुचवायचे असेल किंवा आपली प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण नक्कीच आम्हाला विचारू शकता तेव्हा नमस्कार


Thursday, December 19, 2019

मुतखडा का कसा होतो कारण लक्षणे घरगुती उपचार (Kideneystone)

मुतखडा का व कसा होतो  कारण, लक्षणे, व   घरगुती उपचार (Kideneystone)


मुतखडा कारण लक्षणे व उपाय
Kedneystone

मुतखडा म्हणजे काय? 

आयुर्वेदामध्ये मुत्राशमरी म्हणून मुतखड्याला ओळखले जातेमूत्रपिंडात किंवा आपण जेव्हा लघवी करतो तेव्हा त्या लघवीच्या मार्गात काही अडथळे निर्माण होतात काही स्फटिक जन्य पदार्थ अडथळा निर्माण करतात तेव्हा लघवीला खूप खूप वेदना होतात त्रास होतो हे पदार्थ एका ठिकाणी जमा व्हायला लागतात तेव्हा आपण पण त्या गोष्टीला मूतखडा झाला आहे असे समजतो


मुतखडा का होतो? त्याचे कारण काय? 


मित्रांनो मुतखडा होण्याच्या पाठीमागे प्रमुख्याने आपले पाणी पिण्याचे प्रमाण फार कमी असते त्यामुळे आपल्या शरीरातील दूषित पदार्थ मूत्रावाटे सहजा-सहजी बाहेर पडत नाही ती घामावाटे बाहेर पडतात म्हणून आपल्याला पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल पाहिजे 


सकाळी झोपेतून उठल्या बरोबर दोन-तीन ग्लास पाणी अनशापोटी सेवन करावे त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर एक ग्लास ,जेवणाअगोदर एक तास  एक ग्लास व जेवणानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास तसेच संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाणी पिणे फायदेशीर ठरते त्यामुळे आपल्या शरीरातील विजातीय पदार्थ पाण्यावाटे बाहेर फेकली जातात तर हा उपाय आपण करून बघावा पण याचाही फार अतिरेक होणार नाही याकडेही लक्ष द्यावे


लघवीचे प्रमाण सहसा जर कमी झाली असेल तर मुतखडा बनवणाऱ्या पदार्थांचे प्रमाण शरीरात वाढू लागते त्यामुळे मुतखडा होऊ शकतो


जर व्यक्तीच्या शरीरातील रक्तामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले असेल तरीदेखील मुतखडा होण्याचे प्रमाण वाढते


जे विषारी विजातीय विषारी तत्व मूत्राद्वारे बाहेर फेकले जात नाही ते एकत्र येऊन त्यांचे खडे बनू लागतात


मुतखडा ची लक्षणे कोणती? 


सर्वसामान्यपणे मुतखड्याचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात पाहायला मिळतो आणि महिलांच्या पेक्षा पुरुषांच्यात  काही  टक्के अधिक दिसून येतो.अनेक वेळा मूतखड्याचे निदान अचानक होते. काही रोग्यांमध्ये मुतखड्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांना ‘सायलेंट स्टोन ‘असे म्हणतात.


ज्या बाजूने  मुतखडा असेल  त्या बाजूने पाठ आणि पोटात  वेदना होतात.
उलटी येते,मळमळ होते ताप येणे
लघवीच्या वेळी जळजळ होते.
लघवीतून रक्त जाते.लघवीत  संसर्ग होतो.
लघवी  होणे अचानक बंद होते. अशी काही लक्षणे पाहायला मिळतात


अचानक पणे पाठ पोटात दुखू लागणे व ही वेदना गुप्तांगा पर्यंत पोहोचते काही मिनिटांसाठी ह्या वेदना असू शकतात शक्यतो  पाठी कडून पोटाकडे  वेदना  वाढत जाते कधीकधी काही तासांसाठी सुद्धा या वेदना होतात


लघवीला थेंब थेंब येणे किंवा अचानक लघवी होणे किंवा लघवीच्या दोन-तीन धारा पडणे कधीकधी मूत्रातून रक्त पडणे रात्रीच लघवीला जास्त प्रमाण होणे लघवीचा रंग बदलणे


मुतखड्यांच्या वेदनांची विशिष्ट लक्षणे


मुतखडा या आजारांमध्ये  आजाराची वेदना खड्याचे स्थान , आकार,प्रकार आणि लांबी-रुंदीवर अवलंबून असतात.मुतखड्याची वेदना अचानक सुरु होते. ह्या वेदनेमुळे मुतखडा  वेदना सहन करणे असह्य असते.किड्नीतील मुतखड्याची वेदना कमरेपासून सुरु होऊन जांघेकडे जाते.मुत्राशयातील खड्यामुळे जांघ आणि लघवीच्या ठिकाणी वेदना होतात ही वेदना चालण्या-फिरण्याने किंवा खडबडीत रस्त्यावर वाहनातून प्रवास करताना लागणाऱ्या धक्क्यामुळे अधिक वाढते .हि वेदना साधारणतः अनेक तास राहते,नंतर आपणहून कमी होतेबहुतेक वेळा हि वेदना अधिक झाल्यामुळे रोग्याला डॉक्टरकडे जावेच लागते आणि वेदना कमी करण्यासाठी औषध किंवा इंजेक्शनची गरज लागते.



मुतखड्यावर ती आहार काय घ्यावा? काय खावे व काय खाऊ नये? 



मुतखड्या मध्ये आहार  हा महत्त्वाचा असतो म्हणून पालक भेंडी भेंडी जर खावेच वाटत असेल तर बिया काढून  खाऊ शकता शेंगदाणे उडीद वांग टोमॅटो हे आपल्या आहारामध्ये वर्ज करावे फळांमध्ये अंजीर किशमिश स्ट्रॉबेरी बोरं हे पदार्थ टाळावे


मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी नारळ पाणी प्यावे कारण त्यात पोटॅशियम आहे त्यामुळे खडे होत नाही केळी खूप खाल्ली तरी चालतील


त्याचबरोबर कारले देखील मुतखड्यावर औषध म्हणून चालते कारण की कार्यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात आणि ती मुतखड्याला होऊ देत नाही


घरातील जिरे मध असेल तर मधाबरोबर घ्यावे खडे विरघळून जातात


मुतखडा मध्ये मिठाचा अतिरिक्त वापर  टाळावा जेवताना वरून मीठ घेणे टाळावे


कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊ नये दूध व दुधाचे पदार्थ जास्तीत जास्त घेऊ नये प्रमाण कमी असावे मांस मासे वर्ज करावे


   मित्रांनो भगवंताने आपल्याला एकाऐवजी दोन किडनी मुत्रपिंड भेट म्हणून दिली तेव्हा तिची योग्य काळजी ठेवणे हे आपलं आद्यकर्तव्य  आहे 
शरीरमाध्यम खलु धर्मसाधनम् !या वचनाप्रमाणे आपण या किडनी कडे  लक्ष देऊया 


मूत्रपिंडाचे स्थान कोठे असते? 


 आपला मूत्रपिंड हा अवयव  मणक्याच्या दोन्ही बाजूला  कमरेच्या वर  असतो ,शरीरात उजवी किडनी डाव्या किडणी पेक्षा  किंचित खाली असते 


      पण जेव्हा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला मुतखडा होतो तेव्हा त्याच्या वेदना फार त्रासदायक असतात तेव्हा अशा व्यक्तींना काही घरातील छोटेसे उपाय करूनही या आजारावर खूप मोठे समाधान मिळू शकते 



मुतखड्या वर घरगुती उपाय/ उपचार


मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुतखडा या आजारावरती काही रामबाण वस्तु या वस्तूंचा उपयोग करून आपली किडनी आपण नेहमी प्रमाणे स्वच्छ स्वस्थ निरोगी ठेवू शकतो  चला तर मित्रांनो काही प्रभावी घरगुती उपाय करूनही आपण कसे स्वस्थ जीवन जगू शकतो व मुत्रपिंड (किडनी stone)विकारांपासून स्वतःला कसे वाचवू शकतो ते आपण थोडक्यात बघू या 


तर मित्रांनो ते उपाय पुढीलप्रमाणे आपण करू त्यात पहिला उपाय म्हणजे



   कोथिंबिरीची पाने



Mutkhada karan
मुतखडा

                 अडीचशे ग्रॅम ताज्या कोथिंबीरीची पाने  स्वच्छ पाण्यात धुऊन एक लिटर पाण्यामध्ये उकळावी व अर्धे लिटर राहील राहील एवढे उकळल्यानंतर स्वच्छ कापडाच्या फडक्याने गाळून घ्यावे व अनशा पोटी सकाळी सेवन करावे हा प्रयोग किमान पंधरा दिवस करावा 

             किंवा 

मुतखडा कारण
Kedneystone solution
   धने 


बरोबर पन्नास ग्रॅम धने एक लिटर पाण्यामध्ये काचेच्या भांड्यात रात्री भिजत घालावे व सकाळी उकळावे उकळून अर्धे राहील एवढे उकळावे व स्वच्छ कापडाने गाळून अनशापोटी सेवन करावे हा प्रयोग आपल्याला पंधरा दिवस करता येईल यामुळे आपली किडनी स्वच्छ निरोगी बनते. 

उपाय दुसरा


गोखरू काटा 



मुतखडा वर उपाय गोखरु
मुतखडा   उपचार


‌      त्यानंतर दुसरा उपाय गोखरू काटा अंदाजी पाच ते सात गोखरू काटा रात्री काचेच्या भांड्यात एक लिटर  पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यानंतर ते पाणी अर्धे होईस्तोवर उकळावे व गाळून अनशापोटी पिऊन टाकावे हा प्रयोग पंधरा दिवस करता येईल हे काटे काष्ट औषधी च्या दुकानात मिळू शकतात

‌    

  किंवा



‌ गोखरू चूर्ण


  त्याच बरोबर गोखरु चूर्ण देखील मिळते हे चूर्ण दोन मोठे चमचे टेबल्स्पून एक लिटर पाण्यात टाकून उकळावे व आर्धे  राहील इतपत उकळावे व अनशापोटी गाळून सेवन करावे यापैकी कुठलाही एक प्रयोग सातत्याने पंधरा दिवस तज्ञांच्या  मार्गदर्शन आणि सल्ला घेऊन करावा आपल्याला मुतखडा आजारावर नक्कीच आराम मिळेल


कंबरमोडी चा पाला दगडी पाला


कंबरमोडी चा पाला घेऊन त्याचा दोन चमचा रस काढायचा आणि सकाळी अनशापोटी हा रस पिऊन टाकायचा तसेच संध्याकाळी अनशापोटी हा दोन चमचा रस पिऊन टाकायचा यावरती काही खायचे प्यायचे नाही साधारणतः एक तास अगोदर व नंतर यामुळे सर्व खडे बारीक होऊन गळून जातात व मोठे 22 mm खडे असतील तर त्यासाठी देखील हाच उपाय करावा फक्त पंधरा ते वीस दिवस हा उपाय करावा पाशान भेद वनस्पतींचे चूर्ण देखील तुम्ही वापरू शकता


पानफुटी वनस्पती


दगडी पाला कंबरमोडी चा पाल्या प्रमाणेच ही एक वनस्पती अतिशय गुणकारी आहे हे तिच्या पानांचा अर्धा कप रस करावा व सकाळी अनशापोटी घ्यावा कमीत कमी आठ दिवस हा प्रयोग करावा 20 एम एम पर्यंत असलेले खडे गळून पडतात



 तर मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला ते सांगा या लेखा बद्दल आपला अभिप्राय नक्कीच सुचवा 
‌ नमस्कार


मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation

मुळव्याध माहिती कारण लक्षणे व घरगुती उपचार-operation मुळव्याध म्हणजे काय?     मित्रांनो संस्कृत मध्ये मूळव्याधीला अर्श म्हटलं जातं व हिंदी ...